सोने घेऊ, चांदी घेऊ कि शेयर्स घेऊ ? (Sone gheu, chnadi gheu ki shares gheu?)
मागच्या आठवड्यात आपण पुढच्या सहा महिन्यात कसे वागले पाहिजे , कुठले खर्च केले पाहिजेत , कुठे पैसे वाचवले पाहिजेत हे बघितले . त्याचबरोबर बरेच वेळा न्यूज चॅनेल बघताना आपल्याला असे दिसून आलं की सोन्याचे रेट हे दिवसागणिक वाढत आहेत . पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फक्त आत्ताच होतय का आधीही झालेले आहे ? शेअर मार्केट आणि गोल्ड अर्थात सोन्यामध्ये खरच काही रिलेशन आहे ? भारतातले लोक हे नेहमीच सोन्याला एक अलंकार न मानता बहुत करून इन्वेस्टमेंटच मानतात . आज आपण बघणार आहोत नक्की सोन्यामध्ये आणि शेअर्समध्ये जर इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला खरंच रिटर्न्स मिळतात का ? किंवा या दोघांमधील कुठल्या इन्वेस्टमेंट मध्ये आपल्याला जास्त रिटन्स मिळतील ? यासाठी मी सोन्याचे रेट डाऊनलोड केले आहेत तसेच निफ्टी 50, सेंसेक्स यांचा मॅक्सिमम इयरचा डेटा हा डाउनलोड केला आहे . निफ्टी फिफ्टी इंडेक्स हा भारतातील NSE वरील टॉप फिफ्टी परफॉर्मिंग कंपन्यांचा बनवलेला असतो तर सेन्सेक्स इंडेक्स मध्य...