पैसे साठवूयात SIP by SIP ! ! !
मागच्या ब्लॉगवर आपल्या अनेक वाचकांनी तर काहींनी फेसबुकवर SIP / NAV बद्दल प्रश्न विचारले . सर्व वाचकांमध्ये Mutual Fund बद्दल असलेली जागरूकता बघून मला नक्कीच आनंद झाला व हमखास जाहिरातमध्ये गुणगुण करणारे एक वाक्य देखील आठवले
"Mutual fund investments are subject to market risks. Please read the
offer document carefully before investing........ " (जी कधीच वाचली जात नाहीत बहुतेक लोकांकडून )
त्यामुळे ठरवले कि आज
प्रथम SIP च मेकॅनिझम कस वर्क करते ते लिहुयात .नेहेमीप्रमाणे आपण केस स्टडी घेऊयात . Suppose देशपांडे सरांनी “A Bluechip Fund - Direct Plan (D)” या mutual फंडमध्ये दर महिना २००० रुपये गुंतवायला सुरुवात केली . साधारणपणे हि गुंतवणूक मागच्या वर्षी १ मे २०१९ ला सुरु केली तर त्या गुंतवणुकीची आजची स्थिती काय आहे ते जाणून घेऊ. मागच्या ब्लॉगमध्ये NAV तसेच युनिट्स म्हणजे काय हे आपण बघितले . आता त्याचा वापर नेमका कसा होतो हे आपण खालील टेबलमध्ये बघुयात. आपण जेव्हा दर महिना पैसे गुंतवतो तेव्हा आपण सांगितलेल्या दिवशी mutual fund त्या दिवशीच्या NAV प्रमाणे आपल्या नावावर युनिट्स खरेदी करतो.
अ
|
ब
|
अ / ब
|
|
प्रत्येक महिन्यातील खरेदीचा दिवस
|
गुंतवणुकीची रक्कम
|
त्या दिवशीची एका युनिटची NAV
|
खरेदी केलेलं युनिट्स
|
02-May-19
|
2000
|
16.79
|
119.1185229
|
03-Jun-19
|
2000
|
17.64
|
113.3786848
|
01-Jul-19
|
2000
|
17.64
|
113.3786848
|
01-Aug-19
|
2000
|
16.76
|
119.3317422
|
03-Sep-19
|
2000
|
16.77
|
119.2605844
|
01-Oct-19
|
2000
|
18.17
|
110.0715465
|
01-Nov-19
|
2000
|
18.49
|
108.1665765
|
02-Dec-19
|
2000
|
18.59
|
107.584723
|
01-Jan-20
|
2000
|
18.87
|
105.9883413
|
03-Feb-20
|
2000
|
18.91
|
105.764146
|
02-Mar-20
|
2000
|
18.6
|
107.5268817
|
01-Apr-20
|
2000
|
13.38
|
149.4768311
|
04-May-20
|
2000
|
14.38
|
139.0820584
|
एकूण गुंतवणूक केलेली रक्कम
|
26000
|
एकूण जमा झालेलं युनिट्स
|
1518.129324
|
वर टेबलमध्ये
केलेल्या
calculation प्रमाणे
आज देशपांडे सरांकडे एकूण 1518.1293236306 युनिट्स असतील. जर हि सगळी युनिट्स त्यांनी ६ मे ला विकायची ठरवली तर त्यांना ती ६ मे च्या NAV प्रमाणे विकावी लागतील.( वाचकांनी इथे लक्षात
घ्यावे कि मागच्या ब्लॉगमध्ये आपण NAV च्या फॉर्मुला बघितला आणि तेव्हा आपल्याला हेदेखील कळाले कि जसे शेयर मार्केट खाली वर होईल तशी NAV देखील
खाली - वर अर्थात fluctuate होईल ) चला, आता प्रॉफिट झालाय का लॉस झालाय समजून घेऊयात.
६ मे ची mutual Fund ची NAV = 14.28 रुपये पर युनिट होती.
Mutual Fund चे सर्व युनिट्स विकून मिळणारी रक्कम = 1518.1293236306 X 14.28
=
21,678.88 रुपये
देशपांडे सरांनी गेल्या 13 महिन्यात
26000 रुपये गुंतवले, त्याची ६ मे रोजी किंमत साधारपणे 21,678.88 रुपये आहेत. अर्थात आजमितीला त्यांना या गुंतवणुकीतून एकूण 4321.11 रुपयांचा
लॉस झालेला
दिसतो. (गुंतवणुकीची रक्कम - आजची रक्कम)
आता असा बघा कि सगळ्यात
कमी रिटर्नस हे रिकरिंग डिपॉझिटवर (RD ) मिळतात , आता अस बघुयात कि मागच्या वर्षी सरांनी Mutual Fund ऐवजी RD लावली असती तर त्यांना कसे रिटर्न मिळाले असते ?
दर महिना गुंतवणूक केलेली रक्कम
|
2000
|
एकूण महिने
|
13
|
इंटरेस्ट रेट (2019)
|
6.80%
|
इंटरेस्ट कंपौंड होण्याची
frequency
|
दर महिना
|
मॅच्युरिटी नंतर मिळणारे पैसे
|
27,055
|
वरील दोन्ही options चे calculation करताना महागाईचा देखील विचार केल्यास Mutual Fund कॅश लॉस दाखवतो (गुंतवलेली रक्कम देखील १००% परत मिळणार नाही ). तर RD मध्ये किमान गुंतवलेली रक्कम तरी मिळेल.
मग Mutual Fund मध्ये पैसे गुंतवू नये का ? तर अस अजिबात नाहीये. ज्यांच्याकडे जास्त पैसे नाहीत पण शेयर बाजारात थोडे थोडे पैसे गुंतवायची इच्छा आहे , त्यांच्यासाठी "Mutual
Fund" हा उत्तम
Option आहे .
मग
अस असताना
देशपांडे सरांनी
काय केले
पाहिजे ते
आपण बघुयात.
१. Mutual Fund मध्ये शॉर्ट टर्म कि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावी याचे उत्तर एका वाक्यात देता येत नाही. Mutual Fund हे शेयर बाजाराशी निगडित असल्याने देशातील तसेच जागतिक घडामोडीचा परिणाम आपल्या इन्व्हेस्टमेंटवर (अगदी छोटी असली तरी) होऊ शकतो याची जाणीव आपल्याला पाहिजे.
२. प्रथम हे लक्षात
घ्या Mutual
Fund हि एका वेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे तिच्यावरचे रिटर्न , NAV हि नेहेमी चेक केले पाहिजे. उपलब्ध असलेल्या अनेक स्कीम्स पैकी नेमकी कोणती स्कीम आपण घ्यावी याचा अभ्यास करावा.
३. अनपेक्षित काही घडामोडी झाल्यास घेतलेले युनिटस कधी Redeem करता (विकता ) येतील किंवा SIP Pause करता ( काही काळासाठी थांबवता) येईल का ? हे आपण जाणून घेतले पाहिजे.
४. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना आपले income व त्यावर लागणारा टॅक्स आणि देशातील महागाई यांचादेखील सारासार विचार करावा.
५. मी परत
आठवण करते कि आपल्या इन्व्हेस्टमेंट या आपले गोल, फॅमिली values, सुखाची कल्पना यांच्याशी विसंगत नक्कीच नसाव्यात . ६० वर्षांनी “हे करायचं
राहून गेले एवढा पैसे घेऊन काय करू आता ?” असे म्हणण्यापेक्षा आधीपासून Financial प्लांनिंग हे एक्सपर्टच्या मदतीने केलेले अधिक चांगले. त्यामुळे Financial Security बरोबरच जीवनाचा आनंद घेता येईल.
मी परत एकदा सगळ्या वाचकांचे आभार मानते कि तुम्ही मनापासून वाचत आहात , प्रश्न विचारत आहात. तुम्हाला
प्रश्न पडत असतील तर नक्की Facebook Page किंवा ब्लॉग वर विचारा.
हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी Like , subscibe करून मदत करा.

Well explained!!
ReplyDeleteVery nice article however if you could write an article on how to select a good mutual fund could be of help to the readers
ReplyDeleteWell explaination with simple example
ReplyDeleteGood Job
ReplyDelete