Posts

Showing posts from June, 2020

11th commerce मध्ये admission घेतलेल्या माझ्या छोट्या मित्र मॆत्रिणींसाठी

Image
कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे ११ चे अकाउंट्स , मॅथ्स वगैरे विषयांचे क्लासेस सुरु देखील झाले असतील अर्थात व्हर्चुअल , त्यामुळे म्हटलं आज खास तुमच्याशी बोलूयात . मी जेव्हा कॉलेज मध्ये पहिल्यांदा जाणार होते तेव्हा रोजच्या कडक इस्त्री केलेल्या युनिफॉर्म पेक्षा मस्त कॅजुअल्स घालून कॉलेज मध्ये जात येणार म्हणून खूप खुश होते , पण शाळेने लावलेली शिस्त हि न विसरल्याने पुढचे शिक्षण नेहमीच सुकर झाले . बऱ्याचदा मी असा पहिले कि ११ ला मुलं आणि काही प्रमाणात पालकांचादेखील अँप्रोच कॅज्युअल असतो . खरंतर ११ वि हे   फौंडेशन   पक्के करण्याचे वर्ष आहे .  बऱ्याच नव्या सब्जेक्टस्ची ओळख आपल्याला याच वर्षात होते आणि तेव्हाच जर आपण कॅज्युअल अँप्रोच ठेवला तर आपली शिक्षणाची इमारत हि पक्की होईल का ? कॉमर्समध्ये आलेले बरेच लोक एकतर पुढे जाऊन प्रोफेशनल कोर्स   करायचा किंवा सायन्स आवडत नाही म्हणून आलेले असतात . ज्यांना प्रोफेशनल कोर्स करायचा असतो तो सुद्धा साधारणपणे बार...