शिक्षण पद्धतीत बदल तात्पुरता हवा कि कायम स्वरूपी हवा ?
एक टीचर म्हणून मला एक प्रश्न पडतोय जसे आपण एन्व्हायर्मेंट रिफॉर्म्स , इकॉनॉमिकल रिफॉर्म्स याबद्दल बोलत आहोत तसेच एज्युकेशनल रिफॉर्म्सचाही विचार करण्याची हीच वेळ आहे का ? अर्थात यासाठी नुसते मत मांडण्यापेक्षा आपण World
Bank च्या डाटासेट चा अभ्यास करूयात.
A) Population Age composition - लोकसंख्येचे वयानुसार केलेले क्लासिफिकेशन
आत्ता आपण एक तरुण देश म्हणून ओळखले जातो पण त्याबरोबरच त्यांना रोजगार मिळवून द्यायची रास्त चिंता देखील आपल्याला आहे. डेटा नुसार २००० ते २०१९ चा लोकसंख्या वाढीचा रेट हा १. ४% आहे . त्यामुळे येत्या ३५ वर्षात आपण कदाचित एक म्हातारी लोकसंख्या जास्त असलेला देश ओळखला जाऊ शकतो , जसे प्रत्येक देश जेव्हा डेव्हलप होत असतो तो अशा स्थित्यंतरातून जात असतोच . परंतु येथे एक लक्षात घेतले पाहिजे कि येत्या ३५ वर्षात नुसते उद्योग धंदे वाढवून चालणार नाही तर ते मोठे करायला किंवा सांभाळायला अत्यंत प्रभावी पिढी घडवणे
आवश्यक आहे. येत्या ३०-३५ वर्षांनी
पहिल्यांदाच साधारणपणे २७% लोकांवर बाकीचे लोक डिपेंड असणार आहेत. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या सेक्टर मधील इनोवेशन्स, टेकनॉलॉजिकल अड्वान्समेंट यासाठी कोऑपेरेशन,
डेटा शेयरिंग, टीम वर्क , ब्राइन्स्टोर्मिंग या सारखे स्किल्स सेट्स हे लहानपणासून शिकवणे महत्वाचे ठरणार आहे . त्याचबरोबर फक्त मटेरिअलिस्टिक अँप्रोच न ठेवता सोसायटीसाठी काम करणारी लोक तयार होणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
B) Employment By Sector - क्षेत्रानुसार
केलेले एम्प्लॉयमेंटचे
क्लासिफिकेशन
२०१८ च्या डेटा नुसार जरी आपल्याला इंडस्ट्री
किंवा सर्विस सेक्टर मध्ये एम्प्लॉयमेंट मिळत असली तरी ४०% पुरुष तर ५६% महिला या अजूनही शेतीवरच अवलंबून आहेत . त्यामुळे एका संस्कृत श्लोकात म्हटल्याप्रमाणे जरीआपण जगातील मोठी डेव्हलप नेशन झालो तरी अन्नासाठी "शेतकऱ्यावरच" अवलंबून असणार आहोत. त्यामुळे एक टीचर म्हणून मला नक्की वाटते कि जसे आपण व्यावसायिक शिक्षणाचे महत्व मान्य केले त्याप्रमाणे कृषीशाखेच्या
शिक्षणाचा
मोठ्या प्रमाणात स्वीकार करून त्याकडे एक मोठा अर्निंग सोर्स आणि रिस्पेक्टफुल जॉब म्हणून बघणे महत्वाचे ठरेल.
बऱ्याच वेळा मुलांशी बोलताना असे दिसते कि त्यांना ऑफिस मध्ये बसून असलेला जॉब जास्त आवडतो , पण मातीत उभे राहून काम करणे किंवा प्रसंगी मशीन वर काम करताना हात काळे करणारे जॉब आवडत नाहीत. हि त्याचीच मानसिकता नसून तर हा विचार समाजाच्या दृष्टिकोनातूनही तयार होतो . AI च्या जमान्यात टिकायचे असेल तर जर उत्तम
ऑपॉर्च्युनिटी
मिळत असेल तर एखादे काम हलके ना समजता, आळशीपणा बाजूला ठेवून ते उत्तम प्रकारे करावे हा दृष्टिकोन जर शिक्षणातून देता आला तर नव्या
शिक्षण पद्धतीचा हा पायाच असेल . कारण शिक्षण हे फक्त पैसे कामवायलाच शिकवत असेल तर ते अपूर्ण समजावे लागेल .
B) Learn,
Unlearn and Relearn - शिका आणि
शिकतच राहा
Alumni Meet हि फक्त "get
together" न
ठरता कॉलेज तर्फे जर फ्री नॉलेज अपग्रेडेशन करणारे ठरले तर नेटवर्किंग , प्लेसमेंट्स यासारखे विषय देखील सहज सुटतील. परवाच एक ट्रैनिंग अटेंड करत होते तेव्हा एका मॅडमनि एक सुंदर अँप्रोच ठेवला तो म्हणजे कुठलाही हुशार माणूस हा Google ला बीट (हरवु ) शकत नाही त्यामुळे टीचरला देखील
Google ला
एक कॉ- टीचर मानून जास्तीत जास्त उत्तम डिलिव्हर करावे लागेल. अर्थात कन्टीनुएस लर्निंगच्या जमान्यात मेंटल स्ट्रेस कमी करणारादेखील हा अँप्रोच आहे. साधारणपणे चाळीशी नंतर बहुतकरून लोकांची शिकायची इच्छा हि कमी होते, यामागे बऱ्याचदा फिनान्शिअल कारणे देखील असू शकतात तेव्हा अशा वयोगसाठी देखील स्कॉलरशिपचा विचार करावा लागणार आहे.
B) Mastering
many fields as per situation - नवीन
कौशल्य आत्मसात
करणे
ज्या वेगाने आपण नवीन टेकनॉलॉजि ऍक्सेप्ट करतो त्याचा कैक पटीत वेगाने टेकनॉलॉजि चेंज होत असते. उदाहरणार्थ , एखाद्या डिलिव्हरी बॉयची जागा जर ड्रोनने घेतली आणि त्याने जर हॉटेल मध्ये वेटरची नोकरी मिळविली तर त्याला परत ट्रैनिंग घेणे आवश्यक आहे. AI च्या जमान्यात हा चेंज मोठ्या प्रमाणात करावा लागला जाऊ शकतो व त्याची frequency देखील अधिक असू शकते. त्यामुळे ट्रॅडिशनल एम्प्लॉयमेंट पॉलिसीस बरोबरच नवीन स्किल शिकण्यासाठी लागणारा फ्रीडम देणारे फंडस् हे एस्टॅब्लिश करावे लागणार आहेत.
नवनवीन गोष्टी , एज्युकेशनल
टूल्स यांच्या उंबरठयावर आपण नक्कीच उभे आहोत. शिक्षणात प्रत्येक बाबतीत मतभिन्नता असणे देखील स्वाभाविकक आहे . वर म्हटल्याप्रमाणे ३० वर्षानंतर च्या अर्थव्यवस्थेचा पाया हा आजच्या किंवा येऊ घातलेल्या नव्या शिक्षण पद्धतीत असेल व त्याचा नक्कीच लॉन्ग टर्म इम्पॅक्ट राहील हे निश्चित .तेव्हा मला माझ्या शाळेत शिकलेल्या पण या जमान्यात देखील लागू पडणाऱ्या काही ओळी आठवतात.
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे । ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे । ।
जर तुम्ही टीचर असाल किंवा पालक असाल किंवा स्टुडन्ट असाल तर तुमचे मत माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. खाली एक गूगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुमचे मत नक्की नोंदवा.




Comments
Post a Comment