“डोनेशन” आणि इनकम टॅक्स

माझे लहानपण हे पर्वती, पुणे येथील प्रेमळ माणसांनी भरलेल्या संपन्न अशा वाड्यात गेले, त्यामुळे मला पुण्यातील वाडा संस्कृती म्हणजे काय हे छान अनुभवता आले. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आठवण नाही आली तरी गणपती म्हटले कि हटकून मला माझ्या वाड्याची आणि माझ्या माणसांची नक्कीच आठवण येते. गणपती म्हटले कि एक प्रकारचा उत्साह , धावाधाव आम्हा लहान मुलांची किरण दादा , छोटू दादा, उदय दादा याच्या मागे असलेली भुणभुण कि मी पण येणार गणपती सिलेक्ट करायला. किंवा आज आरती मी करणार ..... आणि सगळ्यात गम्मत म्हणजे आरती झाल्यावर प्रसाद वाटपाचे काम मिळणे ....... कारण सगळ्यांना प्रसाद वाटून झाल्यावर उरलेला प्रसाद हा गच्चीच्या जिन्यात बसून संपवण्यात एक मजा होती आणि आई म्हणायची तुम्हा लहानमुलांनी प्रसाद असा आनंदानी चट्टामट्टा केला कि बाप्पा पण खुश होऊन मोठ्ठा आशीर्वाद देतो बरं. जसे प्रसादाचे वार ठरलेलं असायचे तसेच अगदी आरतीचे सुद्धा.

इथे मला सगळ्या गणपती मंडाळांच्या कार्यकर्त्यांचे देखील कौतुक करायचे आहे . कारण लॉकडाऊन काळात आपल्या  एकट्या असलेल्या आज्जी आजोबांना किंवा एखाद्याच्या अडीनडिला हीच मंडळी मदत करायला पुढे होती. परवाच चितळेंची यांची ऍड बघितली त्यात ते अशाच एका कार्यकर्त्याला बोलावून नेहेमीप्रमाणे खडूसपणे बोलता प्रेमाने मोहन आगाशे त्यांना डोनेशन देतात. खरंतर दान अर्थात डोनेशन देणे हे आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे . " सत्पात्री दान करणे " हा भारतीयांचा नैसर्गिक स्वभाव आहे, मग ते एखाद्या ओढवलेल्या आपत्ती साठी असो किंवा एखाद्याची कमतरता भरून काढण्यासाठी असो . माझी आज्जी मला नेहेमी सांगायची एखादयासाठी जर आपल्याला काही दान करायचे असेल तर एक लक्षात  ठेव तू जर दान उजव्या हाताने दिले असेल तर ते डाव्या हातासदेखील  कळता काम नये, त्यामुळे आपल्यात दान केल्याचा गर्व उत्पन्न होत नाही ....

या गौरवशाली वर्तनाचे  कौतुक करण्यासाठी इनकम टॅक्स ने देखील अशा दानशूर व्यक्तींना एक भेट दिलेली आहे ती म्हणजे केलेल्या दानाचे त्यांना टॅक्स पे करताना डिडक्शन मिळते अर्थात त्यांची टॅक्स लायबिलिटी हि कमी होते. इनकम टॅक्स चा 80G सेक्शन हा डोनेशन्स आणि त्यावर मिळणाऱ्या डिडक्शन्स वर बोलतो. पुढच्या पॅराग्राफ मध्ये  आपण ८०जी ढोबळमानाने समजून घेऊयात.

इनकम टॅक्सचा 80G 

रुपये २००० पर्यंत केलेली कॅशने तर चेकने दिलेली कितीही अमाऊंटची डोनेशन्स हि कन्सिडर केली जातात , जेव्हा तुम्ही वस्तू स्वरूपात देणगी देता ती या सेक्शनमध्ये ग्राह्य धरली जात नाही. ट्रस्ट कडून मिळालेली ऑथोराइज्ड पावती हि तुम्ही केलेल्या पेयमेन्टचे प्रूफम्हणून समजली जाते. या सेक्शन मध्ये फंडांचे दोन प्रकार केले आहेत.

. ज्या फंडांना  डोनेट केल्यावर अमाऊंटच्या १००% अर्थात पूर्ण डिडक्शन मिळते

. ज्या फंडांना  डोनेट केल्यावर अमाऊंटच्या ५०% अर्थात निम्मे डिडक्शन मिळते

 

हि लिस्ट आम्ही लक्षात ठेवायची का ? तर मुळीच नाही जेव्हा तुम्ही डोनेट करत आहात तेव्हा अशा फंडाच्या  वेबसाइटवर जाऊन तुम्ही वरील गोष्ट चेक करू शकता किंवा तुम्ही एक्सपर्टचाही सल्ला घेऊ शकता. तसेच अशा फंडाच्या  रिसीट वरदेखील हि बाब लिहिलेली असते.

 

नेहेमीप्रमाणे एक केस स्टडी घेऊन आपण 80G मुळे टॅक्स लायेबिलिटी वर कसा फरक पडतो ते बघुयात.

 

रमाकांत हे सिनियर मॅनेजर म्हणून काम करतात . त्यांचा वार्षिक रुपये , ००,००० (प्रति महिना ७५,००० रुपये ) असा इनकम आहे . रमाकांत LIC , ट्युशन फीस च्या रिसिटस प्रमाणे 80C च्या अंडर दीड लाखांचे पूर्ण डिडक्शन क्लेम करतात . तसेच ८० D प्रमाणे   ते मेडिक्लेम देखील क्लेम करतात. त्यांची NPS मध्ये ५०,००० रुपयांची गुंतवणूक आहे . समजा रमाकांत यांनी दर महिना सॅलरीच्या % रक्कम हि १००% डिडक्शन मिळते अशा फंडाला डोनेट  केली तर त्यांना सत्पात्री दान केल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाबरोबरच टॅक्स लायबिलिटीमध्ये काय फरक पडेल ते आपण बघुयात.

 

Particulars

Without any donation

With Donation of Rs. 45,000

Gross Salary

9,00,000

9,00,000

Less : Standard Deduction

50,000

50,000

Less : Tax on Employment

2,500

2,500

Income from Salary

8,47,500

8,47,500

Gross Total Income (A)

8,47,500

8,47,500

Deductions Under VI (A)

LESS

1. 80C (LIC, Tution Fees)

1,50,000

1,50,000

2. 80CCD (NPS)

50,000

50,000

3. 80D ( Mediclaim)

50,000

50,000

4. 80G Donation

-

45,000

Total Deduction (B)

2,50,000

2,95,000

Net Taxable income (A - B)

5,97,500

5,52,500

Tax Payable

32,000

23,000

Cess @4%

1,280

920

Total Tax Payable

33,280

23,920

Saving In tax liability due to donation

9,360

 

अर्थात वरील कॅल्क्युलेशन वाचून काही लोक असेही म्हणतील कि पहिल्यांदा ४५००० रुपये खर्च करून ९३६० रुपये वाचवण्यात काय अर्थ आहे? त्यांचे हेही म्हणणे फिनान्शिअली विचार केला तर अगदी बरोबर आहे पण मला त्याचबरोबर सुधा मूर्तींच्या Penguin प्रकाशनाच्या "Here, There and Everywhere " या पुस्तकातील " Amma, What is your duty " या चाप्टरची आठवण होत आहे. ज्याच्यात त्यांच्या मुलीने त्यांना इन्फोसिस फाऊंडेशनच्या कामासाठी कसे उद्युक्त केले याचे अत्यंत प्रामाणिक आणि परखड वर्णन केले आहे. याच नोट वर मी आजचे लेखन थांबवते सर्व वाचकांना गणेशोत्सवाच्या अनेक शुभेच्छा देते

 

 



Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

Union Budget 2021-22

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)