B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

आज मी कोणत्याही फिनान्शिअल टॉपिक वर बोलता B.com/BBA/M.com/M.B.A च्या लास्ट इयर च्या एक्साम ची तयारी करणाऱ्या स्टूडेंट्ससाठी लिहिणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्या मुलांनी वर्षभर सब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी अभ्यास केला आणि अनाकलनीय संकटामुळे आता मात्र आपल्याला MCQ बेस्ड एक्साम घ्यावी द्यावी लागत आहे. अशा वेळेस नेमकी तयारी कशी करावी हा प्रश्न अनेक मुलं मुलींसमोर उभा असेल.

MCQ साठी अभ्यास कसा करायचा ?

जर तुम्हाला ऑप्शनला काही टाकायची सवय असेल तर एक्साम कुठल्याही पद्धतीची असो ती घातकच असते , त्यामुळे कोणताही टॉपिक ऑप्शनला टाकता कसा काय अभ्यास करायचा हे समजून घेऊयात. गाईडलाईन प्रमाणे ५० मार्कांची एक्साम आहे त्यामध्ये अचूक ५० क्वेशन्स ना मार्क्स दिले जाणार आहेत . तेव्हा १००% मिळवण्याची एक सुवर्ण संधी म्हणून आपण या एक्सामकडे बघुयात पण त्यासाठी तेवढा तगडा अभ्यास करणे देखील महत्वाचे.

MCQ सॉल्व करण्यासाठी कॉन्सेप्ट्स क्लिअर असणे खूप महत्वाचे असते . त्यामुळे प्रथम कॉन्सेप्ट्स क्लॅरिटीवर लक्ष द्या. वाचून जर काळात नसेल तर ज्याला कधी कधी मी ज्याला "को - टीचर " म्हणते अशा गुगल वर ऑनलाइन विडिओ किंवा मटेरियल मदत घ्या पण त्या बरोबर कन्टेन्ट अक्युरॅसि ची खात्री करून घ्या .

NPTEL वर तज्ज्ञ मंडळींनी केलेले अनेक चांगले विडिओ तुम्हाला रेफरन्स म्हणून वापरता येतील.

Link: https://nptel.ac.in/course.html (Select Discipline: Management)


काही सब्जेक्टची डायरेक्ट लिंक उदाहरणार्थ देत आहे. तुमच्या रिलेटेड टॉपिक तुम्ही बघून कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता.

Costing:

https://nptel.ac.in/courses/110/101/110101132/

Financial Accounting:

https://nptel.ac.in/courses/110/101/110101131/

Banking & financial statement of Bank

https://nptel.ac.in/courses/110/105/110105143/

पेपर सॉल्व कसा करायचा? खाली काही मी सजेशन्स देत आहे.

1.       पेपर हा MCQ बेस्ड असल्याने पूर्ण पेपर वाचण्यात वेळ घालवू नका

2.       क्वेश्चन सॉल्व करायला घ्या, एखादा क्वेश्चन येत नसेल तर त्यावर अडून बसता पुढचा सॉल्व करा

3.       वेळ राहिला असेल तर आधी येत नाही म्हणून सोडून दिलेले क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा

4.       जरी बेस्ट ५० ला मार्क्स असले तरी सर्व क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा

5.       जर अभ्यास झाला असेल तर टाइम मॅनॅजमेण्ट शिकण्यासाठी MCQ सोडवण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलेली अधिक फायदेशीर ठरेल

“Managing Rupaya” आणि “Matrix School of Management Studies” यांनी मिळून MCQ बेस्ड काही प्रॅक्टिस पेपर बनवले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करून प्रॅक्टिस करा.

Link: http://www.msmspune.com/onlinecourse.html

जरी तुम्ही स्वत थर्ड इयर ला नसाल तरी माझी सगळ्या वाचकांना विनंती आहे , कि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेवटच्या वर्षाला शिकत असण्याऱ्या मुलांपार्यंत पोचण्यासाठी फेसबुक , इंस्टाग्राम वर शेयर करा. सगळ्यांना एक्सामसाठी शुभेच्छा , एक्साम नंतरच्या रविवारी बोलूयात ग्रॅज्युएशन नंतरचे विश्व त्यातील शिक्षणाच्या संधींबाबत.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

Union Budget 2021-22