Education Loan एक उत्तम पर्याय
प्रत्येकानेच गेल्या सहा महिन्यात आई बाबांची झालेली आर्थिक
ओढाताण देखील नक्कीच पहिली असेल अशा वेळेस उच्च किंवा कोलेजचे शिक्षण पूर्ण
करण्यासाठी Education
Loan एक उत्तम पर्याय आहे.आजच्या blog मध्ये याविषयी माहिती करून घेऊयात.
Education Loan चे फीचर्स हे बँक प्रमाणे बदलतात पण जे
ढोबळमानाने common फीचर्स आहेत ते आपण पाहूयात.
1.
Education
Loan घेताना student बरोबर त्याचे पालक हे सहकर्जदार
असतात
2.
साधारपणे चार ते पाच लाखांपर्यंत कोणतीही असेट
तारण ठेवावी लागत नाही. तसेच Processing Fees देखील नसते . त्यापेक्षा जास्त
लोनसाठी तारण ठेवावे लागते व सेपरेट Processing Fees देखील लागते ( दोन्ही अमाउंट
या बंकेप्रमाणे बदलू होऊ शकतात)
3.
Margin Money for
education Loan मार्जिन मनीची कन्सेप्ट हि डाऊन पेयमेन्ट सारखीच आहे.
उदाहरणार्थ जर दहा लाखाचे लोन घेतले आणि Margin Money हा १०% असेल तर कर्जदाराला एक लाख स्वतः भरावे लागतात व
उरलेली रक्कमहि बँक लोन म्हणून देते. भारतात घेतलेल्या शिक्षणासाठी Margin Money हा साधारणपणे ५% आहे तर परदेशी शिक्षणाला १५%
आहे .
4.
EMI Calculation अनेक बँकांच्या वेबसाईटवर तुम्हाला Education Loan calculator मिळून जाईल त्यामध्ये अपेक्षित रक्कम टाकून
साधारण EMI (दर महिन्याचा हप्ता ) किती पडेल याचा अंदाज येऊन जाईल . तुमच्या
रेफरन्स साठी एक Calculation चा फोटो देत आहे
1.
लोन परत कसे व कधीपासून फेडायचे
a.
Education
Loan फेडण्याची सुरुवात हि कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर होते
b.
काही बँक या “Holiday Period” देखील देतात . Holiday Period म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यावर सुद्धा काही काळ कर्जाची परत फेड सुरु होत नाही. समजा कोर्स
हा दोन वर्षाचा आहे आणि Holiday Period हा एक वर्ष असेल तर कर्जाची
परतफेड हि एकूण तीन वर्षांनी सुरु होईल . Holiday Period हा बँक प्रमाणे बदलू शकतो.
2.
कोणत्या कोर्स साठी लोन मिळेल ?
a.
जे Graduation आणि Post-Graduation कोर्स साठी तसेच कोलेज , युनिवर्सिटी UGC/AICTE/IMC किंवा Governement recognized आहेत
b.
तसेच Autonomous Institution मधील approved कोर्स
c.
Teacher Training
/ Nursing Course
इथे पालकांनी व मुलांनी अडमिशन घेताना Institution आणि कोर्सची माहिती पूर्ण करून घ्यावी
3.
कोणते खर्च लोन प्रपोझलमध्ये समाविष्ट होऊ
शकतात
a.
College / Tuition
Fees
b.
Exam / Library /
Laboratory Fees
c.
कोर्स कम्प्लीट करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी
आहेत जसे कि
i.
बुक्स
ii.
laptop
iii.
इतर equipment / instruments / uniform charges
iv.
जर abroad मध्ये study कम्प्लीट करायचा असेल तर
travelling expenses
4.
आता लोन काढायचे झाले कि documents महत्वाची
ठरतात
Education Loan हे student बरोबर पालक Co – Borrower असल्याने दोघांची साधारणपणे खालील documents
लागतात
*Document ची लिस्ट हि
लोनच्या आकड्यावर अवलंबून आहे. बँकेची वेबसाईट जरूर बघावी
1.
Education
Loan आणि Income Tax Deduction
जेव्हा शिक्षण झाल्यावर
तुम्ही लोन फेडायला सुरुवात कराल तेव्हा EMI मधील जो interest चा पार्ट आहे त्याचे
deduction तुम्हाला सेक्शन 80 E
खाली मिळते . त्यामुळे याचा फायदा तुम्हाला tax planning करता देखील होतो .
Unfavorable situation मुळे निर्माण झालेल्या cash crunch मध्ये
शिक्षण थांबवण्यापेक्षा Education Loan हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
आत्ता १००% रक्कम हि खिशातून न जाता शिक्षण सुरु होते. मुले स्वतंत्र कमावती
झाल्यावर देखील ते हे लोन फेडू शकतात. जरी आत्ता लोन चे बर्डन आहे असे समजले तरी लोन
क्लीअर केल्यावर मुलांना तो एका वेगळ्या प्रकारचा आनंद आणि confidence देऊन जाइल
हेही तितकेच खरे. प्रत्येक पालकांना आपली मुले हि यशस्वी व्हावीत असे वाटत असते
तेव्हा त्यासाठी लागणारी Risk आणि Responsibility घेण्याचे धाडस तुम्ही या छोट्या प्रोजेक्ट मधून
देखील मुलांना देऊ शकता.


Comments
Post a Comment