Posts

Showing posts from August, 2020

CSR: Corporate Social responsibility अर्थात कंपन्यांचे सामाजिक दायित्व

Image
मागच्या ब्लॉग मध्ये आपण   इनकम टॅक्सच्या 80G सेक्शनचा थोडा अभ्यास केला . या ब्लॉग मध्ये आपण CSR म्हणजेच Corporate Social Responsibility वर जरा नजर टाकुयात . तुमच्यापैकी बरेच वर्किंग असल्याने कंपन्यांच्या CSR प्रोजेक्ट मध्ये तुम्ही नेहमीच भाग घेत असाल . तर स्टुडंट्स मंडळी हि कंपनी लॉ शिकताना याचे रूल्स नक्कीच वाचत असतील . परंतु या ब्लॉग मध्ये आपण कंपन्या नक्की कसे व का हे प्रोजेक्ट अमलात आणतात आणि त्याचा समाजावर काय परिणाम होत आहे हे आपण चार्ट्स व फिगर्स चा अभ्यास करून बघुयात . सेक्शन किंवा रूल्स नंबर लक्षात ठेवायची क्लिष्टता टाळून आपण CSR चे रूल्स   समजून घेऊयात . ज्या कम्पनीचा नेट वर्थ ५०० करोड पेक्षा जास्त आहे किंवा टर्नओव्हर १००० करोड पॆक्षा जास्त आहे किंवा नेट प्रॉफिट ५ करोड किंवा त्या पेक्षा जास्त आहे तर त्या कंपन्यांना CSR साठी क्वालिफाईड कंपनी म्हणतात . म्हणजेच या कंपन्यांना CSR प्रोजेक्ट घेणे अनिवार्य आहे . पण किती पैसे खर्च करायचे याचे सुद्...