CSR: Corporate Social responsibility अर्थात कंपन्यांचे सामाजिक दायित्व


मागच्या
ब्लॉग मध्ये आपण  इनकम टॅक्सच्या 80G सेक्शनचा थोडा अभ्यास केला . या ब्लॉग मध्ये आपण CSR म्हणजेच Corporate Social Responsibility वर जरा नजर टाकुयात. तुमच्यापैकी बरेच वर्किंग असल्याने कंपन्यांच्या CSR प्रोजेक्ट मध्ये तुम्ही नेहमीच भाग घेत असाल . तर स्टुडंट्स मंडळी हि कंपनी लॉ शिकताना याचे रूल्स नक्कीच वाचत असतील . परंतु या ब्लॉग मध्ये आपण कंपन्या नक्की कसे का हे प्रोजेक्ट अमलात आणतात आणि त्याचा समाजावर काय परिणाम होत आहे हे आपण चार्ट्स फिगर्स चा अभ्यास करून बघुयात.

सेक्शन किंवा रूल्स नंबर लक्षात ठेवायची क्लिष्टता टाळून आपण CSR चे रूल्स  समजून घेऊयात. ज्या कम्पनीचा नेट वर्थ ५०० करोड पेक्षा जास्त आहे किंवा टर्नओव्हर १००० करोड पॆक्षा जास्त आहे किंवा नेट प्रॉफिट करोड किंवा त्या पेक्षा जास्त आहे तर त्या कंपन्यांना CSR साठी क्वालिफाईड कंपनी म्हणतात . म्हणजेच या कंपन्यांना CSR प्रोजेक्ट घेणे अनिवार्य आहे. पण किती पैसे खर्च करायचे याचे सुद्धा कॅलक्यूलेशनचा फॉरमॅट देखील रूल्स मध्ये दिला आहे. कमीत कमी नेट प्रॉफिट च्या % रक्कम हि कंपनीने खर्च केली पाहिजे . अर्थात हा नेट प्रॉफिट म्हणजे  मागील तीन वर्षांच्या नेट प्रॉफीटची सरासरी (ऍव्हरेज ) होय.

* हा ऍव्हरेज चा रुल या लॉ ड्राफ्ट करणाऱ्या माणसाच्या हुशारीचे एक सुंदर उदाहरण आहे . कारण प्रत्येक वर्षीं कंपनीचा परफॉर्मन्स हा खाली वर होणे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा फार मोठा क्रायसिस झाला नाही तर वर्षानु वर्ष % खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होणार नाही, किंबहुना वाढच दिसत राहील हे सहज कळून येते.

आता आपण आत्तापर्यत या रुलप्रमाणे एकूण किती पैसे खर्च झालेत हे बघुयात


२०१६-१७ १७-१८ मध्ये आलेली स्टॅग्नन्सी सोडली तर कंपन्यांच्या CSR खर्चात हि वाढच झालेली दिसू येत आहे. हे जसे सामाजिक उपक्रमासाठी चान्गले आहे तसेच हा खर्च कंपन्यांनी केलेल्या प्रगतीचा (ग्रोथचा) देखील इन्डायरेक्ट इंडिकेटर आहे.

हे पैसे कंपनीने कुठे कसे खर्च करावेत किंवा कुठल्या फंडास दिले तर चालतील याबाबत देखील रूल्स मध्ये काही गाईडलाईन्स दिल्या आहेत . खालील टेबल मध्ये आपण कंपन्या साधारणपणे कुठे खर्च करत आहेत हे बघुयात

(INR Cr.)

Sr. No

Development Sectors

2014-15

2015-16

2016-17

2017-18

2018-19

1

Clean Ganga Fund

5.47

32.82

24.37

4.54

5.41

2

Education, Differently Abled, Livelihood

3188.09

4921.06

5559.13

5822.47

7499.26

3

Encouraging Sports

57.61

140.11

180.32

227.75

295.1

4

Environment, Animal Welfare, Conservation Of Resources

853.99

971.06

1317.7

1362.83

1516.63

5

Gender Equality , Women Empowerment , Old Age Homes , Reducing Inequalities

189.92

342.67

468.74

499.65

517.88

6

Health, Eradicating Hunger, Poverty And Malnutrition, Safe Drinking Water , Sanitation

2525.92

4633.46

3658.14

3316.25

4958.48

7

Heritage Art And Culture

117.37

119.16

305.57

284.05

189.89

8

Other Sectors ( Technology Incubator And Benefits To Armed Forces And Admin Overheads )

9.5

37.48

60.95

43.33

119.71

9

Prime Minister's National Relief Fund

228.18

218.04

158.8

161.84

300.07

10

Rural Development

1059.34

1376.16

1554.77

1479.8

2308.83

11

Slum Area Development

101.14

14.09

51.49

35.1

50.23

12

Swachh Bharat Kosh

113.86

325.52

184.06

213.67

93.8

13

Any Other Fund

277.09

334.34

419.98

255.62

710.59

14

NEC/ Not Mentioned

1338.39

1051.15

388.95

1.04

87.54

Grand Total (in Cr.)

10065.93

14517.21

14333.04

13708.02

18653.48

*National CSR Data Portal

वरील टेबलवरून स्पष्ट होते कि कंपन्या ह्या जास्त करून एडुकेशन, एन्व्हायर्मेंट , हेल्थ आणि रूरल डेव्हलपमेंट या सेक्टर्समध्ये काम करत  आहेत. पँडेमिकच्या काळात या सर्व सेक्टर्स मध्ये अजून खूप कामाची गरज आहे हे परत एकदा सर्वाना कळलेच आहे.

CSR साठी पैसे खर्च करणारी टॉप १० राज्ये (INR Cr)

वरील चार्ट मध्ये दिसून येते कि महाराष्ट्रात औद्योगिक विकास हा अधिक असल्याने सगळ्यात जास्त CSR  प्रोजेक्ट्स हि महाराष्ट्रात घेतली जात आहेत तसेच त्यावर खर्च देखील होत आहे. येथे एक नक्कीच नमूद करावेसे वाटते कि  CSR च्या मदतीने अविकसित राज्यांवरही जर लक्ष केंद्रित करता आले तर तेथील उद्योगांना एकूण विकासाला नक्कीच चालना मिळेल

TOP 4 कंपन्यांनी केलेले CSR वरील खर्च (INR Cr)


एकूणच कायद्यातील प्रोव्हिजन मुळे अनेक कंपन्या या आपले सामाजिक दायित्व  पूर्ण करत आहेत . पण "टाटा " यांसारखे काही इंडस्ट्रियालिस्ट हे कोणताही कायदा येण्या आधीपासून वर्षानु वर्ष समाज उपयोगी कामे करतच आले आहेतआपल्याकडे " Philantrophy” हळू हळू मूळ धरू लागली आहे. अशा कामामध्ये पैसे इन्व्हेस्ट करणाऱ्यास सोशल इन्व्हेस्टर म्हणतात. तसेच या कामाचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (ROI ) देखील काढला जातो , अर्थात तो स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे . आपल्या कडे अजीज प्रेमजी यांचेदेखील नाव अग्रणी घेतले जाते तर परदेशात बिल आणि मिलिंडा गेट्स फौंडेशन यांच्या कामाची माहिती तर सर्वश्रुत आहे. त्यामुळे CSR असो किंवा 80G च्या अंडर दिली जाणारी डोनेशन्स असो, त्यामुळे भारतीयांच्या दातृत्वाचे एक उत्तम उदाहरण आपण येणाऱ्या जनरेशन्स समोर ठेवू शकतो







Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा