उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा

शेयर मार्केट म्हटले कि नेहमी आपल्या डोळ्यासमोर येते ती BSE ची सुंदर बिल्डिंग, रोज कोट्यवधीचे होणारे व्यवहार. Sensex किंवा NIFTY50 यांच्या बरोबर अनेक कंपन्यांच्या चार्टकडे डोळे लावून बसलेले अनेक इन्वेस्टर्स, ट्रेडर्स , ब्रोकर्स. लहानपणी सह्याद्रीवर बातम्या बघताना (बिसनेस न्यूज चॅनेल्स हि जवळपास नव्हतीच ) BSE मध्ये अनेक कॉम्पुटर समोर बसून काम करणारे लोक पहिले कि  नक्की कोणत्या कॉम्पुटर वर बघून काम करत  आहेत असा प्रश्न पडायचा गमतीचा भाग सोडला तर खरंच हे अनेक कंपन्यांच जाळं स्पायडर मॅन च्या जाळ्यापेक्षा अधिक फेक्सिबल आणि मजबूत ठेवणाऱ्या शेयर मार्केट बद्दल आणि त्यावर ट्रेड होणाऱ्या  शेयर्स बद्दल खूप लहानपणापासून कुतुहल होते.

शेयर मार्केट म्हटले कि बऱ्याच लोकांना त्यातून मिळणारा प्रॉफिट हा एक उमेद देऊन जातो तर मार्केट कोसळत असताना काहींचं अगदी BP शूट देखील करतो. त्यामुळे जसा अभ्यास वाढत गेला तस लक्षात आले कि अशा अनेक गोष्टी आहेत कि एक शेयरहोल्डर म्हणून आपले नेहमीच दुर्लक्ष होते.

1.       शेयरहोल्डिंग पॅटर्न मधील स्वतःचे स्टेटस माहिती नसणे (मायनर / मेजर / प्रोमोटर )

2.       ज्या कंपनीचे आपण शेयहोल्डर आहोत त्या कंपनीचे मेल्स वाचणे

3.       आपला शेयरहोल्डिंग विषयी घरच्यांना देखील माहिती देणे

वर दिलेल्या असंख्य चुका आपण कळत करत असतो. पण त्यामुळे लिगली आपले काय नुकसान होते किंवा काय होऊ शकते हे आज आपण पाहणार आहोत.

1.      शेयरहोल्डिंग पॅटर्न मधील स्वतःचे स्टेटस माहिती नसणे (मायनर / मेजर / प्रोमोटर )

जेव्हा एखाद्या कंपनीचा शेयर आपण घेतो तेव्हा त्या कंपनीच्या एकूण मार्केट कॅपिटलपैकी किती शेयर कॅपिटल आपण घेत आहोत हे समजणे फार महत्वाचे असते त्यानुसार शेयरहोल्डरचे राईट्स चेंज होतात. कारण पुस्तकात आपण अनेक वेळा वाचतो कि शेयरहोल्डर हा कंपनीचा मालक असतो पण त्याची निर्णय क्षमता हि त्यांच्या शेयरहोल्डिंगच्या पॅटर्नवर अवलंबून असते. स्मॉल इन्व्हेस्टर हा "मायनर या कॅटेगरीत मोडतो.  अशा अनेक स्मॉल इन्वेस्टरचे कंपन्यांच्या मेजॉरीटी शेयरहोल्डरकडून गळचेपी होऊ नये म्हणून त्यांना विशेष अधिकार देणारी "Minority Interest” हि कन्सेप्ट ओळखली जाते.

·         जर मायनर शेयरहोल्डर्स ना वाटत असेल कीं कंपनीमध्ये त्यांचा आवाज ऐकला जात नाहीये किंवा मेजॉरिटीच्या जोरावर मिसमॅनजमेंट होते आहे. तर १०० किंवा त्यापेक्षा जास्त किंवा टोटल शेयरहोल्डर्सच्या /१० मेंबर्स हे "नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अप्लाय करू शकतात.

·         कंपनीच्या बोर्डवर स्वतःचे रेप्रेसेंटेशन करण्यासाठी एक डायरेक्टरदेखील निवडून देऊ शकतात. त्याचा स्कोप जरी छोटा असला तरी मायनॉरिटी शेयरहोल्डर्ससाठी हि अत्यंत महत्वाची बाब आहे

अर्थात काही जण म्हणतील कि काय गरज आहे, आपल्याला फक्त शेयर्स विकून प्रॉफिट तर कमवायचा आहे . ज्यांना भारतातील वॉरेन बफे होण्याची स्वप्न पडतात त्यांनी नक्कीच NASDAQ वरील कंपन्या त्यांचे कॅपिटलायझेशन वॉरेन बफे यांच्या पोर्टफोलिओचा अभ्यास करावा असेच मी येथे सांगेन.

2.      ज्या कंपनीचे आपण शेयहोल्डर आहोत त्या कंपनीचे मेल्स वाचणे

पुढे वाढलेल्या प्राईसने विकता येतील म्हणून शेयर्स तर घेतो पण नंतर कंपन्यांनकडून येणाऱ्या मेल्सकडे अत्यंत दुर्लक्षही करतो. परंतु हे मेल्स वाचणे महत्वाचे देखील आहे कारण खालील गोष्टी या मेल्स मध्ये असू शकतात

a.       AGM ची नोटीस

b.      Change in Object Clause

c.       Board of Directors मध्ये असलेले बदल

d.      Right Issue किंवा Bonus बद्दल माहिती

e.       Dividend Policy

f.        Mergers किंवा acquisitions बद्दल होणारी माहिती

g.      या सगळ्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महत्वाचे असलेले E –Voting

येथे मी जरूर नमूद करिन कि जसे प्रॉफिट कमावणे महत्वाचे तसेच आपल्या एका मतामुळे काय फरक पडणार आहे असा विचार करता वोटिंग करणे देखील महत्वाचे आणि गरजेचे आहे. या ब्लॉग चे अनेक रेडर्स हे शेयर्समध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांनी प्रांजळपणे मला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगावे कि आम्ही नेहेमी वोटिंग करतो JJJ

3.      आपला शेयरहोल्डिंग विषयी घरच्यांना देखील माहिती देणे

परवा एका स्टुडंट चा फोन आला होता , त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांचे कपाट आवरताना काही शेयर सर्टिफिकेट त्याला मिळाली . त्याचे फोटो पाहिल्यावर लक्षात आले कि त्याच्या वडिलांनी १९९७ ला काही कंपन्यांचे शेयर्स घेतले होते कि जे अजूनही मटेरियल फॉर्म मध्येच आहेत . शेयर्स घेऊन जवळपास २३ वर्ष झाली आहेत पण घरच्यांना या बाबतीत काहीच माहिती नव्हती . तेव्हा कदाचित ते स्वतः २३ वर्ष्यांच्या काळात विसरले असतील किंवा घरच्यांना शेयर्समध्ये पैसे गुंतवणे आवडत नसल्याने तेव्हा सांगितले गेले नसेल विषय तसाच राहिला असेल . कारण काहीही असो अर्थात हे धक्कादायक होते.

अशी परिस्थती कमी अधिक फरकाने अनेक घरात असू शकते . पण आजच्या काळात काही सवयी आपण लावून घेणे महत्वाचे ठरेल.

a.       स्वतःच्या संपूर्ण प्रॉपर्टी ,इन्शुरन्स तसेच शेयर्स ची माहिती एक्सेल किंवा पर्सनल डायरीत मेन्टेन करणे. पिरियॉडिकली त्याचे स्टेटस आपल्या लाईफ पार्टनर सोबत डिस्कस करणे इष्ट ठरते.  रिव्यू कधी घ्यावा याचे सजेस्टेड टेबल देत आहे.

टाईप

साधारण वेळ

फ्लॅट्स, लँड

वर्षातून एकदा

इन्शुरन्स

सहा महिन्यातून एकदा

शेयर्स , गोल्ड

दर आठवड्याला

खर्च किंवा इनकमचे चेंज होत असलेले पॅटर्न

दर महिन्याला

 

माझी वाचकांना वारंवार हीच विनंती आहे कि ज्याप्रमाणे आपण सामाजिक स्टेटसचे भान ठेवून वागत असतो त्याप्रमाणे फिनान्शिअल स्टेटस बरोबर येणारी कर्तव्ये देखील तितकीच महत्वाची आहेत हे आपण नेहेमी लक्षात ठेवावे

 

 

Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)