प्रत्येक स्टुडन्ट, एम्पप्लॉयी , बिसनेसमन आणि टीचर्सनि वाचावा असा UN चा Trade Development Report 2020
“History repeats itself” अस म्हणतात पण नेमकी कशी काय बुआ ? याच उत्तर आपण आपल्या रुटीनमध्ये शोधायच्या भानगडीत पडत नाही पण काही वेळेस प्रसंग , वाचनात आलेल्या काही गोष्टी या म्हणीची हमखास आठवण करून देतात . २०२० मध्ये अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून organized किंवा unorganized सेक्टर्स मध्ये काम कारणारे , बिसनेसमन , फायनान्स इन्स्टिट्यूशन्स यांना अनाकलयनीय परिस्थितीशी तोंड देत मार्ग काढावा लागत आहे . कारण अशा complete लॉकडाऊन फेस करणारी हि पहिलीच वर्किंग जेनेरेशन असेल . UN चा Trade Development Report 2020 वाचताना देखील आपल्याला आत्ताच्या परिस्थितीचे वारंवार केलेले भूतकाळातल्या घटनांशी कंपॅरिझन ठळकपणे दिसते . हा ट्रेड रिपोर्ट साधारणपणे ६ वेगवेगळ्या भागांवर भाष्य करतो . THE FUTURE IS WHAT NOT WHAT USED TO BE ह्या रिपोर्टची सुरुवातच आपल्याला जाणीव करू देते कि आत्तापर्यंत जे आपण भविष्याबद्दल साधारण ठोकताळे बांधले होते त्यापेक्षा खूप वेगळे भविष्य आपली वाट बघत आहे . कदाचित अतिशय उ...