प्रत्येक स्टुडन्ट, एम्पप्लॉयी , बिसनेसमन आणि टीचर्सनि वाचावा असा UN चा Trade Development Report 2020

 “History repeats itself” अस म्हणतात पण नेमकी कशी काय बुआ ? याच उत्तर आपण आपल्या रुटीनमध्ये शोधायच्या भानगडीत पडत नाही पण काही वेळेस प्रसंग, वाचनात आलेल्या काही गोष्टी या म्हणीची हमखास आठवण करून देतात. २०२० मध्ये अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून organized किंवा unorganized सेक्टर्स मध्ये काम कारणारे, बिसनेसमन, फायनान्स इन्स्टिट्यूशन्स यांना अनाकलयनीय परिस्थितीशी तोंड देत मार्ग काढावा लागत आहे. कारण अशा complete लॉकडाऊन फेस करणारी हि पहिलीच वर्किंग जेनेरेशन असेल. UN चा Trade Development Report 2020 वाचताना देखील आपल्याला आत्ताच्या परिस्थितीचे वारंवार केलेले भूतकाळातल्या घटनांशी कंपॅरिझन ठळकपणे दिसते. हा ट्रेड रिपोर्ट साधारणपणे वेगवेगळ्या भागांवर भाष्य करतो.



THE FUTURE IS WHAT NOT WHAT USED TO BE

ह्या रिपोर्टची सुरुवातच आपल्याला जाणीव करू  देते कि आत्तापर्यंत जे आपण भविष्याबद्दल साधारण ठोकताळे बांधले होते त्यापेक्षा खूप वेगळे भविष्य आपली वाट बघत आहे . कदाचित अतिशय उत्तम  संधींनी भरलेले पण जुन्या चूकांना परत केल्यास माफ करणारं. IMF ने देखील या लॉकडाऊनला Great Lockdown असे म्हटले आहे तिथेच आपल्याला Great Depression ची आठवण येते.

जॉब्स आणि मार्केट

या काळात अनेक लोकांच्या जॉब्स वर गदा आली तर बऱ्याच लोकांना सॅलरी कटिंगचा सामना करावा लागत आहे. ILOच्या डेटा प्रमाणे ९० -१२० मिलिऑन लोक हे extreme poverty line कडे ढकलले गेले आहेत. Human Interaction काही काळ पूर्णपणे थांबल्यामुळे एक प्रकारे इकॉनॉमीला कोमा झाला असल्याचे  दिसते. 2021 मध्ये “V” shaped recovery दिसेल पण त्याबरोबरच AI च्या नव्या युगाची सुरुवात अतिशय दमदारपणे सुरु झालेली दिसते. त्याचाही परिणाम हा जॉब मार्केटवर नक्कीच जाणवायला लागेल. Repetitive jobs ची जागा हि रोबोट्स घेतील पण त्याच बरोबर critical thinking तसेच Highly skilled लोकांची डिमांड जास्त वाढेल. त्यामुळे इनकम गॅप हि अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Public and business Debts

एकीकडे जॉब कटिंग होत असताना डेट अर्थात लोन्स थकवण्याचे (Repay करणे) वाढते प्रमाण हे इकॉनॉमीसाठी अतिशय धोकादायक आहे. एकीकडे गव्हर्मेन्टचा टॅक्स रेव्हेन्यू कमी झालेला आहे तर दुसरीकडे कंपन्या ह्या नवीन ऑर्डर्स साठी झगडत आहेत. एक्सपोर्टस वर तर खूप मोठा परिणाम झाला आहे. इथे केवळ सॅलरी कटिंग किंवा जॉब कटिंग हे उत्तर नसून तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरला मिळून ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

Welfare & Public spending

आपल्याला ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाकडेही लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. इकॉनॉमिकल अनरेस्ट हा जगभरात एन्व्हायर्मेंट स्ट्रेस हा वाढवत आहे. Income inequality, future बद्दलची insecurity समाजावर मोठाच परिणाम करू शकते. 2008 च्या Financial Crisis नंतर चे जग हे regionalisation कडे गेले . या दहा वर्षात झालेल्या अनेक शोधांमुळे , जीवनशैलीत झालेल्या चेंजेसमुळे “Hyper globalised” झालेल्या जगाचा नव्याने विचार करावा लागेल. या सगळ्यातून कदाचित आत्तापर्यंत वापरलेल्या Theories, घेतलेलं डिसिजन्स एकदा परत नव्याने लक्षात घ्यावे लागतील . असे सांगताना Classical Economist Adam Smith (1723 – 1790), John Maynard Keynes (1883 – 1946) किंवा World War II नंतरच्या पुनर्वसनाचा आराखडा मांडणारा “Marshal Plan” यांचे report मध्ये उल्लेख हे अधिक विचार करण्यास भाग पाडतात.

या सगळ्या परिस्थितून बाहेर पडण्यासाठी रिपोर्ट मध्ये उहापोह केलेला दिसतो. त्याला नाव देखील एखाद्या Hollywood थ्रिलर मुव्हीला शोभेल असेच दिले आहे

THE GREAT ESCAPE - काही ठळक मुद्दे 

1.      गव्हरमेंटचा सक्रिय सहभाग हा रिकव्हरी फास्ट करण्यात अधिक मदत करेल. पण हे करताना एक अँप्रोच पूर्णपणे बदलूनच काम करावे लागेल. पब्लिक सर्विस लायेबिलिटी नसून उत्तम रिटर्न्स देणारी “Investment” आहे हे समजून काम आणि काळाचे गणित आखावे लागेल.

2.      आता जरी जॉब मार्केट अनस्टेबल असले तरी भविष्यात मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी याच लोकांची गरज लागणार आहे हे लक्षात घेऊन जॉब मार्केटमधील इन्सिक्युरिटी काढण्यासाठी खास पावले उचलावी लागणार आहेत.

3.      सेंट्रल बँकना (भारताची RBI) केवळ Inflation Target वर फोकस्ड राहता  अनेक फायर फायटिंग सिचुएशन्स ना  सामोरे जाण्याचे प्लॅन्स वर काम करावे लागेल. डेट रिकव्हरी आणि क्रेडिट मॅनॅजमेण्ट हा सेंट्रल बँकांसाठी crucial टास्क असेल.

4.      Global Health Crisis मध्ये माणसाचे आयुष्य आणि त्याच्या ऍक्टव्हिटी मधून होणारा इकॉनॉमिकल प्रॉफिट याचे गुणोत्तर पूर्ण चेंज होते किंवा बिघडते. परिणामी इकॉनॉमी चा डोलारा हा अनस्टेबल होतो. अशावेळेस स्ट्रॉंग Public Finance Policy अनेक सेक्टर्स ना बळ देऊन जाईल

खरंतर 165 पानांच्या रिपोर्टची पेजेस मध्ये समरी बनवणे अवघड आहे पण जी गोष्ट रोजच्या आयुष्यसाठी आवश्यक आहे तीच नेमकी आपल्याकडून वाचली जात नाही त्यामुळे खास हा प्रयत्न केला. तुमच्या रेफेरेंन्स साठी UN चा रिपोर्ट देखील अपलोड करत आहे. शेवटी एवढेच म्हणेन २०२० ने अनेक नव्या गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडले आहे, कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आपण कामे  करत होतो तसे करून चालणार नाहीत आणि आत्ता जरी करत असाल तरी नजीकच्या काळात चेंज हा inevitable आहे. अर्थात त्यातूनच अनेक developing countries ह्या संधीचा फायदा घेऊन अथक परिश्रम करून आर्थिक महासत्ता बनतील यात शंका नाही.

जाता जाता हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी मात्र नक्की आठवतात………………

अथिरता पर समय की मुस्कुराना कब मना है I
है अँधेरी रात पर दीपक जलाना कब मना है।

Click and download file Trade and development report 2020

Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा