Honest efforts for educating & Prospering Common man
Computers have made the financial system so
complicated that few humans can understand it. As AI (Artificial intelligence)
improves we might soon reaches to a point when no human can make a sense of
finance any more.
-
Yuval Noah Harari
हे वाचल्यावर, फिनान्स प्रोफेसर असूनसुद्धा दोन मिनिटे मला जरा दचकायलाच झालं . कुटुंब
चालवण्याकरता पैसे कमावणे व भविष्यासाठी साठवणे , हि
तर आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट..... आणि
काही वर्षांनी तीच समजेनाशी होईल आपल्या कॉमन मॅनला ??? पण
लक्षात आलं कि
काहीशा प्रमाणात तर हे आत्तादेखील सुरु आहे. खूप अक्कलहुशारी वापरून, कष्ट करून आपण पैसे कमावतो , पण
हेच पैसे खर्च करताना किंवा इन्व्हेस्ट करताना आपण कमावताना दाखवलेला चौकसपणा , दिलेला
वेळ देतो का ? नक्कीच
नाही ! बऱ्याचदा
आपले फिनान्शिअल डिसिजन हे दुसऱ्याला आपण किती Mr/Ms
Richie Rich आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेले असतात अथवा ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांना blindly follow करून
घेतलेले असतात.थोड कडू आहे पण हेच खरं आहे , आपल्याला
नक्की पटेल जेव्हा हा ब्लॉग वाचता वाचता तुमची नजर आता वापरात नसलेल्या so
called parked assets वर जाईल
...किंवा फॅशनच्या नावावर घेतलेले भरमसाठ कपडे कसे कपाटात पडून आहेत हे बघाल………..
तुम्ही असाही प्रश्न मला विचारू शकता कि मग आम्ही मिळवलेले पैसे आम्ही आम्हाला पाहिजे तसे खर्च करू नये का ?
अहो करा कि पण Financial Management ची
डेफिनेशन आता थोडी बदलून शिकूया . Financial Management म्हणजे इन्वेस्टमेन्टवर
मॅक्सिमम रिटर्न
देणारे टूल नसून आपल्याला "पैसे मिळवायला लागणारा वेळ"
आणि "फॅमिलीला देता येणार वेळ"
यांचं proportion सुधारणारं
एक टूल आहे असं समजूयात
. अर्थात वर
लिहिलेली दोन्ही variables हि
indirectly related आहेत हे आपण जाणताच . (एक
वाढला कि एक कमी )
या ब्लॉग मधून आपण finance, economics, accounts, taxation अशा
अनेक विषयांवर बोलणार आहोत पण त्याचबरोबर फक्त रुक्ष आकडे न बघता individual goals , feelings यांचाही
विचार करूनच !!!. हा
ब्लॉग फिनान्स experts साठी
नाही, हा ब्लॉग आहे वॉरेन Buffet यांच्यावरील
documentary बघितल्यावर आपणही
"वॉरेन Buffet" झालोय
अशी भाबडी दिवास्वप्न
पाहणाऱ्या माझ्या सध्या माणसांसाठी ....... म्हणूनच
मी तो "मिंग्लिश
" मध्ये लिहीत आहे
माझी वाचकांना एकच विनंती आहे, तुम्ही सगळे आपापल्या working sector मध्ये
Expert आहात कारण अनेक वर्ष
तुम्ही त्याचा
अभ्यास करत आहात . त्यातून
उत्तम पैसेही कमावत आहात . तेव्हा
कुठल्याही जाहिरातबाजीला बळी न पडता पैशाचे decision घेताना
नक्कीच एक्सपर्टची मदत घ्या. परंतु एवढे knowledge मिळवा
जेणेकरून communication आणि
understanding चांगले होईल .
या ब्लॉग मधून आपण प्रत्येक संडेला (रविवारी ) एक
नवीन विषय, कन्सेप्ट घेऊन ती discuss करू.
तुम्हाला काही
Questions असतील किंवा अगदी काही वेळेस इन्शुरन्स / mutual fund एजन्ट्सशी
बोलताना काही जेट डोक्यावरून उडाली असतील तर नक्की तुम्ही विचारा .
तर भेटूयात पुढच्या रविवारी एक नवीन विषय घेऊन !!!
Q. मी माझ्या salary च्या 1/4 रक्कम mutual फंडात गुंतवणूक करतो. त्यांचे दर महिना काही ना काही mails येत राहतात. त्यातले payment reminder आणि amount received चेच mails नीट समजतात.
ReplyDeleteNAV म्हणजे काय आणि share market मधील चढ-उतारांमुळे मला मिळणार्या returns वर काय फरक पडतो?
सुरवात छान झाली आहे ,यापुढचे sunday ब्लॉग आवडेल वाचायला ,नवीन शिकायला मिळेल,धन्यवाद
ReplyDeleteWell started! Keep writing!!
ReplyDeleteGood job
ReplyDelete