आपल्या भावना , अपेक्षा आणि फिनान्शिअल रिऍलीटीज

गेल्या आठवड्यात आपल्या सगळ्यांच्या डिक्शनरीत एक अतिशय पॉझिटिव्ह वर्ड ऍड झाला , तो म्हणजे "आत्मनिर्भर भारत ". पण एक विचार  नक्की मनात आला गव्हर्नमेंट तर खूप कष्ट घेत आहेवेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत आहे पण त्या समजून घेऊन त्यानुसार आपले उत्पन्न  खर्च यामध्ये बदल करायची आपली तयारी आहे का ??  येणार काळ जितका पॉझिटिव्ह  आणि उत्तुंग यश देणारा आहे तसेच हा स्केल मिळवण्यासाठी स्वतःमध्येजीवन शैलीत बदल करण्यास भाग पाडणारा देखील आहेखर तर ब्लॉगच्या वाचकांनी  शेयर्स , Mutual Fund याबद्दल अनेक  प्रश्न विचारले होते.

पण आत्ताची खरी गरज आहे ती येत्या  महिन्यात आपल्याला जे जीवन शैलीत काही आवडणारे  किंवा  आवडणारेदेखील चेंजेस करावे लागतील  त्यांचा आपल्या फिनान्शिअल behavior वरतसेच आपल्या कॅश मॅनॅजमेन्ट वर कसा परिणाम होईल हे जाणून घेण्याची , शिकण्याचीअर्थात हे बघण्यासाठी आपण  केस स्टडी एप्रोच वापरूयात . या ब्लॉग च्या शेवटी एक एक्सेल File तुम्हाला मिळेल ती तुम्ही तुमची कॅश मॅनॅजमेण्ट करण्यासाठी वापरू शकता पण पूर्ण ब्लॉग समजून घेतल्यावरच.

आता आपण सगळेच एका economically confused परिस्थतीतुन जात आहोत . पुढे नक्की काय करायचे हे कोणालाच कळत नाहीयेअशावेळेस कुटुंबाचे आई - बाबा (येथे मी दोघांना पालनकर्ते या नात्याने शब्द वापरला ) म्हणून आपण आपल्या कुटुंबाची काळजी कशी घेऊ शकू याचा विचार केला पाहिजे तसेच त्याप्रमाणे आपला प्लॅन हा पुढील किमान सहा महिने ते एक वर्षांसाठी रेडी पाहिजे.

पण प्लॅन रेडी करायचा म्हणजे नक्की कायकसा विचार करायचा ? दर महिन्याला तर आम्ही महिन्याभराचा खर्च लिहून ठेवतो आणि मग ते पुढच्या महिन्याशी compare करतो ते पुरेसे नाही का?

जेव्हा आपण कोणतेही प्लांनिंग करत असतो (अगदी ट्रिप चे का असेनात्याचे ०६ भाग पडतात

भूतकाळात follow  केलेले  फिनान्शिअल वर्तन जो आपल्या पैशांच्या transaction चा ट्रेंड दाखवेल
भूतकाळातील केलेल्या transactions (व्यवहाराचेचे Analysis करणे
. Near Future (नजीकच्या भविष्यकाळातील ) अपेक्षित changes (खर्च , इनकम  किंवा नोकरीत देखील )
. changes  ना accept आणि adapt कसे करायचे या विषयीचे धोरण
आपल्या कुटुंबातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना या धोरणाचा सदस्य बनवणे , त्यांना टीमचा पार्ट बनवणे
. Actual Situation Face करणे अर्थात परिस्थितीला सामोरे जाणे

आपण एक केस स्टडी घेऊयात.

अभय हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करत आहेत . त्यांची बायको नूतन हि एका Private शाळेत नोकरी करते . मोठा मुलगा हा हॉटेल मॅनॅजमेण्टचा कोर्स करत आहे तर छोटी मुलगी हि FY Bcom ला असून CA Foundation ची तयारी करत आहेगेल्या तीन महिन्यात अंदाजे मार्च एण्डपर्यंत अभय आणि अभय यांच्या कुटुंबाचे फिनान्शिअल behavior कसे होते हे जाणून घेऊयात.

माहिती
जानेवारी
फ्रेबुवारी
मार्च
मागील महिन्याची शिल्लक
0
3,000
2,200
इनकम साईड
अभयचा नेट पगार
45,000
45,000
45,000
नूतनचा नेट पगार
35,000
35,000
35,000
मिळणारे इंटरेस्ट / डिवीडेंट
6000
टोटल इनकम
80,000
83,000
88,200
खर्चाची साईड
रिकरिंग खर्च (वारंवार होणारे )
फ्लॅटचे रेंट + सोसायटी चार्जेस
12500
12500
12500
घरकाम करणाऱ्या मावशींचा पगार
4000
4000
4000
पेट्रोल आणि मेन्टेनन्स
8000
10000
6000
फॅमिली शॉपिंग
6500
8500
4000
किराणा + दूध + भाजी
8000
9500
11500
मूवी आणि डिनर चार्जेस
8000
9500
6000
मोबाईल + इलेक्ट्रिसिटीनेटफ्लिक्स
3000
3500
4500
एकूण रिकरिंग खर्च
50000
57500
48500
नॉन रिकरिंग (कधीतरी होणारे )
वॉटर प्युरिफायरची खरेदी
11000
इन्शुरन्स प्रीमियम (हाफ इयरलि )
15000
माइक्रोवेव्हची खरेदी
12300
एकूण नॉन रिकरिंग खर्च
11000
12300
15000
सेविंग्स
रिकरिंग डिपॉजिट
5000
5000
5000
Mutual फंड SIP
6000
6000
6000
मुद्दाम घरात राखून ठेवलेली कॅश (LIQUID ASSET )
5000
0
5000
एकूण सेविंग्स
16000
11000
16000
शिल्लक पगार
3,000
2,200
8,700


वरील फिनान्शिअल तपशिलावरून आपल्याला सहज कळते कि अभय हे एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेतपरंतु मार्चनंतर बदलेल्या परिस्थतीमुळे त्यांच्या फिनान्शिअल behaviour मध्ये काय चेंजेस येतील किंवा काय करावे लागतील हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जाणून घेऊयात . तोपर्यन्त वाचकांना माझी नम्र विनंती आहे कि ब्लॉगखाली दिलेली एक्सेल फाईल डाउनलोड करून तुमचा स्वतःचा  महिन्यांचा फिनान्शिअल तपशील तयार करापुढच्या ब्लॉगमध्ये बघुयात अपेक्षित बदल आणि त्याचे कौटुंबिक फिनान्शिअल परिणाम !!!


Click here to download the excel file Excel working



मी परत एकदा सर्व वाचकांचे मनापासून आभार मानते , पुढच्या आठवड्याचा ब्लॉग हा प्रत्येकाला कुटुंबप्रमुख म्हणून अतिशय महत्वाचा आहेत्यामुळे तुम्हाला काही प्रश्न पडले असतील कंमेंटमध्येफेसबुकवर  किंवा managingrupaya@gmail.com मेल करा.
(I am happy to announce the English version of blog “Managing Rupaya” under name “Simple ways for Managing Rupaya” on every Thursday on the following link https://simplewaysformanagingrupaya.blogspot.com/)






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा