सोने घेऊ, चांदी घेऊ कि शेयर्स घेऊ ? (Sone gheu, chnadi gheu ki shares gheu?)


मागच्या आठवड्यात आपण पुढच्या सहा महिन्यात कसे वागले पाहिजे, कुठले खर्च केले पाहिजेत, कुठे पैसे वाचवले पाहिजेत हे बघितले. त्याचबरोबर बरेच वेळा न्यूज चॅनेल बघताना आपल्याला असे दिसून आलं की सोन्याचे रेट हे दिवसागणिक वाढत आहेत.पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फक्त आत्ताच होतय का आधीही झालेले आहे ? शेअर मार्केट आणि गोल्ड अर्थात सोन्यामध्ये खरच काही रिलेशन आहे?
भारतातले लोक हे नेहमीच सोन्याला एक अलंकार मानता बहुत करून इन्वेस्टमेंटच मानतात. आज आपण बघणार आहोत नक्की सोन्यामध्ये आणि शेअर्समध्ये जर इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला खरंच रिटर्न्स मिळतात का? किंवा या दोघांमधील कुठल्या इन्वेस्टमेंट मध्ये आपल्याला जास्त रिटन्स मिळतील?

यासाठी मी सोन्याचे रेट डाऊनलोड केले आहेत तसेच निफ्टी50, सेंसेक्स यांचा मॅक्सिमम इयरचा डेटा हा डाउनलोड केला आहे. निफ्टी फिफ्टी इंडेक्स हा भारतातील NSE वरील टॉप फिफ्टी परफॉर्मिंग कंपन्यांचा बनवलेला असतो तर सेन्सेक्स इंडेक्स मध्ये भारतातील BSE वरील टॉप 30 कंपन्या घेऊन इंडेक्स बनवतात. त्यामुळे रिसर्चर्स बऱ्याचदा निफ्टी 50 किंवा सेन्सेक्सला भारताचा ग्रोथ इंडिकेटर देखिल मानतात.

आता आपल्याला फायनान्शिअल डेटा हा खूप मोठ्या प्रमाणावर फ्री ऑफ कॉस्ट वेगवेगळ्या वेबसाईट्सवर अव्हेलेबल आहे पण बऱ्याच वेळा हा डेटा कसा प्रोसेस करून समजून घ्यायचा हे मात्र आपल्याला कळत नाही. त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये सोन्याची किंमत आणि शेअर्स प्राईस यामध्ये असलेले रिलेशन समजून घेणार आहोत. जेणेकरून वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवर लागणाऱ्या फायनान्शिअल गरजा आपण आपल्या फायनान्शियल ऍडवायजरला  अतिशय उत्तम प्रकारे कम्युनिकेट करू शकतो.

केस : सोने-चांदी आणि प्लॅटिनमचा रेट

Date
Gold Rate per gram
Platinum rate per gram
Silver rate per gram
20-May-20
4,657.00
2,100.64
47.67
21-May-20
4,620.00
2,038.41
48.20
22-May-20
4,625.00
2,043.25
48.25
23-May-20
4,626.00
2,043.25
48.35
24-May-20
4,627.00
2,043.25
48.36
25-May-20
4,627.00
2,054.35
51.40
26-May-20
4,596.00
2,019.13
48.00
27-May-20
4,596.00
2,042.50
48.70
28-May-20
4,586.00
2,036.61
47.91
29-May-20
4,593.00
2,037.16
47.91

लोकांनी आपल्या ओल्ड गोल्ड वरच जास्त विश्वास ठेवला तर त्यानुसार डिमांड वाढल्यामुळे गोल्ड प्राइस प्लॅटिनम पेक्षाही वरचढ ठरत आहे.

केस : सोने, निफ्टी फिफ्टी, सेन्सेक्स यांचे रिटर्न्स केलेली कम्पॅरिझन


या केस मध्ये आपण एक सामायिक टाईम लाईन घेऊन अर्थात सामायिक वर्ष घेऊन गोल्ड रेट, निफ्टी फिफ्टी आणी SENSEX मध्ये झालेला गेल्या वर्षीच्या तुलनेतला फरक काढला आहे.
* २००८ ते २०१९ पर्यंत सोन्याचा रेट, निफ्टी ५० , सेन्सेक्स यांचा वार्षिक ऍव्हरेज घेतले आहेत. २०२० ला लेटेस्ट डेटचे (२९ मे)चे आकडे घेतले आहेत कारण पूर्ण वर्ष अजून झाले नाहीये.

वरील चार्टमध्ये हे स्पष्ट होते की निफ्टी50, सेंसेक्स हे अगदी हातात हात मिळवून पुढे जात आहेत. निफ्टी 50 - सेन्सेक्स आणि गोल्ड यांचे रिटर्न कॅल्क्युलेट केले तर दोघांमधील रिलेशन हे इनडायरेक्ट आहे. सोन्याचे भाव वाढलेले आहेत तेव्हा दोन्हीहि इंडेक्स हे मागच्या वर्षीच्या तुलनेत पडलेले आहेत . जेव्हा दोन्ही इंडेक्स वर आहेत तेव्हा मात्र सोन्याच्या भावामधील वाढ हि इंडेक्स पेक्षा कमी आहे.
हे ठळकपणे २००८, २०११ आणि २०२० मध्ये दिसून येत आहे. जेव्हा SENSEX आणि निफ्टी ५० मध्ये पडझड झाली आहे तेव्हा मात्र सोन्याच्या भावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त वाढ झालेली दिसते . ह्याच्या करेक्ट उलटी सिचुएशन आपल्याला २०१४ मध्ये दिसून येईल

त्यामुळे वाचकांनी समजून घ्यावे जरी तुम्ही उत्तम प्रकारे तुमचा शेअर्समध्ये पोर्टफोलिओ बनवला असेल तरी गोल्ड चे महत्व कधीही कमी होत नाही.याचे महत्त्वाचे कारण आहे की अजूनही शेअर्समध्ये गुंतवणूक करणारा वर्ग हा गोल्ड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या वर्गापेक्षा छोटा आहे. किंवा जेव्हा शेअर्समध्ये पडझड होते तेव्हा इन्वेस्टर शेअर्स मधला पैसा काढून हा ओल्ड ट्रस्टेड इन्व्हेस्टमेंट अर्थात सोने यामध्ये गुंतवतात. आपण आताही बघत असाल की शेअर्स मध्ये झालेल्या पडझडीमुळे लोकांनी शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे काढून हे  सोन्यात गुंतलेले आहेत किंवा  त्याची एफडी  केलेली आहे.
शेवटी मी नक्की हेच सांगेन कि सहा महिन्याने जेव्हा तूम्ही पोर्टफोलिओ परत एकदा बनवायला घ्याल किंवा त्याचा रिव्ह्यू घ्याल, त्यावेळेस मात्र हा ब्लॉग परत एकदा वाचून आपल्या फायनान्शियल ॲडव्हायझरशी, पोर्टफोलिओ मध्ये असलेले गोल्ड आणि शेयर्स यांचे कंपोझिशन यावर नक्कीच चर्चा करा पुढील इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सुनिश्चित करा.

तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील वाचायची आवड असेल तर माझा Simple Ways for Managing Rupaya हा ब्लॉग देखील खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही वाचू शकता https://simplewaysformanagingrupaya.blogspot.com/2020/05/our-needs-aims-and-actual-financial.html



Comments

  1. नमस्कार,
    उपरोक्त लेखामधील माहिती अत्यंत उपयुक्त आहे. त्याबाबतीत मला दोन प्रश्न विचारावेसे वाटतात.
    1. सोन्या / चांदी मध्ये गुंतवणूक कोणत्या स्वरुपात करावी? बॉन्ड्स, ज्वेलरी का शुध्द सोने / चांदी?
    2. ती गुंतवणूक मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक केल्यास त्याचे कोणते वेगवेगळे परिणाम येऊ शकतात?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा