केलेल्या transactions (व्यवहाराचे) चे Analysis आणि Near Future (नजीकच्या भविष्यकाळातील ) अपेक्षित changes
मागच्या ब्लॉगमध्ये आपण अभय आणि त्यांच्या कुटूंबांचे फिनान्शिअल वर्तन साधारपणे ३ महिन्यासाठी बघितले . मला अगदी मान्य आहे कि बऱ्याच लोंकाना रुपये ८०,००० प्रति महिना इनकम हे मध्यम वर्गात मोडते हे वाचून धक्का बसला असणार पण नव्या जगात हे इनकम मध्यम वर्गाचे प्रतिनिधित्व करते. तसेच जाणीवपूर्वक प्रामुख्याने मध्यम वर्गाला समोर ठेवून
केस घेतली, कारण ज्यांचे त्यापेक्षा इनकम खाली आहे अशा
लोकांपर्यंत हा ब्लॉग खूप कमी प्रमाणात पोचतो आहे (खरंतर या लोकांना या ब्लॉगची जास्त गरज आहे . माझी वाचकांना विनंती आहे कि हा ब्लॉग त्यांच्या पर्यंत पोहोचवावा ) आणि उच्चमध्यम किंवा त्याहीपेक्षा वरील गटात मोडतात अशी लोकं फिनान्शिअल एक्स्पर्ट नेहमीच अँपॉईंट करतात . त्यामुळे आजचा ब्लॉग हा अशा माझ्या सगळ्या लोकांसाठी आहे जे नेहमी प्रामाणिकपणे टॅक्स भरतात आणि फिनान्शिअल एक्स्पर्टचा त्यांचा संबंध फक्त या इनकम टॅक्स रिटर्न वेळेसच येतो . परंतु लक्षात घ्या आजपासून काही प्रमाणात तुम्ही देखील एका फिनान्शिअल एक्स्पर्ट प्रमाणे विचार करायला लागणार
आहात.
तुमच्या समोर अभय आणि त्यांच्या कुटुंबाचे फिनान्शिअल तपशील आहेत असे मी मानते (नसल्यास मागील ब्लॉग वर जाऊन तुम्ही एक्सेल फाईल डाउनलोड करू शकता.
येत्या चारपाच महिन्यात मध्यम वर्गीय माणूस एकदम इनकम वाढवू शकत नाही पण आहे ते खर्च नीट समजून घेऊन ते नियंत्रणात आणून भविष्यात एखादा नवीन इनकम Source वाढवण्याचा प्लांनिंग नक्की करू शकतो. पुढच्या सहा महिन्यांचा विचार करताना वाचकांनी लक्षात घ्यावे कि पुढचे सहा महिने हे आपण "सर्वायवल" या हेतूने बघणार आहोत. कारण बऱ्याच इकॉनॉमिस्टनि भारताची V शेप्ड रिकव्हरी होईल असे सांगितले आहे पण V च्या " / " हि
साईड (ग्रोथ साईड ) मिळेपर्यंत सर्वायवल होणे महत्वाचे.
खर्चाची विभागणी
आणि नियंत्रण
प्रथम आपण अभय यांच्या खर्चाची विभागणी खालील चार्ट मध्ये बघुयात.
या परिस्थतीमध्ये पुढचे सहा महिने, तुलनेने अनावश्यक अशा मोठ्या किमतीच्या गोष्टी खरेदी करणे (कधीतरी होणारे खर्च) पूर्णपणे टाळले पाहिजे. वारंवार जे खर्च होतात त्याचे अधिक विश्लेषण करणे महत्वाचे आहे कारण त्यातूनच आपण पुढच्या नजीकच्या भविष्यासाठी फंड उभा करू शकतो किंवा एखादे नवीन उत्पन्न देणारे इनकम रिसोर्स तयार करू शकतो.
येथे वाचकांनी आपापल्या फिनान्शिअल तपशील बघून अनावश्यक खर्च टाळून न दिसणाऱ्या खर्चासाठी दर महिना पैसे बाजूला काढून ठेवलेलं अधिक चांगले.
Saving, इन्शुरन्स
किंवा Mutual Fund चे
काय करायचे
???
सेविंग्स : आपण करत असलेले सेविंग हे गरज पडल्यावर सहज मोडता (लिक्विडेट करता) येणार असेल व त्याची मोडतानाची किंमत हि किमान इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंट
एव्हढी असेल तर RD , FD सुरु ठेवायला हरकत नाही.
इन्शुरन्स : इन्शुरन्स
चे दोन
प्रकार आहेत
१. मेडिक्लेम ( हॉस्पिटलच्या खर्चाचा भार कमी करणारा ) : सध्याच्या परिस्थितीत हा प्रीमियम भरणे अजिबात टाळू नये . या प्रकारच्या इन्शुरन्सचा प्रीमियम जरूर भरावा.
२. पेन्शन / प्लेन मनी रिटर्न : आत्ता आपण शॉर्ट टर्म सर्वायवल चा विचार करत असल्याने इन्शुरन्स एजन्टशी बोलून अशा प्रीमियमचे ३ -४ महिन्यांनी पेयमेन्ट केलेले उत्तम परंतु घेतलेले प्लॅन्स बंद करू नयेत कारण त्यामुळे आपला लॉन्ग टर्म मध्ये लॉस होऊ शकतो.
Mutual Fund / shares मधील
इन्व्हेस्टमेंट
१. आधीपासून केलेली इन्व्हेस्टमेंट : आपला आधीपासून पोर्टफोलिओ असेल तर आत्ता तो
विकायची ( गरज नसल्यास) घाई करू नये . तो तसाच ठेवावा. इकॉनॉमी रिकव्हर झाल्यावर तो नक्कीच आपल्याला प्रॉफिट मिळवून देईल
२. SIP : खरं तर
आत्ता शेयर मार्केट मध्ये झालेल्या पडझडीमुळे शेयर्स किंवा MF चे युनिट्स मागच्या वर्षीच्या सगळ्यात
कमी प्राईस मध्ये मिळत आहेत , पुढे येणारे एक्सपेन्सेस (खर्चाची ) प्रोव्हिजन (पैसे राखून ठेवले असतील ) तर SIP सुरु ठेवण्यास हरकत नाही परंतु डिसिजन घ्यायच्या आधी कोणते एक्सपेन्सेस आपल्याला करायचे आहेत हे खाली वाचावे आणि मगच डिसिजन घेतलेला चांगला.
Looking at Near Future - नजीकच्या
भविष्यकाळात बघताना
आता आपण बघुयात येत्या सहा महिन्यात आपल्याला कोण कोणते पेयमेन्टस देखील करायचे आहेत ,कारण ड्यू डेट (पैसे भरायची तारीख ) हि कदाचित पुढे जाईल पण पैसे भरणे तर अनिवार्य आहे. परिस्थितीशी जुळून घेताना जसे काही खर्च कमी होतील तसेच काही वाढतीलदेखील याची जाणीव आपल्याला पाहिजे. चला तर बघुयात हे कोणते
खर्च वाढतील किंवा कमी होतील.
टॅक्स लायेबिलिटी
सगळ्यांनी इथे लक्षात घ्यावे मार्च २०२० पर्यंत जो काही आपला इनकम आहे त्यावर पूर्ण टॅक्स हा भरायचा आहे, अर्थात ड्यू डेट (टॅक्स भरायची डेट ) हि
पुढे गेली आहे. इनकम टॅक्स बरोबरच स्वतःचा फ्लॅट असल्यास प्रॉपर्टी टॅक्सदेखील भरायचा आहे.
मुलांची फीस
आणि गॅजेट्स
साधारणपणे शाळा सुरु झाल्यास येत्या तीन महिन्यांमध्ये फीस देखील भराव्या लागणार आहेत . त्याचबरोबर सर्वानी लक्षात घ्यावे कि नवरा बायको दोघंही घरातून काम करणार असतील तर मुलांचा अभ्यास काही प्रमाणात हा ऑनलाईन असू शकेल,
त्यामुळे इंटरनेट packs तसेच पुरेशी गॅजेट्स घरी आहेत का ? हे चेक करणे महत्वाचे आहे . या मध्ये लैपटॉप , डेस्कटॉप , हेडफोन, राउटर इत्यादींचा आढावा घेणे महत्वाचे ठरेल.
ट्रॅव्हलिंग खर्च
, ईंटरनेट
चार्जेस आणि
घरी काम
करण्याऱ्या बाईंचा
पगार
वर्क फ्रॉम होममुळे ट्रॅव्हलिंगचा खर्च तसेच बाहेर खाण्याचा खर्च कमी झाला आहे परंतु त्याच बरोबर इंटरनेट चार्जेस , इलेक्ट्रिसिटीचा खर्च वाढला आहे . बाहेर खाणे बंद झाल्याने सगळ्यांनी "COOKING " रिडिस्कव्हर केले आहे परंतु येथे लक्षात घ्या जरी किराणा बिल वाढले असले तरी औटींगचा खूपच खर्च
कमी झाला आहे . थिएटर , नाट्यगृह बंद झाल्याने नवीन ऑनलाईन चॅनेल सुब्स्क्राइब केले जात आहे.
नोकरीत बदल
किंवा आहे
त्या जॉबमध्ये
कमी मिळालेली
सॅलरी
वरील बदलामुळे सगळ्यांना थोडा स्ट्रेस येणं स्वाभाविक आहे परंतु हा स्ट्रेस एकट्याने सहन न करता घरातील सगळ्यांना या परिस्थितीची जाणीव करून देणे व त्यावरील त्यांचे मत जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल . एक प्रोफेसर म्हणून माझा अनुभव आहे कि लहान मुले देखील अतिशय इनोवेटिव्ह आणि प्रॅक्टिकल विचार करून उत्तम मार्ग काढतात. इथे मी माझ्या दोन स्टुडण्ट्सचा उल्लेख जरूर करीन . या काळात देखील चिन्मय आणि अर्पितने समाजाला मदत होईल तसेच एम्प्लॉयमेंट देखील मिळेल असा एक स्टार्टअप सुरु केला आहे. तसेच नोकरीसाठी लागणारे नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा उत्तम
काळ आहे. मोठमोठ्या National / International इन्स्टिट्यूशननि नाममात्र
फीस मध्ये तर काहींनी Free ऑनलाईन कोर्सेस सुरु केले आहेत
जास्तीत जास्त
स्वतःला आणि
आपल्या मुलांना
लहानपणापासून इंडिपेंडेंट
आणि टेक्नीकली
अपग्रेड करणे
महत्वाचे
गेले २ महिने आपण सगळी कामं सांभाळून ऑफिसची कामे देखील करत आहोत. भारतात सर्व साधारणपणे tech savvy असणं म्हणजे लेटेस्ट स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वापरणे असेच आहे . आता वॉशिंग मशीनच्या वापराच्या पुढे जाण्याची गरज आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे अनेक नवीन डिव्हायसेस उपलब्ध आहेत . माझी वाचकांना विनंती आहे कि थोडा Ubtech Lynx, Asus Zenbo,
Roomba by IRobot, Apia AI Robot Companion किंवा Alfawise Magnetic, प्रणव मिस्त्रीची "सिक्सथ सेन्स टेकनॉलॉजि " अशा अनेक प्रॉडक्ट्स चा अभ्यास करावा.
पुढील काळातील
नोकऱ्या किंवा
business करताना
वर दिलेल्या प्रॉडक्ट्स चा अभ्यास करताना IBM Watson, Google Brain, SAP Digital
Boardroom सारख्या अनेक सर्विसेसची माहिती करून घ्यावी .यावरून पुढील विकले जाणारे प्रॉडक्ट तसेच नोकऱ्यांचे स्वरूप थोड्या प्रमाणात आपल्या लक्षात येऊ शकेल. शक्य झाल्यास "इंडस्ट्री रेव्होल्यूशन ४. ०" याबद्दल माहिती करून घ्यावी .याचा उपयोग तुम्हाला स्वतःला तसेच तुमच्या मुलांना किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर येणाऱ्या पिढीला कसे तयार करायचे आहे याचा अंदाज नक्की येईल.
या ब्लॉग मध्ये फिनान्शिअल आकडे बघून करावे लागणारे किंवा होणारे चेंजेस आपण बघितले . असा म्हणतात कि जोपर्यंत आपण आपल्या आवडीनुसार लिविंग स्टॅंडर्ड मिळवत नाही तोपर्यंत फिलॉसॉफर न बनलेले चांगले, त्यामुळे "बिगारी ते मॅट्रिक” मध्ये " पु. ल.
" म्हणतात तसे लुळी पांगळी असली तरी चांगल्या मार्गाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न केलेला नेहमीच उत्तम...
मी माझ्या सर्व वाचकांचे आभार मानते जर तुम्ही इंग्लिशदेखील आवडीने वाचत असाल तर "Managing रुपया" च्या English version- “Simple ways
for Managing Rupya” ला
नक्की भेट द्या



Actually ma'am all things are really true in current situation and life style of people.
ReplyDelete