11th commerce मध्ये admission घेतलेल्या माझ्या छोट्या मित्र मॆत्रिणींसाठी
कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे ११ चे अकाउंट्स , मॅथ्स वगैरे विषयांचे क्लासेस सुरु देखील झाले असतील अर्थात व्हर्चुअल , त्यामुळे म्हटलं आज खास तुमच्याशी बोलूयात. मी जेव्हा कॉलेज मध्ये पहिल्यांदा जाणार होते तेव्हा रोजच्या कडक इस्त्री केलेल्या युनिफॉर्म पेक्षा मस्त कॅजुअल्स घालून कॉलेज मध्ये जात येणार म्हणून खूप खुश होते, पण शाळेने लावलेली शिस्त हि न विसरल्याने पुढचे शिक्षण नेहमीच सुकर झाले. बऱ्याचदा मी असा पहिले कि ११ ला मुलं आणि काही प्रमाणात पालकांचादेखील अँप्रोच कॅज्युअल असतो. खरंतर ११ वि हे फौंडेशन पक्के करण्याचे वर्ष आहे. बऱ्याच नव्या सब्जेक्टस्ची ओळख आपल्याला याच वर्षात होते आणि तेव्हाच जर आपण कॅज्युअल अँप्रोच ठेवला तर आपली शिक्षणाची इमारत हि पक्की होईल का ?
कॉमर्समध्ये आलेले बरेच लोक एकतर पुढे जाऊन प्रोफेशनल कोर्स करायचा किंवा सायन्स आवडत नाही म्हणून आलेले असतात . ज्यांना प्रोफेशनल कोर्स करायचा असतो तो सुद्धा साधारणपणे बारावीनंतर सुरु होतो आणि ज्यांचा असा काहीच विचार झाला नसतो अशा दोन्ही प्रकारच्या मुलांना ११ वि एक सुवर्ण संधी असते स्वतःची आवड तपासून पाहायची.
तुम्ही साधा हेडफोन विकत घेताना देखील वेगवेगळ्या E -commerce च्या वेबसाईटवर जाऊन फीचर्स , प्राईस चेक करून घेता , मला खरं सांगा तुम्ही एवढ्या चौकस पणे स्वतःला काय आवडतं हे बघितल आहे ? माझा दादा CA/CMA/CS/MBA आहे मस्त कार घेतलीये त्यांनी किंवा जवळच्या नातेवाईक MBA करायला मुलीला ऍब्रॉडला पाठवत आहे, मी पण पुढे जाऊन पाठवणार मुलांना , बऱ्याचदा अशा ट्रॅप मध्ये मुलांबरोबर पालक देखील फसत असतात.एक तुमच्या लक्षात आले असेल कि पुढचे कोणतेही शिक्षण हे इन्फ्लुएन्स खाली येऊन घेण्यापेक्षा वेगवेगळ्या ऑप्शन चा अभ्यास करून घेतलेलं कधीही चांगले. तुम्ही म्हणाल मग नक्की करायचे काय ?
११ वितच अजिबात ठरवू नका कि मला CA/CMA/CS or MBA करायचं आहे. कारण अजून तुम्हाला अकाउंट्स , इकॉनॉमिक्स यांची नीटशी ओळखही झालेली नसते , अनेक कॉमर्स च्या विषयांची तुमची तोंड ओळख होत असते. त्यामुळे हे विषय समजून घ्यायला वेळ द्या. एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंटरी किंवा इंटरनेट मटेरियल शोधण्याचा प्रयत्न करा.अभ्यासाबरोबरच हळूहळू उत्तम पुस्तके वाचायची सुरुवात करा कारण, तुम्हाला कॉलेज संपल्यावर तुमचे डाउट्स सोडवायला सर किंवा मॅडम प्रत्येक वेळेस असतीलच असा नाही. तेव्हा तुम्हाला हा पुस्तकांचा केलेला संग्रह नक्की मदत करेल . हे सर्व करताना तुम्हालाच हळूहळू समजायला लागेल कि कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करताना ताण न येत मजा येते. आणि माझी विनंती आहे कि अशाच सब्जेक्ट मध्ये तुम्ही सखोल कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पुढे जाऊंन तुम्हाला तुमचे काम हे कटकट किंवा कंपल्शन न वाटता एक आनंद देणारा टास्क वाटेल.
मला माहित आहे कि तुम्हाला व्हर्चुअल वर्ल्ड मध्ये जास्त राहायला आवडतं , अगदी दूर असलेल्या मामीशी देखील तुम्ही तुमच्या आई बाबांपेक्षा जास्त गप्पा मारता , पण त्या बरोबर एक टीचर म्हणून मला जाणवले आहे कि कधी कधी समोरा समोर बोलायला तुम्हाला येत नाही किंवा ग्रुप मध्ये बसून एकमेकांशी तुम्ही व्हाट्सअँप वर बोलत असता. आपल्याला जर एक उत्तम एम्प्लॉयी किंवा बिझनेसमन व्हायचे असेल ना तर समोरच्याशी कॉन्फिडन्टली बोलता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही घरी येणाऱ्या नातेवाईकांशी छान गप्पा मारायला सुरुवात करा , सध्या काय नवीन शिकत आहात किंवा अगदी ऑनलाईन लेक्चर मध्ये होणारे फनी किस्से त्यांना सांगा . एक सांगू का त्यांना पण तुम्हाला "किती मोठा /मोठी झाला /झाली आहेस ? मागे पहिला तेव्हा एवढासा होतास / होतीस " हा डायलॉग म्हणायचा कंटाळा येतो . त्यामुळे यावेळेस जेव्हा नातेवाईक तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतील तेव्हा mobile मध्ये डोकं ना घालता सोशल नेटवर्किंग ची प्रॅक्टिस घरापासून सुरु करा.
शेवटची अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जरी तुम्ही कॉमर्स आलेले असला तरी AI (Artificial Intelligence ) नि काम करायची पद्धत खूप बदलून टाकली आहे . आता तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टस मध्ये शिक्षण घेतलेल्या लोकांबरोबर काम करावे लागेल , त्यामुळे तुमचे कान हे नेहेमी उघडे ठेवा, जरी तुमचे आर्टस् किंवा सायन्सचे मित्र मैत्रिणी काही त्यांच्या सब्जेक्टस बद्दल सांगत असतील तर मन लावून ऐका , त्याचा कधी ना कधी तुम्हाला नक्की फायदा होईल.
कॉमर्स म्हणाल कि पुढे मागे फिनान्शिअल अनॅलिसिस आलेच त्यासाठी बेसिक एक्सेल, ऍडवान्सड एक्सेल वर प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. जर एक्सेल, ऍडवान्सड एक्सेल झाले असेल तर एखादी Python किंवा R सारख्या language चे इंट्रोड्युक्टरी कोर्स नक्की करा . मुलांनो येत्या काळात FINTECH हि एक मोठी stream तुम्हाला ओपन होणार आहे . त्यामुळे जेवढे स्वतःला आधीपासून तयार कराल तेव्हढे अधिक पुढे जाल .
आणि हो कॉलेज सुरु झाल्यावर कधीतरी आपल्या ग्रुप बरोबर कटिंग चहा आणि एक मस्त वडापाव खायला विसरू नका . इस्राईलमध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स हे कॉफी शॉप मध्ये सुरु झाले अस म्हणतात . एखादा उत्तम विषय सुरु असेल तर तुमच्या डिस्कशन मध्ये मॅडम किंवा सरांनाही सामील करून घ्या. एक नक्की लक्षात ठेवा काहीतरी छान आयुष्यात करायचं असेल ना तर हे पायाभरणीच वर्ष पूर्णवेळ time pass करत वाया घालवू नका. तुम्हाला अजून काही शंका असतील तर नक्की कंमेंट्स मध्ये लिहा किंवा managingrupaya@gmail.com वर mail करा.

All Points are True And Thanks for sharing useful information
ReplyDelete