पगार चांगला आहे पण महिन्याच्या शेवटी संपून जातो……पुरतच नाही काय करायचं?


या आठवड्यात Managing Rupaya https://managingrupaya.blogspot.com/ या ब्लॉग ची रीडरशिप एक हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. यासाठी मी सर्व वाचकांचे आभार मानते , असाच हा ब्लॉग सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी सहकार्य करा अशी नम्र विनंती.

पगार चांगला आहे पण महिन्याच्या शेवटी संपून जातो……पुरतच नाही काय करायचं?

साधारणपणे महिन्याच्या  शेवटच्या आठवड्यात प्रत्येक घरात चालणारा हा नवरा-बायको मधला संवाद. पगार जास्त असो किंवा कमी शेवटच्या आठवड्यात मात्र सगळ्यांनाच पुढच्या महिन्यातील पगाराची डेट ही नक्कीच आठवायला लागते. हे जर वारंवार होत असेल तर मात्र आपल्याला एक फायनान्स कन्सेप्ट समजून घेणे अगदीच गरजेची आहे.

जेव्हा आपल्याला पगार मिळतो ती असते आपली इन्कम साईड अर्थात  मिळकत. परंतु जेव्हा आपण तो पगार खर्च करायला लागतो तो आपण एका पेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी साठी वापरतो. ज्याच्यातून कधीकधी आपल्याला कॅश परतही मिळते किंवा आपण ती कॅश पूर्णपणे खर्च करतो. अशा या ट्रांजेक्शन ला "कॅश फ्लो" म्हणतात. जर तुम्ही कुठल्याही कंपनीचा वार्षिक (Annual) रिपोर्ट उघडून बघितला तर त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स शीट बरोबर तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट ही मिळेल. वाचकांनी येथे लक्षात घ्यावे असे कंपनीला कॅश फ्लो स्टेटमेंट बनवणे गरजेचे आहे तसेच एक इंडिव्हिज्युअल म्हणूनही आपले कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
हे कॅश फ्लो स्टेटमेंट करायचे काय बर फायदे मिळतील
. आपण नेमका पगार कसा खर्च करतो त्यातून किती नवीन उत्पन्नाचे रिसोर्स तयार करतोय हे समजून येईल
. भविष्यात एखादे लोन घ्यायचे असेल तर आपला पगार पुरेसा आहे का? आपण कुटुंबाचा खर्च EMI जाऊनही उत्तमपणे चालवु शकतो का याचा अंदाज आपल्या कॅश फ्लो चा अभ्यास करून समजून येईल

Individual साठी Cash Flow कन्सेप्टचा वापर कसा करता येईल हे बघुयात आणि त्याचा फायनान्शिअल डिसिजन घेताना वापर कसा करायचा हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी केसस्टडी घेऊयात.

सोहम हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याची बायको ही गृहिणी आहे. सध्या ते एका Rented फ्लॅटमध्ये राहत आहेत परंतु येत्या तीन-चार महिन्यात ते स्वतःचा फ्लॅट घेण्याच्या विचार करत आहेत. फ्लॅट घ्यायचा म्हटले की अर्थातच EMI आला. त्यामुळे सोहम या विचारात आहे की आपल्याला EMI परवडेल की नाही
सोहमचे फायनान्शियल मंथली डिटेल्स खालील प्रमाणे आहेत
माहिती
मंथली डिटेल्स Rs.
इनकम साईड
नेट पगार
80,000
इंटरेस्ट डिविडेंड
1500
टोटल इनकम
81,500
खर्चाची साईड
रिकरिंग खर्च (वारंवार होणारे )
फ्लॅटचे रेंट + सोसायटी चार्जेस
12,500
घरकाम करणाऱ्या मावशींचा पगार
4,000
पेट्रोल आणि मेन्टेनन्स
8,000
फॅमिली शॉपिंग
6,500
किराणा + दूध + भाजी
8,000
मूवी आणि डिनर चार्जेस
8,000
मोबाईल + इलेक्ट्रिसिटी+ नेटफ्लिक्स
3,000
एकूण रिकरिंग खर्च
50,000
नॉन रिकरिंग (कधीतरी होणारे )
वॉटर प्युरिफायरची खरेदी
11,000
सेविंग्स
रिकरिंग डिपॉजिट
5000
Mutual फंड SIP
6000
शिल्लक पगार
9,500

या वरील डिटेल्स वापर करून आपण सोहमचा पहिल्यांदा आत्ताचा कॅश फ्लो तयार करुयात. कॅश फ्लो हा तीन भागात क्लासिफाय केलेला असतो.

. कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी - मिळणारा पगार (Inflow) आणि महिन्याचा खर्च (Outflow)
. कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिविटी - इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवली जाणारी (Outflow) रिटर्न म्हणून मिळणारी रक्कम (Inflow)
. कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी – EMI साठी अव्हेलेबल असेलेली रक्कम



वरील कॅश फ्लो फ्लॅट घेण्याच्या आधीचा आहे. फ्लॅट घेतल्यानंतर डेफिनेटली खर्चा मध्ये फरक पडेल. असं समजा की EMI हा 35000 रुपये पडणार आहे. परंतु सोहमच्या आत्ताच्या कॅश फ्लो नुसार त्याच्याकडे फक्त Rs. ९५०० रुपयेच शिल्लक राहतात EMI साठी . मग आहे ती life -style maintain करून फ्लॅट घेणे त्याला कसे परवडेल ?
EMI साठी सोहमला Rs. २५५०० कमी पडत आहेत (३५००० - ९५००), परंतु खालील गोष्टी लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे

सेव करता येण्यासारखी कॅश
Rs
फ्लॅटचे रेंट
12,000
नॉन रिकरिंग पण टाळता येण्यासारखा खर्च वॉटर प्युरिफायरची खरेदी***
11,000
शॉपिंग मूवी यावर कमी खर्च करून
2,500
टोटल अव्हेलेबल कॅश
25,500
* **या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आधीच्या ब्लॉग वर जाऊन तुम्ही वाचू शकता
https://managingrupaya.blogspot.com/2020/05/transactions-analysis-near-future.html

 नवीन कॅश फ्लो कसा दिसेल हे समजून घेऊ.


आता सोहमला  दर महिना EMI हा life - style  मध्ये कुठलाही मोठा बदल करता सहजपणे भरू शकू असा नक्कीच आत्मविश्वास आला असेल. या केसवरून  आपल्याला कळलेच असेल कि कॅश फ्लो कसा का तयार करावा. स्वतःचा कॅश फ्लो तयार करा आणि मोठी स्वप्न पूर्ण करायच्या तयारीला लागा.




Comments

  1. Very nice ..Plz send the artical on what's up 9921111030

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा