घर स्वप्नातलं आहे पण सुरक्षित आहे ???


निसर्ग वादळांनी कोकण किनारपट्टीवर घातलेले थैमान सगळ्यांनीच बघितलं. मुंबई वाचली हे बघून जसे आपण आनंदात होतो त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर असलेल्या लोकांच्या राहत्या घरांची झालेली पडझड बघून आपल्या सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. खरंच स्वतःचं घर बांधताना माणूस किती धडपड करतो; किती हाल-अपेष्टा सहन करतो; कष्ट घेतो पण ते कायम सुरक्षित ठेवणं खरंच आपल्या हातात आहे? कारण काही वेळेस नैसर्गिक आपत्तीने किंवा माणसाच्या चुकीमुळे देखील घराचे नुकसान होऊ शकते अशावेळेस आपण आपले होणारे नुकसान कमी करू शकतो का? अर्थातच याला उत्तरहोआहे. नैसर्गिक किंवा माणसाच्या चुकांमुळे होणारे नुकसान आपण काही प्रमाणात इन्शुरन्स घेऊन कमी करू शकतो

बऱ्याचवेळा इन्शुरन्स म्हटले कि Mediclaim किंवा Plain Term Policies, गाड्यांचा काढला जाणारा इन्शुरन्स यावर जास्त चर्चा होते. आज मी तुमच्याशी discuss करणार आहे "Home Insurance" बद्दल आणि त्यातील काही भारतात अजून प्रचलित नसलेले परंतु जगभर लोक कव्हर घेऊन ठेवतात अशा प्रॉडक्ट्स बद्दल आपण बघूयात.

चार्ट : स्ट्रक्चरचे प्रकार आणि त्यावरील इन्शुरन्स

Home / Property Insurance

इंटरनेटवर काही इन्शुरन्स कंपन्यांच्या वेबसाईट  वर फेरफटका मारला तर तुम्हाला दिसेल कि बऱ्याचश्या कंपन्या या Manmade तसेच Natural calamities च्या नुकसानापासून संरक्षण देतात
आता बघुयात man-made आणि natural calamities म्हणजे नक्की काय?

वर दिलेल्या Calamities नि झालेले नुकसान हे इन्शुरन्सनि कमी करता येते. तसेच एक्ससेप्शन अर्थात इन्शुरन्स नाही मिळणार अशा कंडिशन्स वाचणे सुद्धा महत्वाचे . ढोबळमानाने मुद्दामुन स्वतः केलेले घराचे नुकसान किंवा युद्धामुळे झालेले नुकसान या गोष्टी इन्शुरन्समध्ये येत नाहीत. तरी पण प्रत्येक कंपनी नुसार नियमावली वेगळी असू शकते.


लँडलॉर्ड इन्शुरन्स
लँडलॉर्ड इन्शुरन्स हि त्यामानाने भारतात प्रचलित नसलेली कन्सेप्ट आहे . यामध्ये जर तुम्ही तुमचे घर रेंट वर दिले असेल तर टेनंटकडून  (ज्याला घर भाड्यानी दिले आहेजर काही घराचे नुकसान झाले तर ते भरून काढण्यासाठी इन्शुरन्स कव्हर घेता येते . काही कंपन्या जर टेनंटने रेंट वेळेवर दिले नसेल आणि  आपण काही लीगल ऍक्शन  घेतली असेल , तर लीगल ऍक्शनसाठी केलेला खर्च देखील कव्हर मध्ये भरून देतात. परंतु याप्रकारचा इन्शुरन्स प्रचलित होण्यासाठी अधिक काळ जावा लागेल.

टेनंट  इन्शुरन्स
वर दोन्ही दिलेले इन्शुरन्स हे होम ओनर अर्थात घरमालकासाठी  आहे , तर मग जे लोक रेन्टवर राहतात त्याच्यासाठी काही ऑप्शन आहे का इन्शुरन्स चा? कारण जरी घर तुमचे स्वतःचे नसले तरी त्यातील मौल्यवान वस्तू  या तुमच्या स्वतःच्या असतात ज्याला इन्शुरंस टर्म मध्ये कन्टेन्टस म्हणतात. टेनंटस आपल्या कन्टेन्टसचा इन्शुरन्स काढू शकतो. वर म्हटल्याप्रमाणे हा देखील कमी प्रचलित इन्शुरन्स कव्हर आहे.
आता मोटर वेहिकले ऍक्ट च्या नवीन नियमानुसार जसा प्रत्येक गाडीचा  इन्शुरन्स असणे कम्पलसरी आहे, त्याप्रमाणे आपण आपल्या घरासाठी याविषयी वरील  माहिती  घेऊन ठोस पाऊल उचलणे महत्वाचे ठरेल.
(जर तुम्हाला इंग्लिश वाचायची आवड असेल तर माझ्या "Simple Ways for Managing Rupaya" खालील लिंक वर क्लिक करून नक्की भेट द्या.  

Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा