सिनेमातून फायनान्सकडे ………………………………
परवा युट्युबवर मॅथेमॅटिकस वरची एक अत्यंत
सुंदर डॉक्युमेंटरी बघत होते आणि अचानक "विद्या बालन = शकुंतला देवी " असा ट्रेलर समोर आला. एकूणच बॉलीवूडमध्ये आता मॅथेमॅटिशिअन्स , टीचर्स हे कथेचा मुख्य भाग बनत आहेत, हे बघून खूपच छान वाटलं . पण फिनान्स शिकवणारे मुव्हीज आपल्याकडे बनले आहेत का? हा प्रश्न एक फायनान्स टीचर म्हणून किंवा तुम्हाला एक स्टुडन्ट म्हणून नेहमीच पडला असेल. आत्ता जर तुम्ही इंटरनेटवर सिम्पल सर्च केला कि "मस्ट मुव्हीज फॉर फिनान्स स्टुडंट्स " मला खात्री आहे कि तुमच्यासमोर किमान १५ मुव्हीज ची नावे येतील, पण बहुतांश ते हॉलीवूडचेच दिसतील. या ब्लॉग मध्ये काही जुन्या हिंदी मुव्हीज ज्या आपल्याला एंटरटेनमेंट बरोबरच फिनान्शिअल कन्सेप्ट्स शिकवतात ते आपण बघुयात.
Shree ४२०
– (1955)
Shree ४२०,
हा अतिशय सुंदर पिक्चर ......... आपल्याला मेनली आठवतो तो राज कपूर , नर्गिस यांचा सुंदर अभिनय व बहारदार गीतांमुळे . परंतु या मूव्हीमध्ये "१०० रुपयात घर " अशी " Ponzi
Scheme" यावर
सुद्धा फार सुंदर चित्रण केले आहे . Ponzi scheme म्हणजे इन्वेस्टमेन्टवर जास्तीत जास्त रिटर्न मिळवून देऊ असा भासवून घोटाळा करणारी Scheme. यामध्ये उंची लाइफस्टाइल जगण्यासाठी प्रिंसिपल , एथिक्स बाजूला
ठेवणारा तरूण , त्याला योग्य वाटेवर आणणारी त्याची प्रेयसी तसाच कमी पैशात स्वतःचे घर मिळणार म्हणून अशा लावून बसलेले सामान्य गरीब लोक यांचे भावविश्व अतिशय सुंदरपणे मांडलेलं
आहे. हा पिक्चर १९५५ ला release झाला होता . आज तब्बल ६५ वर्षांनी सुद्धा आपण जास्त रिटर्न्स किंवा कमी किमतीत प्रॉडक्ट्स मिळणार अशा अनेक गोष्टींमुळे फसलेल्या लोकांच्या न्यूज बघतो. त्यामुळे हा पिक्चर बघा आणि नॉर्मल रिटर्न्स, ऍबनॉर्मल रिटर्न्स आणि ग्रीड यामधला फरक समजून घ्या.
Ghar ghar ki kahani (1970)
घर घर
कि कहानी हा बलराज सहानी, निरुपमा रॉय , महेश कोठारे असे अनेक मोठे कलाकार असलेला फॅमिली ड्रामा
. आपले
बाबा तर खूप पैसे कमावतात पण आपले सगळे हट्ट पूर्ण करतच नाहीत.... असा रुसवा फुगवा हा सगळ्यांनीच अनुभवलेला आहे . हाही पिक्चर याच मुलांच्या रुसव्याने सुरु होतो . पण संपताना घरातील मुलांना Budget,
Budgetary control आणि टीम
स्पिरिट अशा अनेक गोष्टी शिकवून संपतो. १९९० नंतरच्या पिढीला "जा सिमरन जा , जिले अपनी जिंदगी " म्हणणारे बाबा जसे आवडले तसाच आपल्या मुलांना पैशाचे महत्व पटवणारे , चांगुलपणा व माणुसकी शिकवणारे आई
बाबा नक्की आवडतील यात शंका नाही.
मंजिल
(1979)
"
रिमझिम गिरे सावन.... सुलग सुलग जाए मन ..... " हे गाणं लागला कि आपल्यासमोर येते पेटी वाजवत गाणारी अमिताभ बच्चन यांची शांत मूर्ती. फार कमी लोकांना माहित असेल कि हे गाणं आहे " मंजिल " या पिक्चर मधील . आपला स्टार्टअप सुरु करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकास हा ३ तासांचा क्रॅश कोर्सच आहे . बिझनेस करताना किती चौकस असणे गरजेचे आहे तसेच कमिट केलेल्या गोष्टी पूर्ण करणे व त्यासाठी योग्य ते कष्ट घेणे , परिस्थीतिशी प्रसंग दोन हात करण्याचे धैर्य वाढवणारा हा मुव्ही आहे .
तसे पहिले तर आपल्याला
मुव्हीचे छोटे छोटे सीन्सही शिकवून जातात . “Mother India “मध्ये एक सिन आहे कि सुनील दत्तला कळत नसते कि एवढे पैसे भरूनही कर्ज फिटले का नाही ? तेव्हा त्याची बालमैत्रीण साधे दगड वापरून त्याला लोन आणि इंटरेस्टचे गणित समजावून सांगते . सोप्या भाषेत व साध्या आणि सहजपणे मिळणाऱ्या गोष्टी वापरून शिकवण्याचा १९५७ ला दाखवलेला हा उत्तम प्रयत्न म्हणून आपण बघू शकतो.
यावरून आपल्याला एक नक्की
कळाले आहे कि सिनेमातून निखळ आनंदाबरोबरच काही चांगलेही शिकता येते. त्यासाठी मात्र अलर्ट असणे महत्वाचे .... So रिडर्स " जागते रहो (1956)…… “.


We remember these movies for their cinematic experience. But there were very important financial messages. Good of you to bring them on radar!!
ReplyDeleteAwesome Mam 👌👌
ReplyDeleteखूप सुंदर माहिती वाचायला मिळाली
ReplyDelete