इमोशनल लोक आणि सेन्सेटिव्ह शेयर मार्केट
या महिन्याच्या एन्डला अमेझॉन प्राईमवर एक जिनिअस मॅथमॅटिशिअन "शकुंतला देवी" यांच्यावरचा मूवी रिलीज होत आहे. "सुपर ३०" नंतर असे विषय हाताळणारा एक मुव्ही म्हणून साहजिकच त्याचा मी ट्रेलर बघत होते. हा ट्रेलर संपतो एका टिपिकल इंडियन मेन्टॅलिटीवर भाष्य करून.
“We Indians are like that only DRAMA or nothing”. दोन मिनिट् मला खरतर हसू आले, कारण बऱ्याचदा आपण आपल्या रोजच्या जगण्यात देखील या गोष्टी अनुभवत असतोच. पण असे आपण इन्व्हेस्टमेंट्स करताना किंवा फिनान्शिअल डिसिजन्स घेताना इमोशनल होतो ? हे बघण्यासाठी एक डेटाबेसची गरज आहे,
त्यामुळे मी शेयर मार्केट चे
उदाहरण देणार आहे.
जेव्हा विशाल सिक्कानी रेसिग्नशन इन्फोसिसमध्ये दिले.
कोणी कुठल्या कंपनीमध्ये किती काळ काम करावे हा अगदी पर्सनल डिसिजन आहे, पण जर तुम्ही खूप मोठ्या हुद्द्यावर काम करत असाल तर याचा परिणाम अनेक गीष्टींवर होतो. १८ ऑगस्ट २०१७ ला
विशाल सिक्का यांची रेसिग्नेशन ची न्यूज व्हायरल झाली आणि दुसरीकडे शेयर मार्केटमध्ये पण त्याचे पडसाद
दिसायला लागले.
त्रयस्थ पणे विचार केला तर एका अधिकाऱ्याने रिसाईन करणे, दुसरीकडे जॉईन करणे हा कॉर्पोरेटमध्ये नेहेमीचा भाग आहे. ज्या दिवशी हि न्यूज वायरल झाली तेव्हा जवळपास INFY चा शेयर 15 – 16 % नि पडला आणि त्यानंतर तो थोडा घसरतच राहिलेला दिसतो. खरंतर फिनान्शिअलस मध्ये काहीच फरक पडला नव्हता. पण हि पडझड नक्की याच न्यूजमुळे झाली होती का अजून काही करणे होती हे बघण्यासाठी आपण निफ्टी५० चा देखील विचार करू.
INFY चा समावेश निफ्टी ५० मध्ये असल्याने हा न्युज चा परिणाम १८ ऑगस्ट च्या आसपास निफ्टी ५० वर देखील जाणवला पण नंतर मात्र निफ्टी ५० हा वाढतानाच दिसला . याच्या अगदी उलट चित्र INFY च्या कर्व मध्ये दिसत आहे . याचा अर्थ तेव्हा दुसऱ्या कुठल्याही इकॉनॉमिकल चेंजेसचा परिणाम INFY वर नव्हता.
आता आपण बघुयात हा शेयर प्राईस मध्ये झालेला बदल किंवा असलेला downward ट्रेंड का कायमचा झाला कि प्राईस वाढली देखील . यासाठी मी याच पिरियड चा २०१८ आणि २०१९ चा डेटा घेतला आहे.
जो शेयर २०१७ मध्ये ४०० - ४१० पर्यंत खाली गेला होता तो २०१८ ला ६५० - ६९० च्या रेंजमध्ये होता तर २०१९ मध्ये ७५० - ८०० च्या रेंज मध्ये दिसतो . दोन वर्षात जवळपास प्राईस हि दुप्पट झालेली दिसते . कारण कंपनीचे फिनान्शिअल (फिनान्सचे रेकॉर्डस् ) हे चांगले होते. २०१८ - २०१९ मध्ये उत्तम
लीडरशिप मुळे
इनकम , प्रॉफिट यामध्ये देखील कंपनी अव्वल ठरली . कुठेतरी न्यूज मधून २०१७ मध्ये downfall झाला. आता तुम्ही विचार करा ज्यांनी २०१७ मध्ये झालेल्या पडझडी मध्ये ४१० ला शेयर्स घेऊन २०१८ ला जरी विकला असेल तर जवळपास त्यांना ६०% प्रॉफिट मिळाला असेल . आणि २०१९ ला विकला असेल तर????
यातून एक इन्व्हेस्टर म्हणून काय शिकायचे?
1. चांगले रिटर्न मिळविण्यासाठी इन्वेस्टमेन्टच्या बास्केट मध्ये
FD , सोने , इन्सुरन्सबरोबरच "शेयर्स " असणे आवश्यक आहे
2. जेव्हा मार्केट मध्ये पडझड होत असेल तेव्हा पचेल तेवढी रिस्क घेऊन फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत गुंतवणूक करणे नक्कीच हिताचे असते.
3. मार्केट मध्ये फ्लक्चुएशन होणे चान्गले असते
. जर मार्केट खाली असेल तर नवीन इन्व्हेस्टर एन्ट्री करू शकतो जर ते वर जात असेल तर जुना इन्व्हेस्टर शेयर्स
विकून प्रॉफिट मिळवू शकतो
. त्यामुळे मार्केट वर खाली होणे हि भीतीदायक गोष्ट नाही
. We should mark right time to enter and exit as well.
4. माझ्या मित्राने
/ मैत्रिणीने हा शेयर घेतला म्हणून मी पण घेणार आहे असा स्टॅन्ड शक्यतो घेऊ नये.
कारण त्याच्या फिनान्शिअल गरजा
, ड्रीम्स किंवा रिस्क घ्यायची तयारी हि भिन्न असू शकते
5. शेयर्स प्राईस किंवा मार्केट वर अनेक गोष्टीचा परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अपडेट्स असणे महत्वाचे असते
. जर तुम्ही खरोखर इंटरेस्टेड असाल तर फिनान्शिअल न्यूज रोज वाचणे महत्वाचे ठरेल.
6. माझी सर्व रीडर्स ना विनंती आहे
, स्वतः किंवा आपल्या यंग मुलांना देखील थोडं शेयर्स मध्ये पैसे गुंतवायचे ट्रैनिंग द्याच
. शेयर्स मध्ये पैसे गुंतवायचे म्हणजे लाखभर रुपयेच पाहिजे असे काही नसते.
एक स्टार बक्सची कॉफी जर काही कारणाने तुम्ही मिस केली असेल तर त्याच पैशातून
"टाटा कॉफीचे साधारणपणे ८० रुपयांचे दोन शेयर घेऊन बघा.
तसेही ते तुम्ही खर्च करणार होता,
त्याचा पुढील ट्रेंड बघा आणि डिसिजन घ्यायला सुरुवात करा.
7. यातून इंडिरेक्टली आपण यंग जनरेशनला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिकवू शकतो.
जर डिसिजन बरोबर आला तर तो पुढे चॅनेलाईज कसा करायचा किंवा चुकून लॉस झाला तर तो नलिफाय कसा करायचा ह्याचा हा १६० रुपयांमध्ये त्यांनाच डेमो मिळेल.
8. न्यूज मध्ये किंवा चॅनेल्स वर काही ठराविक कंपनी हायलाईट होत असतील तरी
NSE वर साधारणपणे १७९० ऍक्टिव्ह कंपन्या आहेत तर
BSE वर ४००० पेक्षा जास्त.
जेव्हढा चान्गला अभ्यास आणि इनोफॉर्मशन तेवढ्या चांगल्या प्रमाणात तुम्ही उत्तम पोर्टफोलिओ बनवू शकता.
इथे मी फक्त एका कंपनीचा शेयर प्राईस ट्रेंड , त्यावर असलेला न्यूज इम्पॅक्ट दाखवला . पण जर आपले knowledge चांगले असेल तर अश्या अनेक ऑपॉर्च्युनिटीनचा फायदा करून घेता येऊ शकतो किंवा एखाद्या एक्स्पर्ट चा सल्ला घेणे कधीही फायदेशीर आहे.
जाता जाता बघुयात ६ महिन्यांमध्ये या INFY
वर काय परिणाम झाला???
वरील चार्ट वरून आपल्याला सहज दिसून येईल कि जेव्हा आपण थोडे घाबरलो होतो किंवा घरी केक बनवत होतो,
तेव्हा रिस्क घेणारी मंडळीनि ३ महिन्यात सहज साधारपणे ३०० रुपये पर शेयर प्रॉफिट मिळवला.
मग कधी करताय तुम्हीही पोर्टफोलीओ बनवायला सुरुवात?





Very informative.
ReplyDeleteSimple words and powerfull writting skills. The examples given are so effective any reader can understand it.
ReplyDeleteThanks
DeleteVery useful information. 👌
ReplyDeleteThank you
DeleteVery informative
ReplyDeleteAwesome 👌👌
ReplyDelete