Revenue Model of Free App!!! चहाला पण पैसे मोजतो मग अँप्स ला का नाही ?

परवाच गव्हर्नमेंटनि जवळपास ५९ Chinese ऍप्सवर बंदी आणली आणि बऱ्याच जणांना  प्रश्न पडला कि अँप वर बंदी आणून काय होणार आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला APP चा revenue मॉडेल काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे कारण आत्ता जर गूगल प्ले स्टोर वर गेलात तर बहुतांश अँप्स हि फ्री दिसतील. ऑफिसच्या कॉर्नर वरचा चहावाला हा कुपन  फाडल्याशिवाय  एक चहा देत नाही तर   मग ह्या अँपच्या कंपन्या कसा पैसे कमवतात किंवा एकही पैसे घेता कसे काय बरे सर्विस देतात ? 
सर्वेमध्ये    आलंय कि १० पैकी लोक हे नेहमीच फ्री अँप्स किंवा फ्री गेम्सच्या शोधात असतात किंवा फ्रीच डाउनलोड करतात.  पण अशा फुकट डाउनलोडस मधून सुद्धा पौष्टिक “Profit “कंपन्या कसा  मिळवतात  ते आपण बघुयात.
1.      Advertisement
Mobile ऍडव्हर्टीसमेन्ट हा तमाम अँप कंपन्यांचा रेव्हेन्यू मिळवायचा आवडतीचा ऑप्शन समजला जातो. या मध्ये पण अनेक प्रकार आहेत  जसे कि   Full  स्क्रीन  पॉप अप,   एखादा विडिओ लागणे किंवा ठराविक  अंतरानी एखादी फ्रेम समोर येणे असे अनेक प्रकार  आपल्याला  दिसत असतील. काही वेळेस  गेम्स देखील असे  बनवलेले असतात कि बोनस मिळण्यासाठी किंवा पुढच्या राऊंडमध्ये जायच्या आधी एक छोटा विडिओ तुम्हाला बघावा लागतो.

2.       E-mail marketing
  -मेल मार्केटिंग हि तशी जुनीच  कन्सेप्ट आहे पण  अँप च्या  जमान्यात देखील  मोठ्या  प्रमाणावर मोठ्या कंपन्यांकडून  वापरली जाते . E-mail marketing  मध्ये नोटिफिकेशन  येण्यासाठी  किंवा  ऍडिशनल फीचर्सची लिंक देण्यासाठी कस्टमर कडून -मेल  मागवला जाऊ शकतो. कदाचित मोबाइल अँप कंपनीला कस्टमरचा डाटाबेस  कलेक्ट करायला  एक  नवीन संधी देतात. असा  डाटाबेसमुळे   कस्टमर सोडून गेल्यावर  त्याला कॉउंसेलिंग करून परत आणायला मदत होते. E – Mail मार्केटिंगचा वापर  छोट्या कंपन्या कमी प्रमाणात करताना दिसतात परंतु मोठ्या कंपन्यांकडून याचा वापर सर्रास केला जातो.
3.      In-app Purchase
जेव्हा तुम्ही  एखादे अँप  डाउनलोड करता तेव्हा  काही फीचर्स तुम्हाला फ्री मिळतात.  काही सर्विसेस या तुम्हाला पैसे भरूनच मिळतात त्याला अँपचे प्रीमियम व्हर्जन म्हणतात. गेमची  लेवल अनलॉक करण्यासाठी किंवा गेममधील काही लाइव्हस विकत घेण्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात त्याला In-app Purchase असे म्हणतात.  बऱ्याचदा गेम्स आवडीने खेळणारे लोक यावर खर्च करताना दिसतात.   .

4.      Physical Purchase and   Merchandise
एखादी कंपनी प्रॉडक्ट्स विकत असेल तेव्हा बहुतकरून आपले अँप  फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देते , ज्यामध्ये कस्टमरला रिव्यू देखील सबमिट करायची सोय दिलेली असते. तुम्ही सबमिट केलेले रिव्युज  तसेच परचेस हिस्टरी याचा  सगळा लेखाजोखा  AI च्या मदतीने ठेवला जातो ,  तुमच्या आवडीच्या गोष्टींवर डिस्काउंट  असेल किंवा  त्याची काही विशेष ऑफर असेल तर त्याचे notification येते किंवा मेल येतो. तसेच मागच्या  काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याही कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रकारे मोबाईल अँप द्वारे आपल्या प्रॉडक्ट्सचे  मार्केटिंग तसेच customer relationship management चाही विचार केला जातो

5.      Data collection and selling the same
मोबाईल  अँप द्वारे लोकांचा डेटा मिळवणे तो तिसऱ्या थर्ड पार्टीला विकून खूप पैसे कमावणे हा पर्याय कुठलीही एथिक्स , कस्टमर relations  प्रिंसिपल्स मानणारी कंपनी स्वीकारत नाही. प्रत्येक मोठी कंपनी हि आपल्या कस्टमरचा डेटा जास्तीत जास्त प्रोटेक्ट ठेवायचा प्रयत्न करत असते. परंतु काही कंपन्या  ह्या  तुमचे -मेल ऍड्रेस , सोशल अकाउंट्स तसेच तुम्ही वेळोवेळी दर्शविलेले लाईक्स , प्रेफरेन्सस हा सगळा  डेटा थर्ड पार्टी ला विकतात. या  डेटा चा   वापर मार्केटिंग पासून अनेक ठिकाणी  केला  जाऊ शकतो.

मला यावर वाचलेली वाक्य आठवतात. “There is no free lunch in this world and if somebody is selling something at free or cheaper rate remember, you are unknowingly giving the more valuable things in return and now a day it’s a data. Remember guys its said that “DATA IS THE NEW OIL”.

रिडर्स यापुढे कुठलेही अँप डाउनलोड करताना एक नक्की विचार करा कि तुमच्यामुळे किती लोक श्रीमंत होत आहेत आणि त्यातून किती वेळ देऊन तुम्हाला काय रिटर्न्स मिळतात? यापुढे इंटरनेट वर वेळ घालवायच्या आधी तुम्हाला रिटर्न्स किती आहेत याचाही विचार करा कदाचित पुढचे गुगल हे तुमच्या कल्पकतेतून इंडियामध्ये तयार होईल ……………………….


Comments

  1. Amazing information. Modes of earning profits for companies via Digital marketing. 👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा