वर्क फ्रॉम होम आणि कंपनीची प्रॉफिटॅबिलिटी
नवीन नॉर्मल लाईफमध्ये जवळपास सगळी सर्विस इंडस्ट्री हि घरून काम करायला लागली. हळूहळू आपणदेखील वर्क फ्रॉम होमला कल्चरला सरावलो आहोत. सगळ्यांच्या मनात नक्की विचार आला असेल कि जवळपास नवीन फिनान्शिअल वर्ष (1st April
2020) सुरु झाल्यापासून पहिला क्वार्टर संपेपर्यंत (30 June 2020) कंपनीवर फिनान्शिअल इम्पॅक्ट काय बर झाला असेल?
वरील प्रश्नाचे उत्तर नक्कीच आपल्याला मिळू शकते. लिस्टेड कंपनी प्रत्येक क्वार्टर एन्डला ३ महिन्यांचा फिनान्शिअल डेटा डिक्लेर करत असते. सगळ्यात जास्त एफिशईंट "वर्क फ्रॉम होम" कल्चरवर जो सेक्टर शिफ्ट झाला तो म्हणजे "IT" सेक्टर. या ब्लॉग मध्ये आपण IT सेक्टरचा क्वार्टरली ऍनालिसिस करूयात. जसा निफ्टी ५० , NSE वरील टॉप ५० कंपन्यांचा इंडेक्स आहे तसेच NSE वरील टॉप IT कंपन्यांचा इंडेक्स हा "NIFTY IT
index" म्हणून
ओळखला जातो.
आता बघुयात निफ्टी IT मध्ये कोणत्या कंपन्या येतात आणि त्याचे ओव्हरऑल मार्केट कॅपिटल किती आहे
Company
Name
|
Market
Capitalisation
|
%
|
Tata Consultancy Services Ltd.
|
6,85,22,297
|
51.64%
|
Infosys Ltd.
|
2,73,20,750
|
20.59%
|
HCL Technologies Ltd.
|
1,18,42,434
|
8.93%
|
Wipro Ltd.
|
1,12,37,966
|
8.47%
|
Tech Mahindra Ltd.
|
54,61,323
|
4.12%
|
Info Edge (India) Ltd.
|
24,89,195
|
1.88%
|
Larsen & Toubro Infotech Ltd.
|
24,86,562
|
1.87%
|
MindTree Ltd.
|
13,63,805
|
1.03%
|
MphasiS Ltd.
|
12,38,798
|
0.93%
|
NIIT Technologies Ltd.
|
7,16,402
|
0.54%
|
Total Market capitalisation for
NIFTYIT
|
13,26,79,533
|
मार्केट कॅपिटॅलिझेशनचा विचार केला तर TCS,
INFY, HCL आणि विप्रो या सगळ्यात मोठ्या दिसत आहेत आणि त्यांचा मोठा प्रभाव हा एकूण IT सेक्टर आणि सर्विस एक्सपोर्टसवर दिसतो. आता आपण या कंपन्यांचे आता पब्लिश झालेले रिजल्ट आणि याच क्वार्टरमध्ये पब्लिश झालेले २०१९ चे रिजल्ट कम्पेर करूयात.
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
इन्फोसिस व HCL या कंपन्यांचा सेल हा साधारणपणे ८% ने वाढला आहे. त्यांच्या प्रॉफीटचा आलेख हा जुन २०१९ पेक्षा हा वाढता दिसतोय. TCS व विप्रो च्या सेलमध्ये फारशी ग्रोथ जरी दिसत नसली तरी त्यांनी जुन २०१९ चे सेलची लेवल मेन्टेन केली आहे. TCS चा जुन २०२० क्वार्टरचा प्रॉफिट हा ११% नि कमी झालेला दिसतोय. तर इन्फोसिस , HCL आणि विप्रो यांच्या प्रॉफिटमध्ये
भरगोस वाढ झालेली दिसते.
आता आपण त्यांच्या एक्सपेन्सेस मध्ये झालेले चेंजेसचा ओव्हरव्ह्यू घेऊयात
सर्विस इंडस्ट्री मध्ये दोन एक्सपेन्सेस हे सगळ्यात जास्त असतात १. एम्प्लॉयी कॉस्ट (सॅलरी आणि इतर बेनेफिट्स) २. अदर कॉस्ट (इतर खर्च).
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
प्रत्येक कंपनीची एम्प्लॉयी कॉस्ट हि वाढलेली दिसते पण त्याचबरोबर इतर खर्चामध्ये लक्षणीय सेविंग झालेले दिसून येत आहे.
साधारणपणे
IT कंपन्यांना जुन
२०२० चा
क्वार्टर हा
जून २०१९
पेक्षा चांगला
गेल्याचे दिसून
येत आहे
आता आपण IT सेक्टर च्या इंडेक्स चा तसेच प्रत्येक कंपनीच्या शेयर प्राईस चा विचार करू
वरील सर्व चार्ट्स वरून आपल्याला दिसून येईल कि मार्चच्या शेवटच्या आठवड्यातील शेयर प्राईस मध्ये झालेली पडझड सोडली तर प्रत्येक कंपनीच्या शेयर प्राईस मध्ये वाढ झालेली दिसून येईल , याचे मुख्य कारण म्हणजे जून २०२० चे उत्तम आलेल्या फिनान्शिअल स्टेटमेंट.
आता
ज्यांनी मार्च
मध्ये थोडी
रिस्क घेऊन
या कंपन्यांचे
शेयर्स घेऊन
ठेवले असतील
तर त्यांना
किती बरे
प्रॉफिट झाला
असेल?
या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माझ्या आधीच्या रविवारच्या ब्लॉग मध्ये नक्की मिळेल, जर हा ब्लॉग मिस केला असेल तर खाली लिंक वर जाऊन नक्की वाचा.



Comments
Post a Comment