मुलीचा संपत्तीतील वाटा, अर्थकारण आणि तरुणाई
परवाच मुलींना संपत्तीत सामान वाट मिळायला हवा हे परत एकदा अधोरेखित करणारा सुप्रीम कोर्टने उत्तम निर्णय दिला . आज आपण या ब्लॉगमध्ये त्यामध्ये लपलेल्या अर्थकारणावर बोलणार आहोत. बऱ्याच जणांना माहित असेल कि प्रॉपर्टीतील वाटा हा भाग "Hindu Succession Act, १९५६" हा ऍक्टखाली येतो . अर्थात या कायदा मधील त्रुटी दूर करण्यासाठी २००५ मध्ये हा कायदा amend (सुधारणा) करण्यात आला . तरी पण अनेक जणांनी त्यातील पळवाटा शोधून मुलीला तिचा स्वाभाविक वाटा देणे टाळले . या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे . येथे आपण समजून घेतले पाहिजे कि मुलींना वडीलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये सामान वाटा असला तरी आई - वडिलांना स्वकमाईची प्रॉपर्टी आपल्या मनाप्रमाणे वाटण्याचा बेसिक राईटदेखील आई वडिलांकडे अबाधित आहे.
पण आज सगळीकडे स्त्री पुरुष समानता स्वीकारणारे जग जेव्हा इस्टेटीचा विषय होतो तेव्हा इतके असमान का होते ? कुटुंबातील लढाया सुप्रीम कोर्टापर्यंत का जातात ? अर्थात त्यामागे त्या कुटुंबातील चालेल्या वर्षानु वर्षाच्या अर्थकारणाचा भाग असतो.
काही मोजकि उदाहरणे सोडली तरी अजूनही लग्नाचा खर्च हा केवळ मुलीकडच्यांनी करावा अशी मागणी किंवा सामाजिक कंपल्शनच मुलीकडच्या लोकांवर असते . आपल्या ऐपतीप्रमाणे हा खर्च पन्नास हजार ते अगदी काही कोटींपर्यंत केला जातो. त्याचबरोबर मुलीला गोल्ड, बॉण्ड्स या स्वरूपात स्त्री धन देखील दिले जाते. एक तर समाजामध्ये कुटुंब किती प्रतिष्ठित आहे हे दाखवण्यासाठी हा वारेमाप खर्च केला जातो किंवा आपण आहोत तोपर्यंतच मुलीला वाटा मिळू
दे अशी एक आई वडिलांची मनीषा असते. परंतु आई वडिलांपश्चात जेव्हा मुलगी आपल्या वाटण्यासाठी कोर्टात धाव घेते, तेव्हा हाच लग्नासाठी केलेला खर्च अगोदरच दिलेले दागिने , प्रसंगी
वर्षभर आपापल्या ऐपती प्रमाणे मुलींना जावयाला दिलेली गिफ्टस ,पैसे याच्यावर खूप मोठी खडाजंगी होते , काही प्रमाणात मुलीला याचा मनस्तापही सहन करावा लागत असतो. येथे हे देखील लक्षात घेतले पाहिजे कि एकूण लोकसंख्येपैकी किती मुली कोर्टात जातात किंवा जाऊ शकतात . त्यामुळे आई वडिलांना खरंच न्यायप्रिय वागणूक द्याची असेल तर सामाजिक इकॉनॉमिकल रेव्होल्यूशनची खरंच गरज आहे
वरील प्रसंग टाळण्यासाठी मागील जनरेशननि काही जुने विचार सोडून खरोखर नव्या पर्वाला सुरुवात करणे गरजेचे आहे . जेव्हा मुलीला सामान वाटा प्रॉपर्टीत द्यायची गोष्ट समोर येते, तेव्हा खर्च आणि कर्तव्यांमध्ये देखील सामान वाटा देण्याची गरज आहे . जेव्हा
मुलीला सामान वाट देत आहात तेव्हा मुलाचे लग्न करताना होणाऱ्या खर्चात देखील सामान वाट उचलणे गरजेचे आहे. घरात आलेली सूनदेखील कोणाचीतरी मुल्गीच आहे हे विसरून चालणार नाही.
जसे हक्क मिळणे गरजेचे आहे तसेच कर्तव्यदेखील महत्वाचीच. कुठेतरी संपत्तीत सामान वाटा देताना कर्तव्यातदेखील समान वाटा देणे आवश्यक आहे ,त्यामुळे कोणीच केवळ रिसीविंग एन्ड ला राहणार नाही. समाजात वावरताना आपल्याला बऱ्याचदा असेही दिसते कि एकीकडे मुलीला तिचा वाटा मिळत नाहीये तर दुसरीकडे आई वडिलांकडून आपली मुले फुकट सांभाळून घेऊन आई बाबांचे हात पाय चालेनसे झाल्यावर भावाला त्याचे कर्तव्य
सांगणाऱ्या
मिळवत्या
बहिणी देखील
आहेत.
अजूनतरी प्रेम , जिव्हाळा मोजू शकणारे युनिट ऑफ मेजरमेंट आपल्याकडे नाही. त्यामुळेच जेव्हा कटुता येते किंवा विवाद होतात, तेव्हा सर्व देवाण घेवाण हि पैशातच मोजली जाते.
थोडक्यात ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त मुले आहेत त्यांच्या आई वडिलांनी मुलांना समान हक्काची जाणीव हि लहानपणापासून सामान वागणुकीतून करून दिलेली अधिक चांगली . येथे मला पु
ल देशपांडे
याच्या "एक
शून्य मी"
मधील " - "संस्कार"
या चॅप्टरची
आठवण येते
. येथे मी वाचकांना विनंती करिन कि हा भाग जरूर वाचावा किंवा ऑडिओ बुक्समध्ये ऐकावा . कारण मुले हि केवळ आपल्या पालकांचे अनुकरण करत असतात , आपण काय आदर्श ठेवत आहोत हे बघणे महत्वाचे ठरते.
जेव्हा या विषयावर मी तरुणाईशी बोलते तेव्हा मन खरंच खूप प्रसन्न होत. इनकम टॅक्स मध्ये एक प्रोव्हिजन आहे कि लग्नात मिळालेली गिफ्ट्स हि टॅक्स फ्री असतात तेव्हा लग्न , खर्च आणि मुलीचा, मुलाचा वाटा
अशा अनेक विषयांवर चर्चा होते आणि मुलं मोकळेपणाने बोलू लागतात . काय नुसत लॅपटॉप मध्ये डोकं घालून बसतो याच काय खरं नाही असा म्हणण्यापेक्षा त्यांचं ऐकून घेण्यास सुरुवात केली तर त्यांच्या विचारांमध्ये असलेली क्लॅरिटी चटकन समजून येते.
हि
मुलं अगदी रॅशनॅलि विचार करून म्हणतात मॅडम कोणी कसा लग्न करावं हा त्या मुलाचा आणि मुलीचा अगदी खासगी विषय आहे. पण आपल्याकडे आम्हाला
न विचाराता कधी रीत म्हणून किंवा कधी बडेजाव दाखवायचा म्हणून सगळे ठरवले जाते आणि आवडत नसले तरी घरी येणाऱ्या बायकोला नंतर त्रास नको म्हणून टोकाचा विरोधही करता येत नाही. लग्नात पोट भरलेल्या लोकांना खायला घालण्यापेक्षा आम्ही आमचे लग्न कमी खर्चात करून मला नवऱ्याबरोबर मस्त जगभर फिरायला आवडेल असेही काही स्टुडंट्स म्हणतात.
एका मुलाने सांगितलेल्या किश्श्याने तर हसून हसून पुरेवाट झाली , त्याच्या आईच्या माहेरच्या शेतीची वाटणी सुरु होती तेव्हा वडिलांनी हा विषय घरी काढल्यावर मात्र
आईने जो दुर्गावतार धारण केला आणि म्हणाली लग्नात माझ्या बापानं ३० तोळे सोने घातल होत बस कि आता आणखी काय पाहिजे . हा रुद्रावतार घरच्यांना नवीन होता. पण मॅडम आज इतक्या वर्षांनी देखील आईला कुठेतरी हे बोचत होत, तेव्हाच ठरवले आपल्याला अजून ३० वर्षांनी ह्या गोष्टी बायकोकडून ऐकायच्या नाहीत.
तरुणाई
हि कदाचित घरात बोलत नसेल पण निरीक्षण नक्की करत असते. त्यामुळे येणाऱ्या काळातील लग्नात एखादा जावई किंवा सून हे मुलीच्या सामान हक्कासाठी रुसून बसले तर कोणाला आश्चर्य नको वाटायला.

Good decision
ReplyDeleteपण आता बऱ्याच जावई च्या तोंडाला पाणी सुटले असेल