अकाउंट्स रायटिंग ते फिंटेक : एक वेगळी उत्क्रांती (Evolution)
"अमेरिकन जिनियस" पहिल्यांदा २०१५ मध्ये टेलिकास्ट झालेली नॅशनल जिओग्राफीवरची हि अमेरिकेतील सायंटिस्ट वर काढलेली डॉक्युमेंटरीवजा सिरीयल खूप प्रसिद्ध झाली . या सिरियलमध्ये एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या दोन लोंकाच्या स्वभाव , बुद्धिमत्ता यांच्या भिन्नतेमुळे निर्माण झालेलं प्रसंग व त्यातून जगाला मिळालेल्या उत्तम गोष्टी किंवा डिवाइस याचे सुंदर चित्रण केले आहे. या एपिसोडस मध्ये दाखवलेले सायन्टिस्ट हे १९ व २० व्या शतकातील होते . हे सर्व बघताना २०२० मध्ये नक्की जाणवते हे सर्व सायन्टिस्ट आपापल्या कालखंडात उत्तम काम करून ते पुढील पिढीतील सायन्टिस्टला एक प्रकारे कॉम्प्लिमेंट देत होते . उदारणार्थ जेव्हा टेस्ला यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सीचे, अल्टर्नेट करंट चे स्वप्न बघितले व खरे करून दाखवले तेव्हा अनेक पिढ्यानंतर स्टिव्ह जॉब्स ने आपल्या हातात अत्यंत छोटा पण शक्तिशाली "अँपल" दिला. दोन मिनिटे तुम्हाला नक्की वाटलं असेल कि चुकून आपण एखाद्या सायन्सच्या ब्लॉग वर तर नाही आलो ना ? नक्कीच नाही , पण या सुंदर सिरीयल मधून मात्र लक्षात आले कि कोणत्याही सब्जेक्टमध्ये झालेल्या शोधात हे केवळ एकाच माणसाचे काँट्रीब्युशन कधीच नसते. प्रत्येक शोध , विचार किंवा शोधग्रंथ हा अनेक पिढ्यानी केलेल्या अभ्यासाचे , कष्टाचे प्रतीक असतो. हा एक प्रकारे रिले रेसचाच प्रकार आहे , माणूस तेव्हाच जिंकतो जेव्हा तो स्वतःच्या हातातला "बॅटन" आपली ईनिंग एफिशिअंट वेळेत पूर्ण करून अधिक दमाच्या , नवीन पिढीकडे देतो.
कॉमर्स , मॅनॅजमेण्ट आणि इकॉनॉमिक्स चाही प्रवास हा गेले ५ शतक अगदी हातात हात घालुनच झाला आहे. शालेय अभ्यासामुळे म्हणा किंवा डॉक्युमेंटरीमुळे म्हणा आपल्याला अनेक सायंटिस्ट माहित असतात, परंतु अकाउंट्स , फिनान्स किंवा इकॉनॉमिक्स मध्ये असेच उत्तम काम करणाऱ्या त्यातील अनेक ब्रॅंचेसच्या निर्मात्यांची ओळख महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी बघुयात , त्यातून अनेक विषयांचीही तोंडओळख आपण करून घेऊ.
वेस्टर्न सिस्टिम नुसार पहिल्यांदा आपण फ्लो डायग्रॅमद्वारे फायनान्स , अकाउंट्स चा साधारणपणे झालेला प्रवास बघुयात.
*वर दिलेल्या व्यतिरिक्त अनेक कॉम्बिनेशन्स आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर मिळू शकतात. प्रामुख्याने प्रचलित असलेल्या शाखा इथे दाखवल्या आहेत. या चार्ट वरून कॉमर्स , मॅनॅजमेण्ट किंवा त्यामधील प्रोफेशनल कोर्स करणे म्हणजे केवळ कारकुनी किंवा खर्डेघाशी करण्याचे शिक्षण राहिले नसून बुद्धीला नेहमीच चॅलेंज करणारे झाले आहे, हे माझ्या हुशार वाचकांना चटकन समजून येईल.
डबल एन्ट्री सिस्टिमची सुरुवात
समजा आपण वाण्याच्या दुकानातून काही १०० रुपयांचे वाणसामान अर्थात ग्रोसरी आणली.
जेव्हा डबल एन्ट्री नव्हती तेव्हा केवळ "कॅश बुक " मध्ये हा व्यवहार "वाणसामानासाठी १०० रुपये खर्च " असा उल्लेख करून लिहिला असे. एकाच बुक मध्ये एकच एन्ट्री केल्याने त्याला सिंगल एन्ट्री सिस्टम असे म्हटले जायचे . परंतु लक्षात घ्या कि जर घाईगडबडीत क्लार्क कडून फक्त “१०० रुपये खर्च” एवढाच उल्लेख झाला तर वर्षाच्या शेवटी नेमके कुठे खर्च झाले याचा हिशोब लागत नसे. जसा व्यापार वाढत जातो तसे एन्ट्रीज ची संख्याही वाढत जाते . तेव्हा सिंगल एन्ट्री सिस्टीममध्ये वर्षाच्या शेवटी आपल्या क्लार्क ची अवस्था हि महाभारतातील अभिमन्यू सारखीच होऊन बसते .
|
Liability - घेतलेलं कर्ज |
Asset - स्वतः जवळ / बँकेत असेलला पैसे व प्रॉपर्टी |
|
Income - उत्पन्न |
Expenses - वारंवार होणारे खर्च |
आज आपण ब्लॉग मध्ये फिनान्सची होत असलेली उत्क्रांती व Luca di Borgo अर्थात “Father of Accounting ने सांगितलेला मूलमंत्र बघितला . पुढच्या महिन्यात असाच एखादा अवलिया व त्याने सांगितलेला मंत्र बघुयात.


Comments
Post a Comment