एकीकडे एप्रिल ते मे चा GDP निगेटिव्ह आला, लॉकडाऊन होते तरी मग शेयर मार्केट मार्च नंतर वर कसे गेले ???
परवाच आपण सगळ्यांनी न्युजमध्ये वाचले कि GDP हा बाकीच्या देशांपेक्षा खूप कमी झालाय अर्थात निगेटिव्ह झालाय . माझ्या ब्लॉगच्या अनेक चाणाक्ष रीडर्सना नक्की प्रश्न पडला असेल कि मग हे रिडक्शन शेयर बाजारात कसे दिसले किंवा का नाही दिसले. पहिल्यांदा आपण काही चार्ट्स किंवा टेबल्स चा अभ्यास करूयात
पण बऱ्याचदा असा प्रश्न पडलेला असतो कि हे GDP म्हणजे नक्की काय प्रकरण आहे.
GDP at market prices = GVA at basic prices + Product
taxes- Product subsidies
टॅक्सेसचा पार्ट सोडला तर वरील इक्वेशन वरून समजून येईल कि GDP समजण्यासाठी आधी आपण GVA (Gross Value added) समजून घेणे अधिक महत्वाचे ठरते.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर GVA म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तसेच सर्विसेस मधून मिळालेले एकूण उत्पन्न . अर्थात ते काढताना जे प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस फायनल आउटपुट करण्यासाठी वापरले जातात ते दोनदा कन्सिडर होऊ नयेत म्हणून एकूण आउटपुट च्या व्हॅल्यूतुन वजा करतात. खालील टेबलमध्ये वेगवेगळ्या सेक्टरची एप्रिल ते जून चे फिगर्स दिले आहे
Table 1: Gross Value added and Quarterly comparison
|
Quarterly Estimates of GVA at Basic Prices in Q1 (April-June) of
2020-21 |
April - June |
||||
|
Particulars |
2018- 19 |
2019-20 |
2020-21 |
2019 - 20 |
2020 - 21 |
|
Agriculture & Forestry & Fishing |
427,177 |
439,843 |
454,658 |
3.00 |
3.40 |
|
Mining & Quarrying |
88,634 |
92,807 |
71,209 |
4.70 |
(23.30) |
|
Manufacturing |
561,875 |
578,936 |
351,396 |
3.00 |
(39.30) |
|
Electricity, Gas, Water supply & other utility |
74,998 |
81,628 |
78,577 |
8.80 |
(7.00) |
|
Construction |
249,913 |
262,868 |
130,750 |
5.20 |
(50.20) |
|
Trade hotels, transport, Communication & Services related to
broadcasting |
609,330 |
630,860 |
334,284 |
3.50 |
(47.00) |
|
Financial, real estate & Professional services |
757,850 |
803,322 |
760,491 |
6.00 |
(5.30) |
|
Public administration, Defense and other services |
387,589 |
417,483 |
374,656 |
7.70 |
(10.30) |
|
GAV at Basic Price |
3,157,366 |
3,307,747 |
2,556,021 |
4.80 |
(22.80) |
*MOSPI
१९ -२० च्या पहिल्या क्वार्टर पेक्षा २०-२१ च्या क्वार्टर मध्ये शेती हा सेक्टर सोडता बाकी सगळया सेक्टरनी निगेटिव्ह ग्रोथ दाखवली आहे. वरील टेबल वरून आपल्याला दिसून येते कि मॅन्युफॅक्चअरिंग , ट्रान्सपोर्ट ,हॉटेल आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरचे आउटपुट हे जवळपास ५०% नि कमी झाले आहे.
बरेच रिसर्चर्स हे निफ्टी ५० ला ग्रोथ इंडिकेटर मानतात . सगळे व्यवहार बंद असताना शेयर मार्केटचा ट्रेंड जाणून घेण्यासाठी मार्च पासून "निफ्टी ५० चा वीकली डेटा" हा डाउनलोड केला आहे. कंपॅरिजन साठी सेम क्वार्टर चा २०१९ - २० चा देखील डेटा डाउनलोड केला आहे.
मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये जेव्हा लॉकडाऊन नव्हते तेव्हा देखील मार्च २०२० चा निफ्टी हा २०१९ पेक्षा कमी दिसतोय . परंतु लॉकडाऊनच्या अनाउन्समेंट नंतर मात्र मार्चच्या तिसऱ्या चौथ्या वीक मध्ये पडझड झालेली दिसते . परंतु जशी अधिक इन्फॉर्मशन व सिच्युएशन ची क्लॅरिटी येत गेली तशी निफ्टी ५० मध्ये मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रिकव्हरी झालेली देखील दिसते.
जून २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात निफ्टी हा साधारणपाने ११,७८८ ला होता तर २०२० जूनच्या शेवटच्या आठवड्यात तो १०,३०२ ला होता (वीकली अव्हेरेंज घेतले आहे ) . म्हणजे एवढ्या घडामोडीनंतरसुद्धा जून २०२० चा निफ्टी हा २०१९ पेक्षा केवळ १३% नि कमी आहे. जर GDP निगेटिव्ह तर सेम पिरियड मध्ये निफ्टी ५० वर का गेला ? जर प्रोडक्शन होते नव्हते किंवा सर्विसेस दिल्या जात नव्हत्या तर रिकव्हरी कशी होत होती ? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील . त्याची उत्तरे नक्कीच एका वाक्यात देता येणार नाही तरी पण थोडी समरी जाणून घेउयात.
- जेव्हा तुम्ही इकॉनॉमी च्या डेटा चा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला इकॉनॉमी मध्ये सध्या काय चालू आहे हे दिसते पण शेयर मार्केटमध्ये लोक हे भविष्य काळाचा वेध घेऊन आपली स्ट्रॅटेजि ठरवत असतात. त्यामुळे येथे स्पष्ट दिसेल कि मे नंतर प्रॉमिसिंग फ्युचर दिसायला लागल्यावर मार्केट हे हळू हळू वर जायला लागले. भविष्यातले आवश्यक चित्र निर्माण होण्यासाठी RBI चा देखील मोठा हात आहे.
- निफ्टी आणि सेन्सेक्स हे मार्केट चे केवळ रेप्रेसेंटेटिव्ह आहेत . निफ्टी / सेन्सेक्स म्हणजे स्टॉक मार्केट नाही . मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले आहेच कि BSE व NSE वर हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या कंपन्यांचे किंवा सेक्टरचे शेयर्स वाढले आहे हे बघणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
- इकॉनॉमी चा डेटा हा ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर यांचा मिळून येतो . पण शेयर मार्केट हे केवळ त्यावर लिस्टेड कंपन्यांचे चित्र दाखवत असते किंवा आपण असे म्हणूयात कि ऑर्गनाइज्ड सेक्टरचे प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये नजीकच्या काळात मार्केट मध्ये देखील वस्तुस्थितीनुसार करेक्शन येऊ शकतेच.
- त्यामुळे मला मागे लिहिलेल्या ब्लॉग प्रमाणे नमूद करावेसे वाटते कि केवळ १५ - २० दिवसांचे कोर्स करून आपल्याला शेयर मार्केट किंवा इकॉनॉमिक्स च्या बेसिक कॉन्सेप्ट्स कळतील परंतु ट्रेंड जाणून घेऊन बाय - सेल च्या स्ट्रॅटजीस स्वतः ठरवण्यासाठी मात्र एखादा अभ्यासू गुरु व स्वतःचा नियमित अभ्यासच मदत करू शकेल.
तसेच कालच्या "Teacher's Day” च्या निमित्ताने माझ्या सर्व टीचर्स ना नमस्कार!!!


Very useful information ma'am
ReplyDelete