बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?
परवा काही कारणामुळे मला एका प्रायव्हेट बँकेत जायचा योग आला. सहज म्हणाले सर आता गर्दी नसल्याने थोडे चुकल्यासारखे वाटत असेल ना ? तेव्हा नव्या पिढीच्या बँक मॅनेजरने हसून एक असे काही उत्तर दिले कि आज मला हा ब्लॉग लिहिण्यास भाग पडले. मॅडम आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी आहे पण खर सांगू का ? आधीपासून मला बँकेत गर्दी झालेली अजिबात आवडत नाही. नाही गैरसमज नको, सगळ्यात जास्त कस्टमर याच ब्रांचचे आहेत पण जेव्हा जास्त कस्टमर बँकेत येतात तेव्हा मी माझे ते फेल्यूर समजतो ? आता मात्र मला चक्कर यायची राहिली होती कारण बऱ्याचदा बँकेत होणारी कस्टमरची गर्दी हे ब्रँचच्या उत्तम सर्विस ची पावती समजणारे अनेक लोक मी पहिले होते . पण हा मात्र काहीतरी वेगळे सांगत होता. त्यामुळे मी त्याला सहज विचारले ते कसे बुआ ? “मॅडम याचा सरळ असा अर्थ होतो कि आम्ही आमच्या कस्टमर्स ना मोबाइल बँकिंग , इंटरनेट बँकिंग किंवा फोन बँकिंग सिक्युअरली कसा वापरायचं हे शिकवण्यात कमी पडलो. आपण ह्या नवीन टेक्नॉलॉजिचा वापर करून जर कमी मनुष्यबळात जास्त एफिशिएन्सी नाही देऊ शकलो तर उपयोग काय ? फारच काही अडचण आली किंवा सर्वर डाऊन असेल तर गोष्ट वेगळी”. खरंच असा विचार जर प्रत्येक बँक करायला लागली तर भविष्यात किती नव्या ब्रॅंचेस ओपन होतील किंवा लागणाऱ्या मनुष्यबळाकडे काय स्किलसेट लागतील याचा मी विचार करायला लागले.
फायनान्स क्षेत्रात काम करत असल्याने RBI वरून
नंबर ऑफ ब्रांचेस चा डेटा काढला. नंबर ऑफ ब्रॅंचेस
का ? कारण बँक एम्प्लॉयमेंट शी हा व्हेरिएबल डिरेक्टली रिलेटेड आहे अर्थात ब्रॅंचेस जास्त तर एम्प्लॉयी ची रिक्वायरमेंट जास्त.
वरील चार्ट वरून हे स्पष्ट
होते कि नवीन ब्रांच ओपन करण्याचा धडाका हा कमी झालेला आहे. काही प्रमाणात त्याला मर्जर्स तर मोठ्या
प्रमाणात नव्या पिढीचा असलेला डिजिटल बँकिंगकडे असलेला ओढा कारणीभूत आहे. मग बँकेत
एम्प्लॉयीची गरजच राहणार नाही का ? तर असे
मुळीच नाही गरज राहील पण नवीन स्किल सेट मात्र नक्कीच लागतील . कारण आता बँकिंग देखील आपले रूप पालटत आहे आपण डिजिटल बँकिंग कडून AI बेस्ड
बँकिंग कडे वाटचाल करत आहोत.
KYC हा त्यातील अगदी पहिली स्टेप आहे . कारण बँक आपले कस्टमर हे
AI चा वापर करून त्यांच्या रिक्वायरमेंट किंवा फिनान्सियल बिहेवियरचा अभ्यास करू शकते . खऱ्या अर्थाने बँक आपल्या कस्टमर ला ओळखायला
लागेल . कदाचित आपल्यला समजायच्या आधीच बँकेकडून मेसेज येईल कि दोन
महिन्यांनी आपल्याला एका छोट्या कर्जाची गरज पडणार आहे . हे शक्य
आहे ?
अर्थात शक्य आहे . आता तुम्ही केवळ आधार नंबर आणि त्याच्याशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वापरून शून्य रुपयात India Post Payment Bank मध्ये अकाउंट ओपन करूच शकता. जिथे आपण अँप्लिकेशन फॉर्म घेऊन बँकेत जायचो ते काम आता केवळ गुगल प्ले वरून एक अँप डाउनलोड करून आपण करू शकतो. बँकेच्या कार्यपद्धितीत जा चेंज यायला थोडा अवकाश असला तर बँकेच्या एक्साम देणाऱ्या मुलांनी कोणते स्किल सेट असणे महत्वाचे ठरेल हे आपण एक SWOT ऍनालिसिस करून पाहुयात.
वरील बदलांमुळे नक्कीच नव्या ऑपॉर्च्युनिटी निर्माण होऊ शकतात त्याप्रमाणे एखादी येत्या ५-६ वर्षात VRS स्कीम येण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन जगाच्या बदलांसाठी आज पासूनच सुरुवात करू . जसे आपण लहानपणापासून कॉम्पुटर वापरायला शिकलो तशी आत्ता शाळेत जाणारी मुले हि 4th – 5th स्टॅंडर्डपासून कोडिंग करायला शिकत आहेत. अजून १० -१५ वर्षांनी हीच मुले तुम्हाला रिपोर्ट करतील, तेव्हा स्वतःला उत्तम लीडर बनवण्यासाठी आता पासून मल्टिडिसीप्लिनरी एजुकेशन घ्यायला सुरुवात केलेली नक्की चांगली.
ऍडव्हान्स
एक्सेल सोप्या
भाषेत लॉजिकली
शिकण्यासाठी खालील
लिंक वर
क्लिक करा
आणि मॅनॅजिंग
रुपयाच्या यु
ट्यूब चॅनेलला
सबस्क्राईब करा.
1.
Pivot Table
a.
Part
1 : https://www.youtube.com/watch?v=53wCpsfqm_A
b.
Part
2 : https://www.youtube.com/watch?v=82AXbBrUT5o
c.
Part
3 : https://www.youtube.com/watch?v=aT6aKz5zJxg
2.
EMI calculation with Excel
https://www.youtube.com/watch?v=rW9689sZsYQ
3.
Learning “Multiple IF” command
https://www.youtube.com/watch?v=Gr0ZdjG4ESc
![]() |




Nice
ReplyDelete