मल्टिकॅप म्युचल फंड आणि सेबी चा नवीन रुल (Multi cap Mutual fund: SEBI’s New rule)

 साधारणपणे मे महिन्याच्या सुरवातीस मी म्युचल फंड आणि त्याच्या मेकेनिसमवर एक ब्लॉग लिहिला होता (https://managingrupaya.blogspot.com/2020/05/mutual-fund.html ). त्याची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे ११ सप्टेंबर ला आलेले सेबीचे अत्यंत महत्वाचे सर्क्युलर.

हे सर्क्युलर इन्वेस्टरच्या दृष्टींनी देखील अतिशय महत्वाचे आहे. या सर्क्युलर मध्ये सेबी म्हणते कि जे मल्टिकॅप फंडस् आहेत त्यांना नवीन गाइडलीन प्रमाणेच शेयर्स घ्यावे लागतील. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हे "मल्टिकॅप फंडस्" काय प्रकरण आहे. जेव्हा तुम्ही म्युचल फंडस् घेता तेव्हा तो म्युचल फंड कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे गुतवणार आहे हे तुम्हाला आधीच सांगितलेले असते.

Broad Category of Equity funds

Scheme Characteristics*

 

Multi Cap Fund

Minimum investment in equity & equity related instruments- 65% of total assets

Large Cap Fund

 

Minimum investment in equity & equity related instruments of large cap companies- 80% of total assets

Mid Cap Fund

Minimum investment in equity & equity related instruments of mid cap companies- 65% of total assets

Small cap Fund

 

Minimum investment in equity & equity related instruments of small cap companies- 65% of total assets

* जुन्या रुलप्रमाणे

वरील डेफिनेशनप्रमाणे समजून येईलकी ज्या टाईपच्या कंपन्यांमध्ये म्युचल फंड इन्व्हेस्ट करतो साधारपणे त्यावरून त्याला नाव दिले जाते. मल्टिकॅप म्युचल फंडस् याविषयी नीट समजून घेण्यासाठी पहिल्यांदा लार्ज  कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनी म्हणजे नक्की काय हे समजून घेऊयात.

समजा एक्सचेन्ज वर १००० कंपन्या लिस्ट आहेत आणि आपण त्या जर सिक्वेन्स मध्ये लावायचे ठरवले . हा  सिक्वेन्स लावताना ज्याचे सगळ्यात जास्त शेयर व्हॅल्यू एक्सचेंज वर लिस्ट  झालेली दिसते त्याला पहिला रँक जशी जशी कमी झालेली दिसतात तसे नंतरचा रँक दिला. सोप्या भाषेत जास्ती कडून कमी कडे जाताना जास्त शेयर व्हॅल्यू असणाऱ्या कंपनीला नंबर सगळ्यात कमी शेयर व्हॅल्यू असणाऱ्या कंपनीला शेवटचा नंबर दिला. साधारणपणे एक्सचेंज वर ज्यांचा पहिल्या १०० मध्ये नंबर येतो त्यांना लार्ज कॅप कंपनी म्हणतात. १०० - २५० मध्ये ज्यांचा नंबर येतो त्यांना मिड कॅप कंपनी म्हणतात त्यापुढील सगळ्या कंपन्यांना स्मॉल कॅप कंपनी म्हणतात.

Multicap Funds and Asset allocation

पूर्वीच्या रुल प्रमाणे मल्टिकॅप म्युचल फंड हे तीनही टाईप च्या कंपनी मध्ये इन्व्हेस्ट करू शकत होते . त्याचे कॉम्पोजीशन समजून घेण्यासाठी मी प्रमुख  मल्टिकॅप म्युचल फंड चा डेटा अनलाईस केला.


वरील चारही म्युचल फंडस् च्या कॉम्पोसिशन वरून समजून येते कि जरी हा मल्टिकॅप फंड असाला तरीही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट हि लार्ज कॅप मध्येच झाली आहे.

आता सेबीचा नवीन रुल काय सांगतो ?

मल्टिकॅपने त्यांच्या एकूण इन्व्हेस्टमेंट पैकी ७५% इन्व्हेस्टमेंट हि इक्विटी आणि त्याच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये करावी . हि इन्व्हेस्टमेंट करताना खालील प्रमाणे कॉम्पोसिशन असावे.

Type

Investment - % of Total Assets

Large cap companies

Minimum 25% of Total Assets

Mid cap companies

Minimum 25% of Total Assets

Small cap companies

Minimum 25% of Total Assets

हा बदल म्युचल फंडस् ना जानेवारीच्या लिस्ट पब्लिश केल्यानंतर एक महिन्यात करावा लागेल अर्थात फेब्रुवारी एन्ड पर्यंत.

याचा मल्टिकॅप इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टर्स वर काय परिणाम होईल ?

1.       मल्टिकॅप फंड मॅनॅजर्सना लार्ज  कॅप मधील शेयर्स विकून स्मॉल मिड कॅप मधील शेयर्स खरेदी करून मिनिमम २५% चा लिमिट गाठावच लागेल

2.       त्यामुळे शेयर मार्केट मध्ये डिमांड आणि सप्लाय चे मेकेनिसम ऑप्रेट झाल्याने शेयर प्राइझेस मध्ये फ्लूक्चुएशन येऊ शकते

3.       तसेच मल्टिकॅप फंड मधील कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंट चेंज झाल्याने रिस्क फॅक्टर मध्ये देखील चेंज होईल. हा मुद्दा इन्वेस्टर्ससाठी महत्वाचा ठरतो

4.       त्यामुळे इन्वेस्टरनी आपला ऐसीक फॅक्टर समजून घेऊन मल्टिकॅप मध्ये इन्व्हेस्ट करताना कंपन्यांचा अभ्यास करणे महत्वाचे ठरेल

या ब्लॉग च्या एन्ड ला एक एक्सेल फाईल अटॅच करत आहेत ज्यामध्ये आत्तापर्यंत लिहिलेले ब्लॉग्स त्याची डायरेक्ट ब्लॉगस्पॉट लिंक आहे . काही रीडर्सना प्रसंगानुसार एखादा रेलेव्हन्ट टॉपिक सहज पाणे सापडून वाचता येऊ शकेल.

Excel File https://drive.google.com/file/d/1JIkFMqABoEi4noquJrpFGlh9eG6yUboM/view?usp=sharing





Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा