Business करायचा आहे पण पैशाच काय ?
मागच्या blog मध्ये exiting income बरोबरच additional income ची किती गरज आहे ते आपण पहिले . दिवाळीच्या सुट्टीत IKIGAI हे एक सुंदर आणि सोप्प्या भाषेत लिहिलेलं पुस्तक हाती आले . त्यामध्ये देखील दोन वेगवेगळ्या कामातून इन्कम मिळवत राहणे हा जपानी जीवन शैलीचा एक पाया आहे असे वाचनात आले . उदाहरणार्थ , जर जपानी माणूस हा नोकरीत असेल तर Salary हा त्याचा “Primary Income” समजला जातो पण तोच जेव्हा relaxation साठी गार्डनमध्ये काम करून excess आलेला भाजीपाला फळबाजारात विकतो त्या इन्कमला “ Secondary Income” असे म्हणतात . आताचा काळ बघता हि संकल्पना सगळ्यांनी अमलात आणली तर नक्कीच फायदा होऊ शकेल . पण कुठला व्यवसाय करायचा म्हटला कि नक्की भांडवल किंवा सुरुवातीच्या पैशाची ज्याला “Seed capital” म्हटले जाते ते कुठून आणायचे असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो . त्यामुळे या blog मध्ये मी भारत सरकारच्या “MUDRA YOJANA “ याबद्दल माहिती देणार आहे . बऱ्याचदा ज्यांना लोनची गरज असते त्यांना documents किंवा procedure ची नीट माहिती नसल्याने लोन मिळत नाही . अशा सगळ्या एकॉनोमितील मुख्य प्रवाहात नसलेल्या लोकांसाठी मुद्रा य...