Business करायचा आहे पण पैशाच काय ?
मागच्या blog मध्ये exiting income बरोबरच additional income ची किती गरज आहे ते आपण पहिले. दिवाळीच्या सुट्टीत IKIGAI हे एक सुंदर आणि सोप्प्या भाषेत लिहिलेलं पुस्तक हाती आले. त्यामध्ये देखील दोन वेगवेगळ्या कामातून इन्कम मिळवत राहणे हा जपानी जीवन शैलीचा एक पाया आहे असे वाचनात आले. उदाहरणार्थ , जर जपानी माणूस हा नोकरीत असेल तर Salary हा त्याचा “Primary Income” समजला जातो पण तोच जेव्हा relaxation साठी गार्डनमध्ये काम करून excess आलेला भाजीपाला फळबाजारात विकतो त्या इन्कमला “Secondary Income” असे म्हणतात. आताचा काळ बघता हि संकल्पना सगळ्यांनी अमलात आणली तर नक्कीच फायदा होऊ शकेल.
पण कुठला व्यवसाय करायचा म्हटला कि नक्की भांडवल किंवा
सुरुवातीच्या पैशाची ज्याला “Seed capital” म्हटले जाते ते कुठून आणायचे असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. त्यामुळे या blog मध्ये मी भारत सरकारच्या “MUDRA YOJANA “ याबद्दल माहिती
देणार आहे.
बऱ्याचदा ज्यांना लोनची गरज असते त्यांना documents किंवा procedure ची नीट माहिती नसल्याने लोन मिळत नाही . अशा सगळ्या एकॉनोमितील मुख्य प्रवाहात
नसलेल्या लोकांसाठी मुद्रा योजना प्रभावी ठरत आहे. यातूनच स्वयंरोजगारातून रोजगार
निर्मिती करण्याचा प्रयत्न दिसतो. आता आपण मुद्रा योजनेत कोणते व कसे लोन मिळते हे
खालील चार्ट मध्ये बघुयात.
![]() |
मात्र वरील तीनही लोनची
काही सामायिक फीचर्स खालील्प्र्माणे आहेत
1.
शून्य प्रोसेसिंग
फीस
2.
कोणत्याही collateral (तारण ) security ची गरज नाही
3.
लोन रीपेयमेंटचा कमाल कालावधी हा ५ वर्षांपर्यंत आहे
4.
एक अट मात्र नक्की आहे कि तुम्ही आधी कोणत्याही बँकेचे लोन बुडवलेले (defaulter ) नसावे
लोनसाठी प्रोडक्टचे क्लासिफिकेशन बघता मुद्रा योजनेचा फायदा हे एखाद्या
खेडेगावात पापड लोणच यांचा छोटा व्यवसाय करणाऱ्या आमच्या मावशीपासून , स्वतःचे Xerox चे दुकान चालवणाऱ्या काकांपर्यंत सगळ्यांना आहे . तुम्ही खरच व्यवसाय करू शकता
का हे अजमावण्यासाठी हा पर्याय नक्की निवडू शकता. पण हे लोन कोणाला मिळू शकते ते
आता बघुयात. मुद्रा योजने अतर्गत हे लोन खालील ७ सेक्टर्समध्ये काम करणाऱ्या
लोकांना मिळू शकते.
1.
Transport Vehicle
बिसनेसमध्ये जर तुम्हाला गुड्स डीलीव्हर करण्यसाठी किंवा passenger ची ने आण करण्यासठी वेहिकल घ्यायचे असेल तर तुम्ही मुद्रा योजनेतून लोन घेऊ शकता.
a.
ऑटो
b.
छोटा टेम्पो
c.
३ व्हीलर
d.
बिसनेसाठी वापरल्या
जाणारे Tractor, २ व्हीलर
2.
Community , Social and Personal Service Activities
स्वतःचे खालील व्यवसाय करणाऱ्या किंवा ज्यांना सुरु करायचे आहेत अशांसाठी
a.
सलून
b.
ब्युटी पार्लर
c.
जिम
d.
दुकान
e.
कपडे शिउन द्यायचे दुकान
f.
गंरेज
g.
Xerox चे दुकान
h.
मेडिकल
i.
कुरिअर Agent
3.
Food Product Sector
खालील Activity यामध्ये कव्हर होतात
a.
पापड , लोणचे, jam बनवणे
b.
हलवाईचे दुकान
c.
छोटे फूड stall
d.
केटरिंग किंवा कॅन्टीन सर्विसेस
e.
Ice cream बनवणारे युनिट्स
f.
Bakery
Products बनवणारे युनिट्स
4.
Textile Product sector / Activity
खालील Activity यामध्ये कव्हर होतात
a.
handloom (हातमागावरील काम )
b.
powerloom (यंत्रमागावरील काम )
c.
पारंपारिक पद्धतीने केलेली designs,
embroidery, इतर शिवणकाम
d.
कॉम्पुटरच्या सहायाने केलेली designs,
embroidery, इतर शिवणकाम
5.
Business loan for traders and shopkeepers
दुकान उत्तमपणे चालू ठेवण्यासाठी या योजनेतून अर्थसहाय्य घेऊ शकता
6.
Equipment Finance Scheme for Micro Units
छोट्या (micro ) manufacturing युनिट्स ना मशिनरी किंवा इतर
इक्विपमेंट्स घ्यायला यातून कर्ज मिळू शकते
7.
Activities Allied to agriculture
a.
मत्स्यपालन
b.
मधुमक्षिकापालन
c.
कुक्कुटपालन
d.
डेरी
e.
Agri clinics
f.
Agribusiness centres
g.
Food & Agro Processing ( अन्न धान्यावरील प्रोसेसिंग ,
यामध्ये crop इन्सुरंस किंवा विहीर खोदणे यांसारख्या activitity cover होत नाहीत)
लोन घ्यायचे म्हटले कि कागदपत्र जमा करणे अनिवार्य आहे आता बघुयात कोणत्या
लोनसाठी कोणती कागपत्रे आवश्यक आहेत ते पाहूयात.
|
शिशु लोनसाठी खालील
पत्रे आवश्यक आहेत 1. ओळखपत्र (ADHAR / Voter ID, Driving License etc. 2. पत्त्याचे प्रूफ (ADHAR / Voter ID / Electricity Bill / Telephone Bill /
Passbook 3. लेटेस्ट फोटो 4. जर मशिनरी / इतर गोष्टी घ्यायच्या असतील तर त्याचे कोटेशन 5. सप्लायर चे डीटेल्स 6. अप्लीकेबल असल्यास SC/ST/OBC/Minority चे certificate |
किशोर किंवा तरुण लोनसाठी
खालील पत्रे आवश्यक आहेत 1. ओळखपत्र (ADHAR / Voter ID, Driving License etc. 2. पत्त्याचे प्रूफ (ADHAR / Voter ID / Electricity Bill / Telephone Bill /
Passbook 3. अप्लीकेबल असल्यास SC/ST/OBC/Minority चे certificate 4. Business related documents Business साठी घेतेलेली लायसेन्स Registration Certificates कामाचे ठिकाण MOA & AOA (कंपनी असल्यास) Partnership Agreement (Partnership असल्यास 5. Accounts चे डीटेल्स 6. दोन लाखांपेक्षा लोनची रक्कम जास्त असेल तर दोन वर्षांची Balance sheet Income tax return etc. 7. कशासाठी लोन हवे आहे व त्यातून कसा कंपनीला पैसा मिळेल हे दाखवणारा “Project Report” 8. Latest Photo स्वतःचा व्यवसाय असल्यास – स्वतःचा कंपनी असल्यास – director चा Partnership असल्यास – पार्टनर्सचा |
वरील टेबलवरून स्पष्ट दिसते कि शिशु लोनसाठी documents ची संख्या खूपच कमी आहे.
छोट्या व्यापार्यांसाठी किंवा नव्याने व्यवसाय करणार्यांसाठी हि सुवर्णसंधी आहे. ह्या
लोनसाठी तुम्ही ओनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने apply करू शकता. ओनलाईन apply करण्यसाठी तुम्ही www.mudra.org.in किंवा https://www.udyamimitra.in/ या वेबसाईट वर जाऊ शकता. तसेच
बँक्स, financial institute मध्येदेखील तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करू शकता.
हा लेख लिहित असताना बांगलादेशच्या Noble Prize winner मुह्हमद युनुस यांच्या सारख्या द्रष्ट्या
माणसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माझी सर्व वाचकांना विनंती आहे जरी तुम्हाला
गरज नसली तरी facebook , instragram किंवा whatsapp वर हा लेख शेयर करून होतकरू
लोकांपर्यंत नक्की पोचवा. तसेच तुम्हाला स्पेसिफिक topic वर लेख हवा असल्यास ब्लोग
वर comment करायला विसरू नका.
(Education / career guidance किंवा असे लेख whatsapp वर मिळवण्यासाठी 76205 52316 यावर whatsapp करा.)


Comments
Post a Comment