लक्ष्मी पूजन: फायनान्स कडे एका वेगळ्या दृष्टीने बघायचा दिवस

चहाच्या दुकानात एक वर्किंग क्लासचा रिप्रेसेंटेशन करणारा ग्रुप बसला होता आणि वाफाळलेल्या चहा बरोबर जोरदार चर्चा सुरु होती ती म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने बाजारात उसळलेल्या गर्दीची. कोणीतरी सहज म्हणून गेले हि गर्दी बघितली कि असा वाटत कि लोकांचे पैसे गेल्या सहा महिन्यात संपले किंवा नाहीयेत हे सगळं झूट वाटतं . चर्चा इतकी रंगली होती कि तिथे असणारा प्रत्येक माणूस स्वाभाविक पणे ऐकत होता. तस बघता श्रीमंत किंवा अतिशय गरीब लोकांबद्दल लिहिणारे बरेच आहेत त्यामुळे आज इकॉनॉमिचा बॅकबोन असलेल्या मध्यमवर्गाबद्दल मी लिहिणार आहे

आज बरेच दिवसांनी परत एकदा तुमच्याशी बोलत आहे , खरतर हा रायटर ब्लॉक नव्हता तर जाणीवपूर्वक विचार करण्यासाठी घेतलेला वेळ होता.  अनलॉकनंतर देखील जवळपास महिने झाले आहेत , बऱ्यापैकी सगळे व्यवहार सुरु झाले आहेत. परंतु या लॉकडाऊन ते अनलॉक आणि त्यानंतरचे महिने यामध्ये ऑब्सर्व्ह केलेल्या गोष्टी आज तुमच्याशी शेयर करत आहे. नॉर्मली आपण गरीब , मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे इन्कमच्या लेव्हलनुसार  सरळ विभागणी करतो. पण यावेळेस मध्यम वर्गात मात्र खूपच मोठी इनकमची व्हेरिएशन (खालीवर) झाली. त्यामुळे विभागणी देखील इनकम लेवल नुसार झालीच पण त्याचे वेगवेगळे परिणाम देखील आता दिसू लागले आहेत.



असं का घडलं हा विचार मांडण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला अधिक आर्थिक सुरक्षित कसे करता येईल याचे काही मुद्दे मी खाली मांडणार आहे.

 

Making Provisions - काही पैसे बाजूला काढून ठेवा

आपल्या कल्चरमध्ये मुलामुलींच्या लग्नासाठी अगदी त्यांच्या जन्मापासून पैसे बाजूला काढून ठेवले जातात. हे जे पैसे बाजूला ठेवले जातात (काहीही झाले तरी इतर कारणांसाठी खर्च केले जात नाहीत ) याला अकाउंटिंग च्या भाषेत Provision करणे असे म्हणतात. तसेच अगदी या महिन्यापासूनच सॅलरीतील % भाग का होईना हा "No Job" या Piggy Bank मध्ये टाकलेला चांगला . यातून इनकम सोर्स बंद असेल तेव्हा पॅनिक सिच्युएशन तयार होणार नाहीच पण नॉर्मल सिच्युएशन मध्ये जॉब चेंज नंतर सेटल होताना दमछाक देखील होणार नाही . आर्टिकल्स करत असताना एका कंपनीचे मालक दरवर्षीच्या सुरुवातील सगळ्याच्या पगाराचे फिक्स्ड डिपॉसिट करून का ठेवायचे याचा आता अर्थबोध होत आहे. त्याप्रमाणे तुम्ही देखील येणाऱ्या खर्चांसाठी ती अमाऊंट फ्रीझ करून ठेवू शकता . पण प्रोव्हिजन करणे हे मस्ट आहे . कारण “Going Concern” हि आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा पाया असली तरी मशिनप्रमाणे वागणाऱ्या माणसाला देखील थांबावे हे लागलेच.

 

एक्सिस्टिंग इनकम  बरोबरच ऍडिशनल इन्कमचे नवीन मार्ग शोधा

काटकसर करून पैसे कमावणे हे  एकप्रकारे इनकम मिळवल्यासारखेच  असते पण एका लिमिटच्या बाहेर तुम्ही काटकसर करु शकत नाही. तुमचे इनकम असो किंवा नसो तुम्हाला खर्च करावेच लागतात त्याला “Autonomous Consumption” असे म्हणतात. त्यामुळे आता कुटुंबालाच आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर समजा आणि नवीन बिसनेसचा विचार करायला सुरुवात करा. आपल्याच लोकांमधील गुण शोधा आणि ज्याप्रमाणे लोकडाऊनमध्ये एकत्र होऊन काम केले तसेच स्वतःच्या बिसनेससाठी काम करा

तंगी वर मात करण्यासाठी इनकम सोर्स वाढवणे हाच एक शाश्वत पर्याय आहे. काही लोक तुमची अगदी यथेच्छ चेष्टा करतील , अगदी तुम्ही कसे मूर्ख आहेत हे सउदाहरण पटवून देतील पण अशा गोष्टीकडे  कानाडोळा करून आपले स्वप्न नक्की पूर्ण करा. कारण अशी चेष्टा करणारे लोकच तुमच्या कामाचे रिसल्ट्स बघून तुम्हालाच ठाम पाठिंबा  देतील.

अर्थातच कुठेतरी फक्त Flat, FD आणि Mutual Fund या मानसिकतेतून बाहेर पडा.

एकदा सांगलीला बाईकरायडींग करत जाताना मी आणि माझे husband एका छोट्या कॅन्टीन सारख्या ठिकाणी  ब्रेकफास्ट ला थांबलो तेव्हा सहजच तिथल्या आज्जी आजोबांशी गप्पा सुरु झाल्या . आणि गप्पामधून कळले कि हे दुकान त्या दोघांचे आहे , पूर्वी कंपनीतील नोकरी गेल्यावर आज्जीनी स्वतःचे दागिने विकून हिमतीने दुकान सुरु केले . मला प्रत्येक स्त्री मधील अशा प्रकारच्या "लक्ष्मी रूपाचे " नेहेमीच कौतुक वाटते कारण संकट आले म्हणून मी कुठल्याही स्त्रीला व्यसनांच्या आहारी गेलेले बघितले नाही. पण बोलता बोलता आज्जी म्हणाल्या कि " हे बघा ताई आम्ही तर अडाणी माणसं , मोठा कंपनीत कामाला हाय , मुलीचं लगीन झालाय , पण एक आनंद हाय कि आम्ही गेल्यावर मुलांना या हाटेलातनबी पैक मिळत राहतील "

कोणतीही प्रोफेशनल डिग्री किंवा PHD घेतलेल्या आज्जीबाई आम्हाला त्यांनी एक्सपेरियन्स मधून फायनान्सचे गिरवलेले धडे शिकवत होत्या. पुढच्या पिढीला “Income Source” देऊन जाणे हि त्यांची कन्सेप्ट मला अधिकच भावली होती. कारण आपण मॅक्सिमम Liquidity वर जगत असतो , जेव्हढी liquidity जास्त तेव्हढे अधिक आर्थिक स्वातंत्र्य.

आमच्या आई वडिलांनी हे केले नाही असे रडत बसता स्वतःपासून एक नवीन सुरुवात करूयात?

(मागील ब्लॉग वाचण्यासाठी या https://managingrupaya.blogspot.com/  इथे जाऊन सबस्क्राईब करा. Career आणि Educational Guidance साठी 76205 52316 वर DM करा )


Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा