Economic recovery नेमकी जमेस कशी धरायची?

लॉकडाऊन नंतर जवळपास ३ महिने अर्थात एक Quarter झाला आणि सगळीकडे Economic recovery बद्दल news येऊ लागल्या . साहजिकच friends circle , whatsapp वर देखील चर्चा होऊ लागल्या . पण लक्षात राहिली ती म्हणजे माझ्या non-financial सेक्टर मध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीची कॉमेंट. “ अग काल मी सहज news बघत होते Economic recovery बद्दल बरेच डिस्कशन सुरु होते पण , त्यामध्ये ते म्हणाले काही सेक्टर हे expand झाले आहेत तर काही contract. काही सेक्टर्स हे negative growth rate देखील दाखवत आहे तर काहींचा सेल हा मल्टीप्लाय झालाय . पण overall , Economic recovery झाली आहे . यार तुम्ही फायनान्सची लोकं परिस्थिती बद्दल कुठलेही इमोशन न आणता बोलता पण काल तो इतका confused असल्यासारखा का बोलत होता . म्हणजे शेवटी तो जर समोर असता ना तर विचारला असत मी “  भाई आखिर केहेना क्या चाहते हो ? “ तिचा हा प्रश्न अगदी स्वाभाविक होता कारण “तुमचा मुलगा खूप हुशार आहे पण आत्ता तो थोडा फेल झालाय “ असेच म्हणण्यासारखे होते. मग चर्चा सुरु झाली Economic recovery आणि त्याच्या Types बद्दल.

Economic recovery म्हणजे नक्की काय ?


*Source: Google Image

कुठलिही Economy कायम वर किंवा कायम खाली राहू शकत नाही , ती अनेक देशांतर्गत किंवा जागतिक घडामोडींमुळे खाली वर होत असते. आणि हे  Economy  चे खाली वर होणे हे एका सिक्वेन्स मध्ये असते जसे पहिल्यांदा expansion (वाढ होणे ) – Peak (सर्वोच्च शिखर गाठणे)  – Trough (पडझड ) – Recovery (पडझडीतून सावरणे) आणि परत एकदा expansion – Peak – Trough – Recovery हे सर्कल कायम सुरु असते.

पण Recovery होत असताना ग्राफ हा विशिष्ट “Alphabets “ चा आकार घेतो त्यावरून Recovery ओळखली जाते. आता आपण काही Recovery चे types त्याचे फीचर्स  यांची तोंडओळख करून  घेऊ.

V shaped recession आणि Economic recovery

·         मोठ्या प्रमाणात पडझड ज्याला “Sharp contraction” म्हणतात

·         परंतु ज्या रेटनि पडझड होते त्याच रेटनि परत Recovery होते

·         त्यामुळे ग्राफ हा “V “ चा आकार घेतो

U shaped recession आणि Economic recovery

·         मोठ्या प्रमाणात पडझड ज्याला “Sharp contraction” म्हणतात

·         Recovery मात्र काहीशी स्लो होते

·         त्यामुळे ग्राफ हा “ U  “ चा आकार घेतो

W shaped recession आणि Economic recovery

·         याला “Double Dip” recession असेही म्हणतात

·         सोप्याभाषेत सांगायचं तर तुम्हाला “V “ चे फीचर्स दोनदा दिसतात

·         Investors आणि traders ना दुसरा fall लक्षात न आल्यास मोठे नुकसान ह्या type मुळे होऊ शकतो

L shaped recession आणि Economic recovery

·         या recovery अतिशय वाईट सिच्युएशन समजली जाते

·         Recovery मात्र अतिशय  स्लो होते व पूर्ण Recovery होण्यासाठी मोठा कालखंड जावा लागतो

K shaped recession आणि Economic recovery

·         या recovery मध्ये सगळेच सेक्टर पूर्वी प्रमाणे मोठे होत नाहीत

·         काही सेक्टर recovery मध्ये मोठी growth दाखवतात तर काही अधोगतीच दाखवतात

·         तुम्हाला हे वाचताना आत्ताच्या परिस्थितीशी मिळते जुळते वर्णन वाटत आहे न ? आत्ता देखील Technology, retail, software हे सेक्टर वाढलेले दिसत आहेत तर Travel, Entertainment, Hospitality यांना सगळ्यात मोठा फटका बसला व आता रीकवर होताना देखील स्लोव्ली होत आहेत

 

आता काही अलर्ट वाचक नक्की म्हणतील कि जर आपल्याला माहित आहे कि expansion – Peak – Trough – Recovery हे सर्कल कायम सुरु असते तर या सर्कल मधून बाहेर पडण्य्साठी काही उपाय नाही का ? अधिक जाणून घेण्यासाठी वाचकांना Nassim Nicholas Taleb यांची “Antifragile” ची सिरीज नक्की वाचावी. तसेच “एकीगाई” हे जपानी फिलोसोफी वरील उत्तम पुस्तक तुम्हाला अनेक प्रश्नाची उत्तरे मिळवून देईल. इथे मी होतकरू बिसनेसमन ना नक्की सांगेन कि 10 मिनिट्सचा video हा एखादया विषयाची तोंडओळख होण्यासाठी चांगला ठरतो  पण उत्तम डिसिजन मेकर होण्यासाठी स्वतः वाचन करणे , मुद्दे लिहून ठेवणे, अभ्यास करणे, त्यावर स्वतःचे विचार मांडणे याला पर्याय नाही.  मी वाचत नाही हि नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही तर तो एक विकनेस आहे तेव्हा तो वेळीच स्ट्रेन्थ मध्ये covert करा आणि उत्तम बिसनेसमन बना.

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा