Union Budget 2021-22
जसा १ फेब्रुवारी जवळ येत आहे तसें आपल्या सगळ्याचे लक्ष हे pandemic नंतरच्या पहिल्या Union Budget वर आहे. Pandemic च्या पार्श्वभूमीवर या Union Budget कडून भारतातल्या प्रत्येक सेक्टर च्या काहीना काही अपेक्षा आहेतच. Union Budget बद्दल दर वर्षी अनेक जाणकार लोकांची मते आपण वाचतो , बघतो. बर्याचदा वेगवेगळ्या perspective नि विचार मांडल्याने कधी कधी ती अगदी परस्पर विरोधी देखील वाटतात. तेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न निर्माण होतात , कधी कधी डिस्कस होणाऱ्या बर्याच गोष्टी देखील कळत नाहीत. अशावेळेस आपण आपले मत न बनवता सहजपणे उपलब्ध होणाऱ्या instant comments किंवा माहितीवर बोलायला लागतो . Digital Revolution मुळे जसे अनेक platforms उपलब्ध झाले तसे माहितीचे मोठे डोंगर आपल्या समोर उभे आहेत . तेव्हा योग्य ती माहिती निवडून इतर माहिती तात्पुरती बाजूला करण्याचे स्कील डेवलप करणे महत्वाचे आहे . हाच विचार अगदी Union Budget ला देखील लागू पडतो . Budget हे फक्त income tax slab, tax rate एवढ्या पुरते मर्यादित नसून अनेक गोष्टीची माहिती देते. अशावेळेस सजगतेने कशी माहिती आपण घेऊ शकतो हे खालील प्रश्न उत्तरांमधून बघुयात
1.
मला कुठल्याही advertisements किंवा इतर कुठल्याही disturbance शिवाय Budget बघायचे आहे , मी कुठे बघू ????
तुम्ही खाली दिलेल्या website / you tube channel वर जाऊन Live Budget बघू शकता
Link: https://budgetlive.nic.in/
तसेच १९४७ पासून present केलेली Budgets तुम्हाला खालील लिंक वर
मिळू शकतात
Previous Union Budgets: https://www.indiabudget.gov.in/previous_union_budget.php
Budget Speeches: https://www.indiabudget.gov.in/bspeech.php
2.
मला खर तर बघायचे होते पण
मिटिंग किंवा इतर कामामुळे नाही जमले , आता मी काय करू ???
जरी तुमचे live सेशन मिस झाले तरी खालील वेबसाईट वर Union Budgets ची संपूर्ण PDF मिळते .
त्याचबरोबर संपूर्ण प्रेस रिलीज वाचायला वेळ नसेल तर Highlights of the Budget देखील तुम्हाला download करता येईल. हे Highlights नजरेखाली घालून तुम्ही शांतपणे तुमच्या
segment शी related गोष्टी Union Budget मध्ये सविस्तर वाचू शकता.
·
https://www.indiabudget.gov.in/index.php
·
https://pib.gov.in/indexd.aspx
3.
खूप वेळ online platforms वर वाचायला त्रास होतो ,
मग मी काय करू ?
एकतर तुम्ही वर दिलेल्या website वर जाऊन PDF प्रिंट करू शकता किंवा अशावेळेस Budget च्या दुसऱ्या दिवशीचा “Economic Times”, “Business Standard” असे financial news हा गाभा असलेले पेपर नक्की घ्यावेत. तुम्हाला पूर्ण Budget तसेच Highlights हे प्रिंट फोर्म मध्ये मिळून जाईल. अनेक experts, जाणकारांना मी वर्षानुवर्षे हे पेपर file करून ठेवताना पहिले आहे
जेणेकरून अभ्यासाला अशा खजिन्याचा नक्कीच फायदा होतो. हि सवय students, entrepreneur साठी नक्कीच चांगली आहे.
4.
Budget तर येणाऱ्या वर्षाची guideline / policy सांगते पण सरत्या वर्षात नेमके काय झाले हे कसे कळेल?
Government दर वर्षी “Economic Survey” हा Budget च्या आधी रिलीज करत असते या Survey मध्ये fiscal developments, Monetary management, Health sector ,
agriculture अशा अनेक सेक्टर्स चा गोषवारा घेतलेला असतो .
यावर्षीचा Survey हा दोन खंडात (Volume) मध्ये available आहे. ज्यांना हा पूर्ण
रिपोर्ट वाचणे शक्य नाही त्यांनी “Info graphics” नक्कीच बघावेत.
Economic Survey 2021 -22: https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/
Info graphics: https://pib.gov.in/newsite/infographicss.aspx?mincode=15&Event_Code=14
Previous Economic Survey: https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/allpes.php
5.
Budget मध्ये बर्याचदा ऐकतो कि या योजनेला किंवा
मिनिस्ट्रीला एवढे पैसे दिले, पण पुढे त्याचे काम कसे झाले किंवा ती योजना
कशी राबवली गेली हे कसे कळेल?
Government of India प्रत्येक वर्षी एक YEAR BOOK काढते (जसे यावर्षी
तुम्हाला आत्ता “INDIA 2019” मिळेल). त्यामध्ये प्रत्येक मिनिस्ट्रीने काय काम केले ,
कोणते लॉ नवीन आले , वर्षभरात कसा खर्च झाला अशी संपूर्ण वर्षाची माहिती संक्षिप्त
स्वरुपात दिलेली असते. तुम्ही student, Businessman किंवा कोणत्याही सेक्टर मधील professional असलात तरीही हे YEAR BOOK तुमच्या लायब्ररीत
नक्कीच पाहिजे.
वर सांगितल्या प्रमाणे ५ गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष दिले तर तुम्हाला नक्कीच financial news किंवा जाणकारांचे मत समजून घ्यायला मदत होईल. अनेक aspects तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे Budget Income tax rate , GST एवढ्या पुरते न बघता “Government” कोणकोणत्या नवीन योजना आणत आहे त्याचा कोणत्या सेक्टर कसा दूरगामी परिणाम होईल, तसेच आपले स्वतःचे गोल्स आपण कसे set किंवा modify करू शकू हे समजून घेणे त्यावर विचार करणे नक्कीच हिताचे आहे.
चला तर मग Union Budget
2021-22 डोळसपणे बघुयात !!!
Comments
Post a Comment