Mutual Fund आणि त्याची NAV म्हणजे नक्की काय ????
मागील ब्लॉगमध्ये अभिनंदन यांनी "Mutual Fund आणि त्याची NAV म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर आपण एका छोट्याश्या केस स्टडीमधून बघुयात……….
तुम्ही अस समजा कि तुमच्या घरात एकूण चार माणसे आहेत. तुम्ही, तुमची बहीण आणि आई- बाबा . तुम्हाला आज Vegetable
Market मधून फळे आणण्याचे काम दिले आहे, कारण उत्तम प्रकारची फळे निवडायचे skill तुमच्याकड़े आहे. घरचे तुम्हाला "Fruit purchase Manager
" म्हणतात :-) घरातील प्रत्येकाने तुम्हाला २०० रुपये दिले . आता तुमच्याकडे एकूण ६०० ( २०० X ३ ) रुपये जमा झाले .
तुम्ही बाजारात फळे खरेदी करताना ६०० रुपयांचे एकच फळ घेण्याऐवजी Apple, संत्री, केळी आणि पेरू अशी चार फळे घेतली. कारण प्रत्येकाची आवड तुम्हाला माहित आहे, तसेच एखादे फळ खराब निघाल्यास अजून options राहतील याची तुम्ही काळजी घेतली . आता बघा तुमची फळांची बॅग खालील प्रमाणे दिसत असेल .
तुमच्या फॅमिलीसाठी जे काम तुम्ही करत आहात तेच काम "Mutual Fund Manager” mutual
fund साठी करत असतो. लोकांकडून जमा झालेला पैसा हा कसा आणि कोणत्या कंपन्यांच्या शेयर्स मध्ये गुंतवायचा हे तो ठरवत असतो. ज्याप्रमाणे तुम्ही फळे घेत असताना त्याचा रंग किंवा फळावरील सुरकुत्यांचा (आंब्याची आठवण ) अभ्यास करता, त्याचप्रमांणे कंपनीने मिळवलेला प्रॉफिट , सेल तसेच निगडित (related ) जोखीम अर्थात Risk यांचा तो अभ्यास करतो व योग्य त्या कंपन्यांचे तो शेयर्स विकत घेतो.
Suppose एका mututal manager कडे ६०० कोटी रुपये फंडात जमा झाले तर तो share इन्व्हेस्टमेंट मध्ये असलेली रिस्क
कमी करण्यासाठी वेगवेगळ्या sector मधल्या
कंपन्यांच्या शेयर्स मध्ये तो हि amount इन्व्हेस्ट करतो, कारण एक सेक्टर लॉस मध्ये असेल तर त्याला दुसरा सेक्टर किंवा त्या सेक्टर मधील दुसरी कंपनी प्रॉफिट मिळवून देते . खालच्या चार्टवरून आपल्याला हे आणखी नीट समजून येईल.
अश्याचप्रकारे तो बाकीच्याही
सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करेल.
सोप्या
भाषेत सांगायचे
तर Mutual
Fund देखील वेगवेगळ्या
कंपन्यांच्या शेयर्सची एक बास्केटच
आहे.
तुमचा
दुसरा प्रश्न
होता कि
NAV म्हणजे
काय ???
हे समजावण्यासाठी मी
फळांचीच केस continue करत आहे . तुमच्याकडे ६०० रुपयांची ४ फळे आहेत, खरेदी करताना तुम्हाला चिक्कूदेखील आवडले पण पैसे संपल्यामुळे ओळखीच्या दुकानदाराने ६० रुपयांचे चिक्कू उधार दिले . आता तुमच्याकडे ६६० (६०० + ६०) रुपयांची फळे आहेत, पण त्याचबरोअबर
६० रुपयांचे कर्जदेखील आहे. मार्केटमध्ये जाऊन येण्यासाठी तुम्ही ७० रुपये खर्च केले . आता आपल्याला या फळांची NAV कशी काढता येईल?
NAV म्हणजेच Net Asset Value चा फॉर्मुला खालील प्रमाणे आहे
NAV = फळांची किंमत - झालेले कर्ज - झालेला खर्च
= 660 – 60 – 70
= 530
आता आपण प्रति माणशी (per person) NAV काढूयात
NAV per person =
530 / 3 =176.67
आता हेच calculation आपण mutual fund ला apply करूयात अर्थात वापरूयात . जसे आपण दूध लिटर मध्ये घेतो तसेच जेव्हा आपण mutual fund घेतो तेव्हा आपण त्याचे “युनिट्स” घेत असतो. Mutual fund Manager वेगवेगळ्या सेक्टर मधील अनेक कंपन्यांच्या शेयर्समध्ये इन्व्हेस्ट करत असतो, so प्रत्येक इन्व्हेस्टरला त्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्या कंपन्यांच्या शेयर्सचा
वाटा मिळावा, त्यासाठी फंड मॅनेजर किती लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहेत व एकूण किती किमतीचे शेयर्स घेतले आहेत या रेशोचा (गुणोत्तराचा) विचार करून "युनिट्स " हे युनिट ऑफ मेजरमेंट (UOM ) वापरतो.
वरील उदाहरणात दिल्याप्रमाणे Mutual
Fund ने
६६० कोटी रुपयांचे शेयर्स घेतले , पण ते घेत असतानां ६० कोटी चे कर्ज झाले आणि ६ कोटी युनिट्स इश्यू केले.
NAV = ( शेयर्सची किमंत - झालेलं कर्ज )
= (६६० कोटी – ६०
कोटी)
= ६००
कोटी रुपये
NAV प्रति` युनिट = एकूण NAV / इश्यू केलेले युनिट्स
= ६०० कोटी रुपये / ६ कोटी
युनिट्स
= १०० रुपये प्रति` युनिट ( जी तुम्हाला
तुमच्या ई-मेल मध्ये दिसत असते )
आता तुम्ही १०,००० रुपये इन्व्हेस्ट केले तर त्या दिव शीच्या NAV प्रति` युनिट दराप्रमाणे तुम्हाला
(१०,००० / १००), १०० युनिट्स मिळतील.
वरील फॉर्मुल्याने एक स्पष्ट होते कि जशी शेयर्सची किम्मत खाली - वर (Fluctuate)
होईल तशी NAV देखील बदलत जाते.
THANKS FOR
READING, काही doubts, प्रश्न असल्यास ब्लॉगवर जरूर विचारा किंवा मेल करा !!!



Thank you so much!
ReplyDeleteसोप्या शब्दात / भाषेत, उदाहरणं दिल्यामुळं व्यवस्थित लक्षात आलं NAV म्हणजे काय ते! 🙂🙂
कर्ज का घ्याव लागल लोकांनी तर ६०० कोटी दिले आहेत तेवढेच का गुंतवले नाहि
ReplyDeleteNice article explained in simple words
ReplyDeleteThanks
DeleteVery well explained with simple example .. Awaited for next article..
ReplyDeletekhup sope karun sangitale ahe
ReplyDeleteThanks
DeleteSip मध्ये दरमहा जी गुंतवणूक करतो ,त्याचे रिटर्न्स कश्या पद्धतीने मिळतात,बरेच लोक म्हणतात लांग टर्म इंव्हेसमेन्ट असेल तरच यात प्रॉफिट असतो,
ReplyDeleteSimply Great Explained..
ReplyDeleteSip संदर्भात माहिती हवी आहे ,पुढच्या ब्लॉग मध्ये येईल ना,मी गेली 3 वर्ष sbi मध्ये दरमहा 2000 ची SIP इन्व्हेसमेन्ट चालु आहे,
ReplyDeleteMadam please suggest best mutual fund for long term i am beginner and wish to invest in mutual fund.
ReplyDeleteGood Job
ReplyDeleteThank you !!!
DeleteKindly keep reading, share, subscribe and like
Good Job
ReplyDelete