वर्क फ्रॉम होम आणि कंपनीची प्रॉफिटॅबिलिटी - FMCG सेक्टर


मागच्या  आठवड्यात आपण  सर्विस इंडस्ट्रीच्या जून २०२० क्वार्टर चे फिनान्शिअल ऍनालिसिस बघितले . सर्वसाधारणपणे गेल्या काही महिन्यातील घडामोडींमुळे एकूण मॅनुफॅक्चरिंग कंपन्यांना लॉस झाला हे आपल्या सर्वाना माहित आहे . पण या ब्लॉग मध्ये आपण एक  मॅनुफॅक्चरिंग सेक्टर बघणार आहोत कि त्यातील कंपन्यांनी नुसता प्रॉफिट नाही मिळवला तर त्यात वाढ देखील मिळवली. अर्थातच मी बोलत आहेत FMCG - Fast Moving Consumer Goods Sector बद्दल.  “FMCG - Fast Moving Consumer Goods” म्हणजे सामान्य माणसाच्या रोजच्या  वापरात असणाऱ्या   नेहेमी लागणाऱ्या गोष्टी. अशा गोष्टी या नेहेमी लागतात त्यामुळे त्यांचा सेल हा खूप कमी वेळेत होतो त्यांची अफोर्डेबल (परवडणारी) किंमत असते. बिस्किट्स , रिफ्रेशमेंट्स , ब्युटी प्रॉडक्ट्स , पर्सनल केयर प्रॉडक्ट्स याचा FMCG मध्ये समावेश होतो. थोडक्यात आपल्या लाडक्या सिरिअल्समध्ये ज्या बहुतकरून प्रॉडक्ट्सच्या advertisement आपण बघत असतो, ते प्रॉडक्ट्स म्हणजे FMCG.
NSE वरील टॉप FMCG कंपन्यांचा इंडेक्स हा "NIFTY FMCG index" म्हणून ओळखला जातो.

In Lakhs
Company Name
Market Capitalisation
%
Hindustan Unilever Ltd.
4,97,58,412
38.57%
ITC Ltd.
2,11,05,761
16.36%
Nestle India Ltd.
1,60,53,217
12.44%
Dabur India Ltd.
79,52,671
6.16%
Britannia Industries Ltd.
64,66,072
5.01%
Godrej Consumer Products Ltd.
53,24,704
4.13%
Marico Ltd.
35,48,161
2.75%
United Spirits Ltd.
35,21,291
2.73%
Colgate Palmolive (India) Ltd.
34,07,164
2.64%
Procter & Gamble Hygiene & Health Care Ltd.
33,33,507
2.58%
United Breweries Ltd.
24,29,487
1.88%
Jubilant Foodworks Ltd.
19,41,858
1.51%
Tata Consumer Products Ltd.
18,60,886
1.44%
Varun Beverages Ltd.
15,28,462
1.18%
Emami Ltd.
7,71,463
0.60%
Total For FMCG Index
12,90,03,116
100.00%

इंडेक्स मधील मार्क केलेल्या कंपन्या या साधारणपणे ८५% कॅपिटल रिप्रेझेन्ट करत आहेत. त्यापैकी Dabur India Godrej consumer product चा डेटा हा अव्हेलेबल नसल्याने आपण HUL, ITC, NESTLE, Britannia Marico यांचा अभ्यास करूयात.
या ब्लॉग मध्ये आपण FMCG सेक्टरचा ऍनालिसिस समजून घेण्यासाठी इंडेक्स मधील कंपन्या त्यांचे ब्रॅण्ड्स समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. माझी रीडर्सना विनंती आहे कि थोडा वेळ काढून कंपन्यांचा ब्रॅण्ड्सचा जरूर अभ्यास करा. कदाचित आत्तापर्यंत आपण जे ब्रॅण्ड्स एकमेकांचे कॉम्पिटीटर्स समजतो ते एकाच कंपनीचे प्रॉडक्ट्स असतात. त्यामुळे तुम्हाला प्रॉडक्ट्स सिलेक्शनला नक्कीच मदत होईल.

Company Names
Product Range
Website Link
Hindustan Unilever Ltd.
Beauty & Personal Care
Foods & Refreshment
Home care
Water Purifier
ITC Ltd.
Foods & Refreshment
Personal Care
Educational material
Matches & Agarbatti
Lifestyle
Nestle India Ltd.
Beverages
Breakfast Cereals
Dairy, Chocolates
Foods & Nutrition
Britannia Industries Ltd.
Biscuits
Bread
Dairy Products
Cakes
Rusks
Crème Wafers
Croissant
Marico Ltd.
Hair Oil, Anti Hair Fall
Coconut Oil
Male Grooming & Styling
Wellness
Skincare


आता आपण या कंपन्यांचे पब्लिश झालेले रिजल्ट आणि याच क्वार्टरमध्ये पब्लिश झालेले २०१९ चे रिजल्ट कम्पेर करूयात.
Total Sales
Particulars
Jun-19
Jun-20
Change %
Hindustan Unilever Ltd.
10,225
10,572
3%
ITC Ltd.
12,532
9,722
-22%
Nestle India Ltd.
2,983
3,041
2%
Britannia Industries Ltd.
2,677
3,384
26%
Marico Ltd.
2,166
1,925
-11%
Profit After Tax
Particulars
Jun-19
Jun-20
Change %
Hindustan Unilever Ltd.
1,795
1,897
6%
ITC Ltd.
3,437
2,567
-25%
Nestle India Ltd.
438
487
11%
Britannia Industries Ltd.
249
543
118%
Marico Ltd.
315
390
24%

वरील टेबल मध्ये आपल्याला दिसते कि ITC Marico कंपनी सोडली तर बाकीच्या कंपन्यांच्या सेल्समध्ये वाढ झालेली आहे. Britania च्या प्रॉफिट मध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे तर marico चा सेल्स जरी कमी झालेला असला तरी प्रॉफिटमध्ये वाढ झालेली दिसते. एकूणच एक्सपेन्सेसचे अनालिसिस करणे हे आवश्यक आहे. ITC ची मागच्या वर्षीच्या क्वार्टरच्या तुलनेत ग्रोथ कमी झालेली आहे. तेव्हा वाचकांनी हे नोट करावे कि त्यांच्या अनेक प्रॉडक्ट लाईन्स पैकी सिगारेट हॉटेल business चा वाटा अधिक आहे. असे असले तरी FMCG सेक्टरमधील कंपन्या ह्या ओव्हरऑल प्रॉफिट मेकिंग आहेत.

महत्वाचे खर्च आणि त्याचे एकूण खर्चाशी असलेला रेशो
HUL
Particulars
Jun '20
Jun '19

Raw material
62%
60%

Employees Cost
7%
6%

Depreciation
3%
3%

Other Expenses
27%
30%

Finance cost
0%
0%

Total Expenses
100%
100%

Nestle India
Particulars
Jun '20
Jun '19
Raw material
55%
52%
Employees Cost
15%
13%
Depreciation
4%
3%
Other Expenses
25%
31%
Finance cost
2%
1%
Total Expenses
100%
100%
Britannia
Particulars
Jun '20
Jun '19
Raw material
71.86%
68.17%
Employees Cost
4.93%
5.11%
Depreciation
1.73%
1.90%
Other Expenses
20.56%
24.40%
Finance cost
0.92%
0.43%
Total Expenses
100.00%
100.00%
Marico
Particulars
Jun '20
Jun '19
Raw material
66%
65%
Employees Cost
9%
7%
Depreciation
2%
2%
Other Expenses
23%
25%
Finance cost
1%
1%
Total Expenses
100%
100%

साधारणपणे जर आपण बघितले तर कॉस्ट स्ट्रक्चरमध्ये फार मोठा फरक झालेला दिसत नाहीये. कंपन्यानि मात्र इतर खर्चांमध्ये बऱ्यापैकी सेविंग केलेले दिसत आहे. परंतु गेल्या क्वार्टरमध्ये प्रॉडक्ट्स ना वाढलेली डिमांड , यामुळे FMCG सेक्टरसाठी जुन २०२० हा क्वार्टर प्रॉफिट मेकिंग राहिला.
आता आपण FMCG सेक्टर च्या इंडेक्स चा तसेच प्रत्येक कंपनीच्या शेयर प्राईस चा विचार करू.




वरील सर्व चार्ट्स वरून आपल्याला दिसून येईल कि मार्चच्या शेवटच्या आठवड्यातील शेयर प्राईस मध्ये झालेली पडझड सोडली तर प्रत्येक कंपनीच्या शेयर प्राईस मध्ये वाढ झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जून २०२० चे उत्तम आलेले फिनान्शिअल रिपोर्ट्स.
वरील सर्व चार्ट्स वरून आपल्याला दिसून येईल कि ITC सोडला तर इंडेक्स मधील बाकीच्या सिग्निफिकंट कंपन्यांनी सेल्स प्रॉफिट मध्ये ग्रोथ दाखवलेली आहे. वाचकांनी हे लक्षात घ्यावे कि ITC च्या परफॉर्मन्स ,मध्ये वाढ झालेली नसली तरी सुद्धा ती एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे
जे लोक इंटरव्यूसाठी तयारी करत असतील त्यांनी देखील कंपनीबद्दलची माहिती घेताना वरील प्रमाणे ऍनालिसिस केले तर त्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जर IT  सेक्टर वरचा ब्लॉग मिस केला असेल तर खालील लिंक वर क्लिक करून जरूर वाचा.
https://managingrupaya.blogspot.com/2020/07/workfromhome.html


Comments

Popular posts from this blog

बँकेत नोकरी करायची आहे ? किंवा त्यासाठीची एक्साम देत आहात ?

B.Com/BBA/M.com/M.B.A लास्ट इयर एक्साम आणि प्रिपरेशन (B.Com/ BBA/M.com/MBA - Last year exam and preparation)

उत्तम पोर्टफोलिओ असून प्राऊड शेयरहोल्डर आहात? मग हे नक्कीच वाचा